चंदीगड, 16 जून : चमचमीत छोले-भटुरे (Chole Bhature) खायला कुणाला आवडत नाही. आता पावसात तर गरमागरम छोले-भटुरे खाण्याची मजा काही औरच. विचार करा तुमच्यासमोर असे छोले-भटुरे आहेत. तोंडाला पाणी सुटलं आहे आणि खूप भूकही लागली आहे. कधी एकदा या छोले-भटुऱ्यांचा आस्वाद घेतो असं तुम्हाला झालं आहे आणि एक घास तुम्ही तोंडात घेतला. त्यानंतर मात्र छोले-भटुऱ्यांमध्ये ज्याचा तुम्ही विचारही केला नसेल असं तुम्हाला काहीतरी दिसलं तर… छोले-भटुऱ्यांबाबतची असंच एक धक्कादायक प्रकरण समोर आलं आहे. एक व्यक्ती एका हॉटेलमध्ये छोले-भटुरे खायला गेली. तिथं त्या व्यक्तीला छोले-भुटऱ्यांमध्ये असं काही दिसलं ज्याचा तिने स्वप्नातही विचार केला नव्हता. निम्म्याहून अधिक छोले-भटुरे तिने फस्त केले पण त्यानंतर तिला त्यात जे सापडलं ते पाहून धक्काच बसला (Lizard In Chole Bhature). छोले-भटुऱ्यांमध्ये चक्क एक पाल होती. या व्यक्तीने तात्काळ याबाबत पोलिसांकडे तक्रार केली. पोलिसांनी अन्न आणि औषध प्रशासनाला याची माहिती दिली. या घटनेचा व्हिडीओ एका ट्विटर युझरने ट्विटरवर पोस्ट केला आहे.
Had a very horrible experience on 14.6.22, at Sagar Ratan, food court, Elante Mall, Chandigarh. A live Lizard was found in semi-conscious state under the Bhatura. Complaint given to @DgpChdPolice they made sample seized by food health Dept. Chd. @KirronKherBJP@DoctorAjayita pic.twitter.com/ej4sLHrnH5
— Ravi Rana (@RaviRRana) June 15, 2022
ट्विटर पोस्टमध्ये दिलेल्या माहितीनुसार ही घटना चंदीगडच्या एलांते मॉलच्या सागर रत्न आऊटलेटमधील आहे.
एफडीएच्या अधिकाऱ्यांनी घटनास्थळी जात तिथल्या खाद्यपदार्थांचे नमुने घेतले आहेत. हे नमुने परीक्षणासाठी प्रयोगशाळेत पाठवण्यात आले असून, पुढील 15 दिवसांत याचा रिपोर्ट येईल. त्यानंतर नियमानुसार कारवाई केली जाईल अशी माहिती आरोग्य विभागाने प्रसारमाध्यमांना दिल्याचं वृत्त झी न्यूज हिंदी ने दिलं आहे.