मराठी बातम्या /बातम्या /लाइफस्टाइल /

Nutrition Week 2021: अशी ओळखा भाज्या, हळद, मीठ आणि दुधातली भेसळ

Nutrition Week 2021: अशी ओळखा भाज्या, हळद, मीठ आणि दुधातली भेसळ

तुम्ही अगदी घरच्याघरी देखील हळद, भाज्या, मसाले, दुधातील भेसळ अगदी सहजपणे ओळखू शकता. कसे?

तुम्ही अगदी घरच्याघरी देखील हळद, भाज्या, मसाले, दुधातील भेसळ अगदी सहजपणे ओळखू शकता. कसे?

तुम्ही अगदी घरच्याघरी देखील हळद, भाज्या, मसाले, दुधातील भेसळ अगदी सहजपणे ओळखू शकता. कसे?

नवी दिल्ली, 9 सप्टेंबर: अलीकडं अन्न भेसळीचं (Food Adulteration) प्रमाण लक्षणीय वाढताना दिसत आहे. भेसळयुक्त अन्न सेवन केल्यास त्याचा आरोग्यावर प्रतिकूल परिणाम होऊ शकतो. सरकारी यंत्रणा किंवा एफएसएसएआय (FSSAI) विभाग अन्न भेसळ रोखण्यासाठी संबंधितांवर वारंवार कारवाई करत असते. मात्र कारवाई होऊन देखील अन्न भेसळ थांबलेली नाही. 1 सप्टेंबर ते 7 सप्टेंबर 2021 दरम्यान राष्ट्रीय पोषण सप्ताह (National Nutrition Week) साजरा केला गेला. अन्नातील भेसळ ओळखणं आणि ती रोखणं याविषयी या सप्ताहादरम्यान प्रबोधन केलं जातं. तुम्ही अगदी घरच्याघरी देखील भाज्या, मसाले, दूधातील भेसळ अगदी सहजपणे ओळखू शकता आणि त्यापासून होणाऱ्या दुष्परिणामांपासून दूर राहू शकता. ही भेसळ कशी ओळखावी, याबाबतची माहिती आज तकनं दिली आहे. जाणून घेऊया त्याविषयी सविस्तर...

हिरव्या पालेभाज्या, दूध, अंडी आदी पदार्थ पोषणाच्या दृष्टीनं महत्वाची असतात. परंतु, भेसळीमुळं हे पदार्थ लाभदायी ठरण्याऐवजी नुकसानकारक ठरतात. त्यामुळे आपण खात असलेले पदार्थ भेसळयुक्त नाहीत ना, असा विचार तुमची चिंता नक्कीच वाढवू शकतो. पण आता काळजी करण्याचं कारण नाही. या पदार्थांमधील भेसळ तुम्हीदेखील सहजपणे ओळखू शकता. तुम्ही बाजारातून खरेदी केलेल्या भाजीपाला, अंड्यांचा दर्जा योग्य आहे की नाही हे देखील पडताळून पाहता येऊ शकतं. फूड सेफ्टी अॅण्ड स्टॅंडर्ड ऑथरिटी ऑफ इंडियानं यासाठीची साधी पध्दत सांगितली आहे.

तुम्हीही घेत असाल ही औषधं तर चुकूनही पिऊ नका कॉफी नाहीतर...

तसेच हळदीतील (Turmeric) भेसळ ओळखण्यासाठी, तिचा दर्जा तपासण्यासाठी दोन ग्लास अर्ध्या पाण्यानं भरून घ्या. एका ग्लासात एक चमचा शुध्द हळद पावडर टाका आणि दुसऱ्या ग्लासात भेसळयुक्त हळद पावडर टाका. शुध्द हळद पावडर ग्लासाच्या तळाला जाईल आणि पाण्याचा रंग फिकट पिवळा होईल. दुसऱ्या ग्लासातील हळद पावडर पूर्णतः ग्लासाच्या तळाला जाणार नाही आणि पाण्याचा रंग गडद पिवळा होईल. या पद्धतीने भेसळयुक्त आणि शुध्द हळदीचं परीक्षण करता येते.

याच पद्धतीनं भेसळयुक्त मीठाचं (Salt) परीक्षण करता येतं. यासाठी एक बटाटा मधोमध कापून घ्यावा. त्यातील एका तुकड्यावर शुध्द मीठ तर दुसऱ्या तुकड्यावर भेसळयुक्त मीठ टाकावं. दोन्हीवर दोन थेंब लिंबू रस टाकावा. भेसळयुक्त मीठामुळं बटाटयाचा तुकडा आतल्याबाजूनं हलका निळा किंवा काळा पडेल. मात्र शुध्द मीठ टाकलेल्या तुकड्यावर कोणताही परिणाम दिसणार नाही.

काही दिवसांपूर्वी MyGovIndia ने आपल्या व्टिटर हॅंडलवरून अंड्याचा (Eggs) दर्जा कसा तपासावा, हे दाखवणारा एक व्हिडीओ शेअर केला होता. त्यानुसार, एका ग्लासात पाणी घ्यावं. हा ग्लास अर्धा भरावा. त्यानंतर एक अंडं त्या ग्लासात सोडावं. पाण्यात बुडल्यानंतर हे अंडं तीन पोझिशनमध्ये दिसू शकतं. जर हे अंडं पाण्याच्या तळाशी पूर्णतः गेलं तर ते दर्जेदार समजावं. मात्र अन्य दोन पोझिशनमध्ये अंडं दिसू लागले तर ते खाण्यास अयोग्य समजावं.

जर अंडं तळाशी जाऊन उभं राहिलं तर ते शिळं आहे असं समाजवं. जर अंडं पाण्यात सोडल्यानंतर तरंगू लागलं तर ते आतून खराब असतं. अशा दोन्ही प्रकारे दिसणारी अंडी ही आरोग्यासाठी घातक ठरू शकतात.

जास्त Ketchup खाणं ठरू शकते धोकादायक; Side Effects ने 'या' आजारांची होऊ शकते लाग

भाज्यांमधील (Vegetables) भेसळ कशी ओळखावी, हे सांगणारा एक व्हिडीओ नुकताच एफएसएसएआयनं नुकताच व्टिटर हॅंडलवरून शेअर केला आहे. त्यात कापसाचा एक बोळा लिक्विड पॅराफीनमध्ये भिजवून घ्यावा. या कापसाचा बोळा भाज्यांवर हलका घासावा. त्यानंतर काही क्षणातच भाजी भेसळयुक्त आहे की शुध्द हे समजते, असं दाखवण्यात आलं आहे. यात कापसाच्या बोळ्याचा रंग हिरवा झाला तर भाजीत भेसळ आहे असं समजावं. जर कापसाचा रंग बदलला नाही तर भाजी शुध्द आहे, असं समजावं. भाज्या हिरव्यागार दिसव्यात यासाठी मॅलाकाइट ग्रीन या टेक्सटाइल रंगाचा वापर केला जातो. हे रसायन माश्यांवर इलाज करण्यासाठी अँटिप्रोटोझोअल आणि अँटिफंगल म्हणून वापरलं जातं. हे अनेक उद्योगांमध्ये परजीवी नाशक म्हणून वापरलं जातं. मासे आणि सागरी जीवांमध्ये हेलमिन्थ्समुळे होणारे बुरशीजन्य आजार किंवा प्रोटोझोआन संसर्गापासून बचावासाठी हे रसायन वापरलं जातं. तसेच याचा वापर मिरची, मटार आणि पालका सारख्या भाज्या हिरव्यागार दिसाव्यात यासाठी देखील होतो.

मंदिरातून आणलेली फुलं सुकल्यानंतर काय करावं? एकदा वाचाच

नॅशनल सेंटर फॉर बायोटेक्नॉलॉजी इन्फॉर्मेशनच्या माहितीनुसार, या रंगातील विषारी गुणधर्म हे कालावधी आणि तापमानापरत्वे वाढत जातात. यामुळे कर्करोगास कारणीभूत ठरणाऱ्या कार्सिनोजेनेसिस, म्युटाजेनेसिस, क्रोमोसोमल फ्रॅक्चर, टेराटोजेनिकिटी आणि रेस्पिरेटरी टॉक्सिटी देखील होऊ शकते. यामुळे मल्टी ऑर्गन टिश्यूंवरही परिणाम होतो.

First published:

Tags: Food, Health, Processed food