मुंबई, 28 मे : उन्हाळा असो की हिवाळा, प्रत्येकाच्या स्वयंपाकघरात दूध नेहमीच असते. पण, उन्हाळ्यात दूध चांगलं राखणं हे सर्वात आव्हानात्मक काम असते. उन्हाळ्यात वाढत्या तापमानामुळे दूध खराब होण्याची भीती असते. पण, तुम्हाला माहीत आहे का की, उन्हाळ्यात काही भांड्यांमध्ये दूध साठवून ठेवल्यास ते अनेक दिवस खराब होण्यापासून वाचवता (Tips to store milk in summer) येते.
भरपूर प्रमाणात पोषक घटक असल्यामुळे दूध हा प्रत्येकाच्या आहाराचा एक महत्त्वाचा भाग आहे. बहुतेक लोकांना चहा, कॉफी यांसारख्या वेगवेगळ्या गोष्टींमध्ये दूध घेणे आवडते. मात्र, उन्हाळ्यात दूध लवकर खराब होते, म्हणून आम्ही तुम्हाला दूध साठवण्याचे काही सोपे उपाय सांगत आहोत, ज्याचा वापर करून तुम्ही दूध बरेच दिवस ताजे ठेवू शकता.
प्लास्टिक कॅनचा उपयोग -
दूध साठवण्यासाठी आपण प्लास्टिकचा कॅन/डब्ब्यांचा वापरू शकता. बाजारात प्लास्टिकचे डबे सहज उपलब्ध आहेत. त्यात दूध साठवण्यासाठी प्रथम दूध चांगले उकळून थंड करावे. नंतर दूध प्लास्टिकच्या डब्यात घालून ठेवा. यामुळे आपले दूध जवळपास 2 दिवस खराब होणार नाही.
हे वाचा -
आरोग्यासाठीच नव्हे तर त्वचेसाठीही मशरूमचा असा होतो उपयोग; जाणून घ्या सर्व फायदे
काचेची बाटली वापरा -
अनेक दिवस दूध साठवण्यासाठी काचेच्या बाटलीमध्ये दूध ठेवणे हा उत्तम पर्याय आहे. यासाठी दूध चांगले उकळून घ्यावे. नंतर ते थंड करून काचेच्या बाटलीत भरून फ्रीजमध्ये ठेवा. तसेच ही बाटली एका भांड्याने झाकून ठेवा. काचेच्या भांड्यात दूध बरेच दिवस खराब होत नाही आणि दुधाची चवही ताजी राहते.
हे वाचा -
असे देश जिथे सेक्स वर्कर्स सरकारला देतात Tax, महिलांना मिळतात हे लाभ
दूध स्टीलच्या भांड्यात ठेवा -
उन्हाळ्यात दूध साठवण्यासाठी स्टीलची भांडीही खूप उपयोगी आहेत. विशेषत: दुधाची चव तशीच टिकवून ठेवायची असेल, तर दूध स्टीलच्या भांड्यात साठवणे उत्तम. पण, लक्षात ठेवा की दूध ठेवण्यापूर्वी स्टीलचे भांडे पूर्णपणे स्वच्छ करा. जेणेकरून त्यात अगोदरचे काही पदार्थ चिकटून राहणार नाहीत. अन्यथा तुमचे दूध लवकर खराब होऊ शकते.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर.
आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.