मुंबई, 15 डिसेंबर : आपला आहार कसा असावा याबाबत आयुर्वेदात अनेकप्रकारे मार्गदर्शन करण्यात आले आहे. आयुर्वेदातील या टिप्स आपण लक्षात घेतल्या आणि त्यांचे पालन केल्यास शरीराला अनेक फायदा होऊ शकतो. आयुर्वेदात शरीराला आवश्यक असलेल्या अनेक पदार्थांबाबात आणि पेयांबाबचे महत्त्व सांगितले आहे. तसेच हे पदार्थ आणि पेये कोणत्या वेळाला घ्यावे आणि टाळावे, तसेच ते घेण्याची योग्य पद्धत कोणती याचे वर्णन देखील आयुर्वेदात करण्यात आले आहे. त्यामुळे आयुर्वेद कायम माणवी आरोग्यासाठी मार्गदर्शक ठरत आहे. आपल्या दैनंदिन आयुष्यात दोन पेयांशी आपला कायम संबंध येत असतो. ही दोन पेये म्हणजे दूध आणि पाणी हे आहेत. बहुतेक लोक नियमित दुधाचे सेवन करतात. परंतु कोणताही माणून पाणी प्यायल्याशिवाय जिवंत राहू शकत नाही. त्यामुळे हे दोन्ही पेये पिण्याची योग्य पद्धत आपल्याला माहिती असणे आवश्यक आहे. आयुर्वेदात दूध आणि पाणी पिण्याची बद्धत देखील सांगितली आहे.
वजन वाढेल म्हणून खाणं सोडू नका, देशी तुपाचे हे आहेत असंख्य फायदे!काही लोकांना दूध प्यायल्यानंतर पोटात गॅस तयार होणे आणि पोट फुगल्यासारखे वाटणे अशा समस्या उद्भवतात. असे होण्यामागे आहाराची चुकीची पद्धत असू शकते. त्यामुळे तुम्हाला अशा प्रकारच्या समस्यांना सामोरे जावे लागू शकते. यासाठी दूध नेहमी उभे राहून प्यावे आणि पाणी नेहमी बसून प्यावे असा सल्ला अनेक आरोग्यतज्ज्ञ देतात.
पाणी नेहमी बसून का प्यावे? झी न्यूज हिंदीच्या रिपोर्टनुसार, माणसाने नेहमी बसून पाणी प्यावे. कारण बसून पाणी प्यायल्याने धोकादायक रसायने रक्तात विरघळत नाहीत आणि त्यामुळे रक्तही शुद्ध होते असे आरोग्य तज्ज्ञांचे मत आहे. तसेच अन्न खाल्ल्यानंतर लगेच पाणी पिऊ नये आणि एकाच वेळी देखील भरपूर पाणी पिऊ नये. या सर्वात महत्त्वाच पर्याय म्हणचे पाणी नेहमी थोडे थोडे करून प्यावे. अशा पद्धतीने पाणी पिणे शरारीसाठी फायदेशीर ठरू शकते.
Winter Tips : तुमच्या बाळाला ठेवा केमिकल्सपासून दूर, घरी बनवा हे 4 प्रकारचे मॉइश्चरायझरदूध कायम उभे राहून प्यावे दूध प्यायल्यानंतर पचनक्रिया बिघडण्याची समस्या अनेक लोकांमध्ये दिसून आली आहे. अनेकांना दूध प्यायल्यानंतर अनेकांना पोटात गॅसची समस्या होते. त्यामुळे दूध पिण्याची योग्य पद्धत आपल्याला माहिती असणे आवश्यक आहे. आरोग्य तज्ज्ञांच्या मते आपण नेहमी उभे राहून दूध प्यावे, ही दूध पिण्याची योग्य पद्धत आहे. तसेच दूध नेहमी हलके गरम करावे आणि जेवल्यानंतर 2 तासांनी प्यावे. उभे राहून दूध प्यायल्याने तुमचे गुडघे स्थिर राहतील आणि स्नायूंना अधिक फायदा होईल. यामुळे हृदयाचे आरोग्य उत्तम राहते आणि रक्तदाबही योग्य राहतो असे मानले जाते.