Home /News /viral /

तीर्थ समजून प्यायला सॅनिटायझर, सुनील ग्रोवरने शेअर केला VIDEO

तीर्थ समजून प्यायला सॅनिटायझर, सुनील ग्रोवरने शेअर केला VIDEO

सुनील ग्रोवरनं व्हिडीओ अपलोड केल्यानंतर 5 लाख 81 हजारहून अधिक वेळा पाहण्यात आला आहे.

  नवी दिल्ली, 10 जून : प्रसिद्ध कॉमेडियन मशहूर गुलाटी डॉ. सुनील ग्रोवरने सोशल मीडियावर एक व्हिडीओ शेअर केला आहे. हा व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. कोरोना व्हायरसमुळे सोशल डिस्टन्स आणि सॅनिटायझर हे आपल्या रोजच्या जगण्यातील अविभाज्य भाग आहेत. कोरोनाचा संसर्ग टाळण्यासाठी प्रत्येकवेळी सॅनिटायझरनं हात स्वच्छ करण्याचं आवाहन केलं जात आहे. एका तरुणाला हातावर सॅनिटायझर दिल्यानंतर त्यानं काय केलं हे पाहून तर तुम्ही हैराण व्हाल. रस्त्यावरून येणाऱ्या जाणाऱ्या लोकांना हातावर सॅनिटायझर दिलं जात असताना एका तरुणानं तर हैराण करण्यासारखी गोष्ट केली. या तरुणाला हातावर दिलेलं सॅनिटायझर तीर्थ वाटल्यानं प्यायला. सुनील ग्रोवरनं हा व्हिडीओ आपल्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर शेअर केला आहे.
  View this post on Instagram

  🙈

  A post shared by Sunil Grover (@whosunilgrover) on

  या व्हिडीओमध्ये तरुण तीर्थ समजून सॅनिटायझर प्यायला जात असल्याचं दिसत आहे. हे तीर्थ तोंडात घेण्याआधी स्थानिकांनी तरुणाला रोखलं आणि हे तीर्थ नाही सॅनिटायझर असल्याचं समजवलं. सुनील ग्रोवरनं व्हिडीओ अपलोड केल्यानंतर 5 लाख 81 हजारहून अधिक वेळा पाहण्यात आला आहे. हे वाचा-अजब केमिस्ट्री! ऑनलाइन क्लास घेण्यासाठी केला जुगाड, VIDEO VIRAL हे वाचा-VIDEO : नदीत अंघोळ करताना मगरीनं केला हल्ला, मित्रानं असा वाचवला जीव संपादन- क्रांती कानेटकर
  Published by:Kranti Kanetkar
  First published:

  Tags: Coronavirus, Sunil grover, Viral video.

  पुढील बातम्या