Home /News /lifestyle /

तुम्ही बनावट तूप तर खात नाही ना? अशी ओळखा तुपातील भेसळ

तुम्ही बनावट तूप तर खात नाही ना? अशी ओळखा तुपातील भेसळ

बाजारात शुद्ध देशी तूप (Pure Ghee) आणि भेसळयुक्त तूप अगदी सर्रास विकलं जातंय त्यामुळे तुम्ही जर तूप खात असाल तर सावध राहणं गरजेचं आहे.

  नवी दिल्ली, 1 जून: तूप (Ghee) हा भारतीय भोजनातील महत्त्वाचा घटक आहे. दूधदुभतं भरपूर असलेल्या प्रदेशांत तर शेतकरी भाजीही तुपातच तयार करतात. रोजच्या जेवणात तूप खाणारीही अनेक कुटुंब आहेत. पण या तुपातच अनेकदा भेसळ केली जाते आणि ते विकलं जातं. नुकतंच हरियाणातील फरिदाबादमध्ये पोलिसांनी भेसळयुक्त तूप तयार करणाऱ्या फॅक्टरीवर धाड टाकून फसवणूक करणाऱ्यांना पकडलं होतं. पण बाजारात शुद्ध देशी तूप (Pure Ghee) आणि भेसळयुक्त तूप अगदी सर्रास विकलं जातंय त्यामुळे तुम्ही जर तूप खात असाल तर सावध राहणं गरजेचं आहे. भेसळयुक्त तुपात 40 टक्के रिफाइंड तेल (Refined Oil) आणि 60 टक्के वनस्पती तूप (रूढ नाव डालडा DALDA) घातलेलं असतं. तसंच त्यात उकडलेले बटाटे आणि कोलतारही मिसळतात. डालडा रवाळ असतो म्हणूनच तो बनावट तुपात घालतात. पण या तुपाचा दर्जा अस्सल वाटावा म्हणून या बनावट तुपातही अस्सल देशी तूप 10 टक्के घातलं जातं. देशी तुपासारखा वास येण्यासाठी देशी तुपाचा सेंटही या बनावट तुपात मिसळतात.

  (वाचा - Work form Home च्या जास्तीच्या तासांनी वाढतायत मृत्यू; WHO चा धक्कादायक रिपोर्ट)

  अस्सल तूप कसं ओळखायचं? - एका भांड्यात एक चमचा तूप गरम करा. जर तूप लगेच वितळून त्याचा रंग करडा झाला तर ते अस्सल आहे आणि वितळून तूप पिवळं झालं तर ते भेसळयुक्त तूप आहे. - हातात थोडं तूप घ्या (Ghee). आता हात उलटा करून दुसऱ्या हातावर चोळा. जर तुपात रवाळपणा जाणवला, तर ते बनावट तूप आहे. अस्सल तूप हातावर पडल्यापडल्या पसरतं. ही अस्सल तूप ओळखायची सर्वांत योग्य पद्धत आहे.

  (वाचा - स्वयंपाकाशिवाय बेकिंग सोड्याचा असा करा वापर; खुलेल त्वचेचं सौंदर्य)

  - एक चमचा तुपात चार-पाच थेंब आयोडिन (Iodine) टाका. जर रंग नीळा झाला, तर तुपात उकडलेला बटाटा मिसळला आहे हे नक्की. - एक चमचा तुपात हायड्रोक्लोरिक अ‍ॅसिड (Hydrochloric Acid) आणि एक चिमुट साखर टाका. जर त्या तुपाचा रंग लाल झाला, तर त्या तुपात डालड्याची भेसळ आहे हे नक्की. - हातावर एकच चमचा तूप घ्या. जर ते लगेच वितळायला लागलं, तर ते शुद्ध तूप आहे. जर ते तूप घट्ट झालं आणि त्याचा वास येणं बंद झालं तर ते भेसळयुक्त तूप आहे.
  Published by:Karishma
  First published:

  Tags: Dairy, Ghee, Milk combinations

  पुढील बातम्या