• Home
  • »
  • News
  • »
  • lifestyle
  • »
  • तुम्हीही घेत असाल ही औषधं तर चुकूनही पिऊ नका कॉफी नाहीतर...

तुम्हीही घेत असाल ही औषधं तर चुकूनही पिऊ नका कॉफी नाहीतर...

औषधं घेतल्यानंतर कॉफी पिणं नुकसानदायक ठरू शकतं.

  • Share this:
रोम, 08 सप्टेंबर : आपल्याला बहुतांश वेळा डॉक्टर सकाळ-दुपार-रात्र अशा वेळी घेण्याचा सल्ला देतात. सकाळी काही गोळ्या या उपाशीपोटी घ्यायच्या असतात तर काही गोळ्या नाश्ता करून घ्यायच्या असतात. त्यामुळे सकाळच्या वेळी गोळ्या घेतल्यानंतर चहा-कॉफी पिणं आलंच. पण काही ठराविक औषधं घेतल्यानंतर चुकूनही कॉफी पिऊ नये (Skip coffee after medicine). कारण ही औषधं किंवा गोळ्या घेतल्यानंतर कॉफी प्यायल्यास त्याचे गंभीर दुष्परिणाम (Coffee side effects) होण्याची शक्यता आहे. इटलीचे एंडोक्रायनॉलॉजी (endocrinology) अभ्यासक लुईजी बर्रेआ (Luigi Barrea) यांच्या नेतृत्वाखाली करण्यात आलेल्या एका आंतरराष्ट्रीय संशोधनात ही बाब समोर आली आहे. कोणत्याही प्रकारची औषधं घेतल्यानंतर कॉफी पिणं टाळण्याचा (Skip coffee after taking tablets) सल्ला या संशोधकांनी दिला आहे. गोळ्या घेतल्यानंतर लगेच कॉफी प्यायल्यास त्या औषधाचं शरीरात शोषलं जाणं म्हणजेच अॅब्सॉर्प्शन (Absorption), वितरण म्हणजेच डिस्ट्रिब्युशन (Distribution), चयापचय म्हणजे मेटाबॉलिझम (Metabolism) आणि उत्सर्जन म्हणजे एक्स्क्रीशन (Excretion) या टप्प्यांवर परिणाम होतो. यामुळे या औषधांचा पूर्ण फायदा आपल्या शरीराला मिळत नाही, असं या अभ्यासात समोर आलं आहे. हे वाचा - ग्रीन टी पिऊन पिऊन कंटाळलात; वजन कमी करण्यासाठी आता प्या हा चहा संशोधकांनी हा सल्ला सर्वच औषधांबाबत दिला असला, तरी काही विशेष आजारांबाबत तुम्ही अधिक खबरदारी (Avoid coffee after taking pills) घेणं आवश्यक आहे. थायरॉइड - थायरॉइडची औषधं रिकाम्या पोटी घेण्याचा सल्ला दिला जातो. तसंच, ही औषधं घेतल्यानंतर सुमारे अर्धा तास काहीही खाणं (Avoid eating after taking thyroid pills) वा पिणं टाळावं, जेणेकरून ते औषध आपल्या शरीरात पूर्णपणे मिसळून जायला मदत होईल. यासोबतच, ऑस्टिओपोरॉसिस या आजाराचं औषध घेतल्यानंतरही कॉफी पिणं टाळावं, अन्यथा याच्या औषधांचा परिणाम कमी होतो. अॅसिड रिफ्लक्स - या आजाराशी संबंधित औषधंही रिकाम्या पोटी घेणं आवश्यक असतं. कॉफीमध्ये बऱ्याच प्रमाणात अॅसिड असतं. त्यामुळे ही औषधं घेतल्यानंतर कॉफी पिणं टाळावं. अन्यथा या औषधांचा काहीच परिणाम होत नाही. हृदयरोगाशी संबंधित औषधं  - यासोबतच कॉफीमध्ये (Coffee harmful for medicine) ड्यूरेटिक प्रॉपर्टीज असतात. त्यामुळे हृदयरोगाशी संबंधित औषधं घेणाऱ्या व्यक्तींनीही गोळ्या घेतल्यानंतर कॉफी पिणं टाळावं. या आजारांसोबत उच्च रक्तदाब, डिस्ट्रेशन, हायपरअॅक्टिव्हिटी आणि इम्पल्सिव्हिटी यांसारख्या आजारांवर औषधं घेत असाल, तरीही तुम्ही गोळ्या घेतल्यानंतर लगेच (Avoid coffee if you’re taking these medicine) कॉफी पिणं टाळावं. कॉफीमध्ये असणाऱ्या कॅफेनमुळे तुमच्या औषधांचा परिणाम कमी होईल आणि तुमचा आजार बरा होण्यास जास्त वेळ लागू शकतो. हे वाचा - Perfect Tea चं 'गणित'! 'या' फॉर्म्युल्याने चहा बनवाल तर कधीच बिघडणार नाही कॉफीमुळे झोप लागत नाही हे आपल्या सर्वांनाच माहिती आहे. मात्र, कोल्ड मेडिसिन घेतल्यानंतर तुम्हाला झोपेची आवश्यकता असते. अशा वेळी गोळ्या घेतल्यानंतर कॉफी पिणं नुकसान पोहोचवू शकतं. त्यामुळेच तुम्हाला वेळेत बरं व्हायचं असेल, तर जोपर्यंत तुमचा औषधांचा कोर्स सुरू आहे, तोपर्यंत कॉफी न पिणं हेदेखील आपल्या पथ्यात जोडून घेणं आवश्यक आहे!
First published: