मराठी बातम्या /बातम्या /लाइफस्टाइल /एकट्यानं बाहेर पडताना नक्की सोबत ठेवा पेपर स्प्रे; घरीच आणि कमी वेळात असा बनवू शकता

एकट्यानं बाहेर पडताना नक्की सोबत ठेवा पेपर स्प्रे; घरीच आणि कमी वेळात असा बनवू शकता

एकट्याने घराबाहेर पडताना घ्यायच्या आवश्यक गोष्टींमध्ये पेपर स्प्रे ठेवणे फार महत्वाचे आहे. तसे, अनेक प्रकारचे पेपर स्प्रे बाजारात सहज उपलब्ध आहेत. हा स्प्रे घरीच बनवण्याची पद्धत खूप (Tips to make pepper spray) सोपी आहे.

एकट्याने घराबाहेर पडताना घ्यायच्या आवश्यक गोष्टींमध्ये पेपर स्प्रे ठेवणे फार महत्वाचे आहे. तसे, अनेक प्रकारचे पेपर स्प्रे बाजारात सहज उपलब्ध आहेत. हा स्प्रे घरीच बनवण्याची पद्धत खूप (Tips to make pepper spray) सोपी आहे.

एकट्याने घराबाहेर पडताना घ्यायच्या आवश्यक गोष्टींमध्ये पेपर स्प्रे ठेवणे फार महत्वाचे आहे. तसे, अनेक प्रकारचे पेपर स्प्रे बाजारात सहज उपलब्ध आहेत. हा स्प्रे घरीच बनवण्याची पद्धत खूप (Tips to make pepper spray) सोपी आहे.

मुंबई, 15 मे : आजकाल झपाट्याने वाढत चाललेल्या गुन्हेगारीच्या घटना पाहता घराबाहेर पडणं कधीही धोकादायक ठरू शकतं. विशेषत: महिला, लहान मुले व वृद्धांना एकट्याने घराबाहेर पडताना अनेकवेळा विचार करावा लागतो. आजच्या व्यग्र जीवनशैलीत नेहमी एखाद्या व्यक्तीला सोबत घेऊन जाणं अशक्य आहे, म्हणून बाहेर पडताना सुरक्षेसाठी मिरपूड स्प्रे (Pepper spray) सोबत नक्की घ्यायचा. हा स्प्रे घरीच बनवण्याची पद्धत खूप (Tips to make pepper spray) सोपी आहे.

एकट्याने घराबाहेर पडताना घ्यायच्या आवश्यक गोष्टींमध्ये पेपर स्प्रे ठेवणे फार महत्वाचे आहे. तसे, अनेक प्रकारचे पेपर स्प्रे बाजारात सहज उपलब्ध आहेत. पण जर तुम्हाला मार्केट बेस्ड पेपर स्प्रे वापरायचा नसेल तर तो घरीही बनवता येतो. आज आम्ही तुम्हाला पेपर स्प्रे बनवण्याची सोपी घरगुती पद्धत सांगतो.

होममेड पेपर स्प्रे कसा बनवायचा -

घरी मिरपूड स्प्रे तयार करण्यासाठी काळी मिरी आणि लाल तिखट वापरा. काळी मिरी आणि लाल मिरची पावडरमध्ये थोडे पाणी मिसळून घट्ट पेस्ट तयार करा. आता या पेस्टमध्ये 1 ग्लास पाणी घाला. नीट मिक्स करून गॅसवर गरम करायला ठेवा. 1 उकळी आल्यावर गॅस बंद करा. आता मिरचीचे हे द्रावण थंड करा आणि स्प्रे बाटलीत भरा. घरच्या-घरी तुमचा मिरचीचा स्प्रे तयार झाला. घराच्या कोणत्याही कोपऱ्यात स्प्रे करून तुम्ही तो वापरून पाहू शकता. मात्र, पेपर स्प्रे बनवताना काही खबरदारी घेणे अत्यंत आवश्यक आहे.

हातांची काळजी -

पेपर स्प्रे बनवण्यापूर्वी आपल्या हातांना हातमोजे घालण्यास विसरू नका. यामुळे तुमच्या हातावर मिरची पडण्यापासून बचाव होईल आणि तुम्ही सुरक्षित राहाल.

डोळ्यांवर चष्मा लावा -

मिरपूड स्प्रे बनवताना मिरची पावडर उडू शकते आणि डोळ्यात जाऊ शकते, ज्यामुळे डोळे होरपळू शकतात. त्यामुळे पेपर स्प्रे बनवताना डोळ्यांची काळजी घेणे अत्यंत आवश्यक आहे. त्यामुळे स्प्रे बनवण्यापूर्वी डोळ्यांना चष्मा लावा.

हे वाचा - 16 मे रोजी आहे पहिलं चंद्रग्रहण, गर्भवती महिलांनी चुकूनही करू नयेत ही 5 कामं

नॅपकिन्स जवळ ठेवा -

स्प्रे बनवण्यापूर्वी काही नॅपकिन्स सोबत ठेवा. जेणेकरून चुकून तुमच्या त्वचेवर तिकट पावडर पडली तर रुमालाच्या मदतीने त्वचेचा तो भाग लगेच स्वच्छ करता येईल.

हे वाचा - जास्त आलं खाल्ल्यानं Low होऊ शकतं ब्लड प्रेशर, त्याचे हे साईड इफेक्ट जाणून घ्या

मुलांना लांब ठेवा -

पेपर स्प्रे बनवताना मुलांना दूर राहण्याचा सल्ला द्या. तसेच, स्प्रे बनवल्यानंतर पेपर स्प्रे बाटली मुलांच्या कधीच हाताला लागणार नाही अशा ठिकाणी ठेवण्याचा प्रयत्न करा.

First published:
top videos

    Tags: Lifestyle, Safety, Women safety