नवी दिल्ली, 10 जून : कोरोना रुग्णांची (corona patient) संख्या दिवसेंदिवस वाढते आहे. रुग्णालयात बेड्सची संख्या कमी पडू लागली आहे. आरोग्य तज्ज्ञांच्या मते, प्रत्येक कोरोना रुग्णाला उपचारासाठी रुग्णालयात दाखल होण्याची गरज नाही. होम क्वारंटाइन होऊन घरच्या घरीदेखील ते उपचार घेऊ शकतात. मात्र आपल्याला रुग्णालयात जाण्याची गरज आहे की नाही हे कसं समजावं यासाठी दिल्लीचे आरोग्यमंत्री सतेंद्र जैन (Health Minister Satendra Jain) यांनी फॉर्म्युला सांगितला आहे.
कोरोना पॉझिटिव्ह रिपोर्ट आल्यानंतर आपला रेस्पिरेटरी रेट (respiratory rate) म्हणजे श्वसन दर तपासा. त्यामुळे तुम्हाला रुग्णालयात जाण्याची गरज आहे की नाही हे समजेल, असं आरोग्यमंत्र्यांनी सांगितलं.
आरोग्य मंत्री सत्येंद्र जैन यांनी सांगितल्यानुसार, "ज्या रुग्णांचा रेस्पिरेटरी रेट म्हणजे श्वसन दर एका मिनिटाला पंधरापेक्षा जास्त आहे, ते सर्व मॉडरेट कॅटगिरीत येतात. ज्या रुग्णांचा श्वसन दर प्रति मिनिट 30 पेक्षा अधिक आहे, ते गंभीर स्थितीत येतात. फक्त मध्यम आणि गंभीर परिस्थिती येणाऱ्या रुग्णांनाच उपचारासाठी रुग्णालयात जाण्याची गरज आहे. लक्षण नसलेले किंवा सौम्य लक्षण असलेले रुग्ण ज्यांचा रेस्पिरेटरी रेट 15 पेक्षा कमी आहे. त्यांना रुग्णालयात जाण्याची गरज नाही, ते होम क्वारंटाइन होऊ शकतात"
या रुग्णांना लागू होणार नाही फॉर्म्युला
बहुतेक आरोग्य तज्ज्ञ आरोग्यमंत्र्यांच्या या फॉर्म्युल्याशी सहमत नाही. ज्या रुग्णांना इतर आजार आहेत, त्यांना हा फॉर्म्युला लागू नाही होणार. कारण असे भरपूर आजार आहेत, ज्याच्यामध्ये हेल्थ पॅरामीटर वरखाली होत असतात आणि या हेल्थ पॅरामीटरवर फक्त रुग्णालयातच लक्ष ठेवता येऊ शकतं, असं तज्ज्ञ म्हणालेत.
हे वाचा - तब्बल 8 दिवस हॉस्पिटलच्या बाथरूममध्ये पडून होता कोरोनाबाधित महिलेचा मृतदेह
दिल्लीतील मेडॉर हॉस्पिटलमधील वरिष्ठ डॉक्टर डॉ. मनोज शर्मा म्हणाले, "हा फॉर्म्युला ज्यांना हृदयाची समस्या, ब्लड प्रेशर किंवा मधुमेहासारखा दुसरा कोणता आजार नाही अशा तरुण रुग्णांनाच हा फॉर्म्युला लागू होईल. जर तुम्ही कोरोनाग्रस्त आहात आणि तुम्हाला इतर आजार असतील तर तुम्हाला डॉक्टरांच्या सल्ल्याची गरज आहे. वृद्ध व्यक्तींना हा फॉर्म्युला लागू होऊ शकत नाही. वयस्कर व्यक्तींचं हेल्थ पॅरामीटर वेगानं बदलतं. त्यामुळे आपल्याला सावध राहण्याची गरज आहे. असे कित्येक वयोवृद्ध आहेत, जे घरात एकटे राहतात आणि त्यांची देखभाल फक्त रुग्णालयातच होऊ शकते"
घरच्या घरी कसा ओळखाल रेस्पिरेटरी रेट
डॉ. मनोज शर्मा यांनी दिलेल्या माहितीनुसार, सामान्यपणे श्वसन दर 12 ते 16 च्या दरम्यान असतं. जर हा श्वसन दर 16 ते 28 च्या दरम्यान असेल तर अधिक चिंतेची बाब नाही. मात्र जर 28 पेक्षा जास्त असेल तर डॉक्टरांकडे जाणं गरजेचं आहे.
हे वाचा - तीर्थ समजून प्यायला सॅनिटायझर, सुनील ग्रोवरने शेअर केला VIDEO
इंद्रप्रस्थ अपोलो हॉस्पिटलचे वरिष्ठ डॉक्टर तरुण सहानी यांनी सांगितलं, "एक स्टॉप वॉच लावून एका मिनिटात तुम्ही किती वेळा श्वास घेता ते तपासा. एका मिनिटात तुम्ही जितक्या वेळा श्वास घेता तो तुमचा रेस्पिरेटरी रेट आहे"
"श्वासोच्छवासात पोटाची हालचाल होते. त्यामुळे पोटामार्फत श्वसनदर तपासणं सोप आहे. पोट एका वेळी वर-खाली होणं म्हणजे एक श्वसन दर. असं पोटावर घड्याळ ठेवून एका मिनिटात तुमचं पोट किती वेळा वर खाली होतं ते तपासा, तुम्हाला तुमचा श्वसनदर समजेल", असं डॉ. मनोज शर्मा यांनी सांगितलं.
संपादन - प्रिया लाड
हे वाचा - ...तर पावसाळ्यात 5 पट जास्त होणार कोरोनाचा प्रसार! IIT चा भीती वाढवणारा रिसर्च मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर.
आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.