मराठी बातम्या /बातम्या /लाइफस्टाइल /

मंदिरातून आणलेली फुलं सुकल्यानंतर काय करावं? एकदा वाचाच

मंदिरातून आणलेली फुलं सुकल्यानंतर काय करावं? एकदा वाचाच

एखाद्या धार्मिक तीर्थस्थळी गेल्यानंतर तेथील मंदिरातील पुजाऱ्यांकडे अनेकजण फुलांचा हार (Importance Of Temple Flower) मागतात. तर, काही जण देवाच्या पादुकांवर, मूर्तीवर वाहिलेली फुलं (flowers), हार घेतात

एखाद्या धार्मिक तीर्थस्थळी गेल्यानंतर तेथील मंदिरातील पुजाऱ्यांकडे अनेकजण फुलांचा हार (Importance Of Temple Flower) मागतात. तर, काही जण देवाच्या पादुकांवर, मूर्तीवर वाहिलेली फुलं (flowers), हार घेतात

एखाद्या धार्मिक तीर्थस्थळी गेल्यानंतर तेथील मंदिरातील पुजाऱ्यांकडे अनेकजण फुलांचा हार (Importance Of Temple Flower) मागतात. तर, काही जण देवाच्या पादुकांवर, मूर्तीवर वाहिलेली फुलं (flowers), हार घेतात

मुंबई, 8 सप्टेंबर- एखाद्या धार्मिक तीर्थस्थळी गेल्यानंतर तेथील मंदिरातील पुजाऱ्यांकडे अनेकजण फुलांचा हार (Importance Of Temple Flower) मागतात. तर, काही जण देवाच्या पादुकांवर, मूर्तीवर वाहिलेली फुलं (flowers), हार घेतात. बऱ्याचदा मंदिरातील (temple) पुजारी सुद्धा देवावर (God) वाहिलेले फूल प्रसाद म्हणून भाविकांना देतात. याला देवाचा प्रसाद (blessings of God) समजून लोक घरी घेऊन येतात. पण जेव्हा हे फूल किंवा हार वाळून जातो तेव्हा सर्वात मोठा प्रश्न असा पडतो की आता या फुलांचं काय करावं? काही अशुभ होण्याच्या भितीमुळे लोक याला फेकायला सुद्धा घाबरतात. पण आता चिंता सोडा, कारण तुम्ही मंदिरातून आणलेल्या फुलांसोबत काय करावं, हे जाणून घेऊयात. एबीपीने दिलेल्या एका वृत्तानुसार, बऱ्याचदा आपण देवाच्या दर्शनासाठी मंदिरात जातो आणि तिथं पुजारी आपल्याला फुलांचा हार देतात किंवा काही फुलं देतात. देवाचा आशीर्वाद म्हणून ही फुले, हार आपण आनंदाने घरी आणतो. बऱ्याच वेळा काहीजण हा फुलांचा हार किंवा फुलांना त्यांच्या देवघरात ठेवतात, तर काही लोक ते घरामध्ये एखाद्या स्वच्छ ठिकाणी ठेवतात. एक-दोन दिवसांनी, जेव्हा ही फुले सुकतात, तेव्हा लोकांना या फुलांचे काय करायचे याची काळजी वाटू लागते. ही फुले फेकता येत नाहीत आणि ठेवताही येत नाहीत. एवढेच नाही तर फूल, हार फेकून दिल्यामुळे आपण नकळत काही पापात सहभागी होऊ शकतो, याची भितीही काही लोकांना वाटते. मग या हार आणि फुलांचे शेवटी काय करावे? याबाबत जाणून घेऊयात. (हे वाचा: गौरी-गणपतीसाठी नटताना असा हवा मराठमोळा ठसका; पाहा मराठी साजाची Best Pairings) - मंदिरातून मिळालेले फूल किंवा हार आपल्या कपाळावर लावून घरी आणावेत. यानंतर, जेव्हा ते सुकतात तेव्हा ते एका स्वच्छ कपड्यात गुंडाळा आणि घरातील तिजोरीत ठेवा. असे केल्याने फुलांमध्ये असलेली सकारात्मक ऊर्जा घरातच राहते. अनेक वेळा लोक त्यांच्या पर्समध्ये सुकलेली फुले ठेवतात. हे करणं योग्य आहे. - एखाद्या तीर्थस्थळी गेल्यानंतर तिथे पुजाऱ्याने तुम्हाला हार किंवा फुले दिली असतील, तर ते घरी आणायची काळजी करण्याची गरज नाही. तुम्ही घरी येईपर्यंत ही फुले खराब होऊ शकतात. अशा परिस्थितीत, तो हार किंवा फुल आपल्या तळहातावर ठेवा आणि त्याचा वास घ्या आणि त्याच वेळी एका झाडाखाली ठेवा. अन्यथा, नदीत वाहत्या पाण्यात सोडा. असे मानले जाते की फुलाच्या आत असलेली सकारात्मक ऊर्जा तुमच्या शरीरात जाते. (हे वाचा: गणेशपूजेत वाहिल्या जातात 21 पत्री; फक्त धार्मिक नाही यामागे आहे वैज्ञानिक कारण) - मंदिरातून मिळालेली फुलं देवाचा आशीर्वाद म्हणून कपाळावर लावावीत. त्यानंतर त्याचा वास घ्या आणि घरी ठेवा. जेव्हा ही फुलं सुकतात तेव्हा त्यांना वाहत्या पाण्यात टाका. - जर सुकलेली फुले इकडे -तिकडे विखुरलेली असतील तर तुम्ही ती एका लहान पिशवीत ठेवून तिजोरीत ठेवू शकता किंवा जिथे दागिने ठेवता तेथेही ती ठेवता येतील. - ही फुले सुकल्यानंतर तुम्ही ती घरातील रोपांच्या कुंडीमध्येही टाकू शकता. किंवा जमिनीत छोटा खड्डा करीत त्यामध्ये बुजवू शकता. यामुळे फुलांचं पावित्र्य राखलं जाईल, आणि तुम्ही पापात सहभागी होणार नाही. मंदिरात देवावर वाहिलेले फूल किंवा हार घरी आणल्यानंतर तो काही छोटछोटे उपाय करून योग्य पद्धतीने ठेवता येईल. त्यामुळे नक्कीच मंदिरातून आणलेल्या हाराचे किंवा फुलाचे काय करायचे, या चिंतेतून काही प्रमाणात सुटका मिळू शकेल.
First published:

Tags: Lifestyle

पुढील बातम्या