मराठी बातम्या /बातम्या /लाइफस्टाइल /केक करण्यासाठी आणला असेल बेकिंग सोडा; पण त्याचा असा वापर करून पाहिला का?

केक करण्यासाठी आणला असेल बेकिंग सोडा; पण त्याचा असा वापर करून पाहिला का?

ब्लॅकेहड्स काढण्यासाठी बेकिंग सोडा वापरता येतो.

ब्लॅकेहड्स काढण्यासाठी बेकिंग सोडा वापरता येतो.

स्वयंपाकघरातला उपयोगी येणारा पदार्थ म्हणजे बेकिंग सोडा (Baking Soda). बेकिंग सोड्याचे बेकिंग किंवा स्वयंपाकाव्यतिरिक्तचे 9 उपयोग ज्याबद्दल तुम्हाला माहिती नसेल.

दिल्ली, 1 जून: प्रत्येकाच्या स्वयंपाक घरामध्ये सहजपणे सापडणारा पदार्थ म्हणजे बेकिंग सोडा (Baking Soda). बेकिंग सोडा हा अनेक पदार्थ बनवण्यासाठी उपयोगी येतो. बेकिंग सोड्याला सोडियम बायकार्बोनेट (Sodium Bicarbonate) किंवा सोडियम हायड्रोजन कार्बोनेट (Sodium  Hydrogen Carbonate) असंही म्हटलं जातं. मिठाप्रमाणेच पांढऱ्या रंगाच्या भुकटी सारखा असणारा हा पदार्थ अल्कली (Alkali)गुणधर्माचा असतो. ढोकळा,केक बनवण्यासाठी बेकिंग सोडा वापरला जातो. बेकिंग सोड्याचा वापर हा स्वयंपाकाबरोबर इतरही गोष्टींसाठी करता येतो. आपली त्वचा तजेलदार (radiant Skin) आणि नितळ दिसण्यासाठी आपण कितीतरी प्रकारचे प्रॉडक्ट वापरत असतो. मात्र काही घरगुती आणि सोप्या उपायांनी (Home remedies) आपली त्वचा सुंदर दिसू शकते. घरामधला असाच उपयोगी येणारा पदार्थ म्हणजे बेकिंग सोडा. बेकिंग सोड्याचा वापर कसा करायचा जाणून घेऊयात.

त्वचा होईल चमकदार

यासाठी तुम्हाला बेकिंग सोडा आणि ऍपल साईडर व्हिनेगर (Apple cider vinegar) लागेल. ऍपल साईडर व्हिनेगर चेहऱ्यावरील डेड स्किन काढून टाकण्यात मदत करत. यासाठी एक चमचा बेकिंग सोडा आणि दोन मोठे चमचे ऍपल साईडर व्हिनेगर एकत्र करा. हे मिश्रण चेहर्‍यावर लावा आणि हलक्या हाताने मसाज करा. थोड्या वेळानंतर धृऊन टाका.

ब्लॅकहेड्ससाठी बेकिंग सोडा

(प्रेग्नंट व्हायचंय, लैंगिक संबंध ठेवण्याची योग्य वेळ कोणती?)

ब्लॅकेहड्स काढण्यासाठी बेकिंग सोडा वापरता येतो. यासाठी टूथपेस्ट आणि बेकिंग सोडा यांची पेस्ट बनवा. ही पेस्ट ब्लॅकेहड्स असलेल्या ठिकाणी लावा. थोडावेळ मसाज करून तशीच राहू द्या. काही वेळानंतर धुऊन टाका. यामुळे ब्लॅकेहड्स निघून जातील.

मुरुमांवर उपयोगी

चेहऱ्यावर मोठ्या प्रमाणात पिंपल्स येत असतील तर, बेकिंग सोडा फायदासीर आहे. एक मोठा चमचा बेकिंग सोडा घ्या आणि त्यामध्ये थोडसं पाणी मिसळून याची पेस्ट बनवा. ही पेस्ट पंधरा मिनिटांसाठी चेहऱ्यावर लावा. थोड्यावेळाने चेहरा धुऊन टाका. याचा नियमित उपयोग केल्यास चेहऱ्यावरील पिंपल्स निघून जाती.

(Black Fungus ने 26 राज्यांत पसरले हातपाय; राज्यातील स्थिती भयानक)

निस्तेज त्वचेसाठी

गुलाब पाणी आणि बेकिंग सोडा यांचं मिश्रण तुमची त्वचा उजळण्यासाठी मदत करेल. गुलाब पाण्याने पीएच लेव्हल बॅलन्स होते तर, रेडनेस देखील कमी होतो. यासाठी बेकिंग सोडा आणि गुलाब पाणी एकत्र करा ही पेस्ट चेहऱ्यावर लावा. सुकल्यानंतर थंड पाण्याने धुऊन टाका आठवड्यातून एकदा हा उपाय तुम्ही करू शकता.

त्वचेवरचे डाग जातील

प्रत्येकालाच आपली त्वचा नितळ असावी असं वाटतं. चेहऱ्यावर डाग असतील तर आपला चेहरा खराब दिसतो. यावर देखील बेकिंग सोड्याचा वापर करता येतो. एक मोठा चमचा लिंबाचा रस आणि एक मोठा चमचा नारळाचं तेल एकत्र करा. यामध्ये एक चमचा बेकिंग सोडा मिसळा हे मिश्रण दहा मिनिटांसाठी चेहऱ्यावर लावून मसाज करा. लिंबामध्ये विटामिन सी असतं त्यामुळे त्वचा उजळते आणि बेकिंग सोड्यामुळे चेहऱ्यावरील पिग्मेंटेशन कमी होतं. पाण्यात बेकिंग सोडा वापरल्यास शरीरावरील डेड स्कीन निघून जाते.

(पावसाळ्यात कोरोनाबरोबरच संसर्गजन्य आजाराची भीती; कशी घ्याल काळजी?)

कोंडा जाईल निघून

बेकिंग सोडा केसांसाठी देखील फायदेशीर आहे. बेकिंग सोड्याच्या वापराने केसांमधील कोंडा निघून जातो. यासाठी काही दिवस शॅम्पू लावण बंद करा आणि बेकिंग सोडा केसांच्या मुळाशी लावा. बेकिंग सोड्यामुळे केसांची त्वचा देखील चांगली होते.

दातांचा पिवळेपणा

दातांचा पिवळेपणा घालवण्यासाठी देखील बेकिंग सोडा फायदेशीर आहे. त्यासाठी बेकिंग सोडा पाण्यामध्ये मिसळा आणि हळूहळू बोटाने दातांवर मसाज करा. दातांवरील पिवळेपणा कमी होईल.

(उन्हाळ्यातलं वरदान! झटपट वजन कमी करण्यासाठी अशी खा काकडी)

काळे अंडरआर्म्स

अंडरआर्म्समध्ये काळेपणा असेल तर, तो दूर करण्यासाठी देखील बेकिंग सोडा वापरता येतो. त्यासाठी 5 मिनटं बेकिंक सोडा लावून धुवून टाकावा.

तोडांची दुर्गंधी

तोंडाला दुर्गंधी येत असेल तर, अर्धा ग्लास पाण्यामध्ये बेकिंग सोडा मिसळून या पाण्याने चूळ भरल्यास दुर्गंध दूर होईल.

First published:
top videos

    Tags: Health Tips, Skin care