Home /News /lifestyle /

आरोग्यासाठीच नव्हे तर त्वचेसाठीही मशरूमचा असा होतो उपयोग; जाणून घ्या सर्व फायदे

आरोग्यासाठीच नव्हे तर त्वचेसाठीही मशरूमचा असा होतो उपयोग; जाणून घ्या सर्व फायदे

आपल्या चेहऱ्यावर कोणत्याही प्रकारचे पूरळ, जखम, रॅशेश, मुरुमे इत्यादी असतील तर त्यांच्यामुळे त्वचेवर सूज येते. यावर मात करण्यासाठी आहारात मशरूमचा समावेश केल्यास त्वचेवरील सूज लवकर बरी होऊ शकते.

    नवी दिल्ली, 27 मे : चव आणि उत्तम आरोग्यासाठी मशरूमचा आपल्याला आहारात समावेश करायला अनेकांना आवडतं. हाच मशरूम हजारो वर्षांपासून त्वचेची काळजी घेण्यासाठी देखील वापरला जात आहे. बार्बरा क्लोज (Barbara Close), डर्मस्टोर येथील निसर्गोपचाराच्या संस्थापक आणि सौंदर्यशास्त्रज्ञ सांगतात की, काही लोकप्रिय मशरूम, जसे की रेशी मशरूम त्वचेची काळजी घेण्यासाठी 2000 वर्षांपासून वापरला जात आहेत. संवेदनशील त्वचा आणि त्वचेवरील सूज कमी करण्यात मदत करण्यासाठी पारंपारिक चीनी औषधांमध्ये मशरूम आणि त्याची मुळे देखील वापरली गेली. जाणून घेऊया त्वचेची काळजी घेण्यासाठी मशरूम किती फायदेशीर (Mushroom benefits for skin ) ठरते. त्वचेसाठी मशरूमचे फायदे सूज कमी होण्यासाठी - आपल्या चेहऱ्यावर कोणत्याही प्रकारचे पूरळ, जखम, रॅशेश, मुरुमे इत्यादी असतील तर त्यांच्यामुळे त्वचेवर सूज येते. यावर मात करण्यासाठी आहारात मशरूमचा समावेश केल्यास त्वचेवरील सूज लवकर बरी होऊ शकते. सुरकुत्या येत नाहीत - फिनिश चागा (Finnish Chaga) प्रजातीच्या मशरूममध्ये अँटिऑक्सिडंट्स आढळतात, ज्यामुळे ऑक्सिडेटिव्ह स्ट्रेसचा प्रभाव कमी होतो. त्यामुळे त्वचेवरील वृद्धत्व, सुरकुत्या, पिगमेंटेशन इत्यादी लक्षणे कमी होतात. टॅनिंग गायब - संशोधनात असे आढळून आले आहे की या मशरूममध्ये कोजिक अॅसिड आढळते, जे त्वचेमध्ये असलेले मेलेनिनचे उत्पादन नियंत्रित करते. यामुळे त्वचा काळी होण्यापासून बचाव होतो आणि त्वचेचा टोन गडद किंवा हलका होतो. तर मशरूमचे सेवन केल्याने त्वचा नैसर्गिकरित्या हलकी होते आणि टॅनिंग नाहीशी होण्यास मदत होते. दाह आणि रॅशेश निघतात - शिताके (Shiitake) नावाच्या मशरूमची एक विशेष प्रजाती त्वचेवरील दाह, रॅशेश, जळजळ इत्यादी दूर करण्यासाठी प्रभावी आहे. हे वाचा - तरुण वयातील हा त्रास उतारवयात अनेक अडचणी आणू शकतो; आत्तापासूनच घ्या काळजी त्वचा निरोगी ठेवते - व्हाईट बटन मशरूममध्ये भरपूर प्रथिने असतात जे त्वचेच्या ऊतींची दुरुस्ती आणि त्यांना निरोगी ठेवण्यास मदत करतात. हे वाचा - उन्हाळ्यात दातांच्या चांगल्या आरोग्यासाठी या 5 गोष्टी आहेत महत्त्वाच्या मुरुमे कमी होतील - मुरुमांची समस्या ही तरुणांमध्ये एक सर्वसामान्य समस्या आहे, ज्याचा अनेकांना त्रास होतो. पिंपल्सपासून सुटका मिळवण्यासाठी मशरूम खाणे फायदेशीर आहे. त्यात आढळणारे व्हिटॅमिन डी पिंपल्सपासून आराम देते. (सूचना : येथे दिलेली माहिती सामान्य वैद्यकीय माहितीवर आधारित आहे. न्यूज 18 लोकमत त्याची हमी देत नाही.)
    Published by:News18 Desk
    First published:

    Tags: Skin, Skin care

    पुढील बातम्या