जाहिरात
मराठी बातम्या / लाइफस्टाइल / Winter Tips : तुमच्या बाळाला ठेवा केमिकल्सपासून दूर, घरी बनवा हे 4 प्रकारचे मॉइश्चरायझर

Winter Tips : तुमच्या बाळाला ठेवा केमिकल्सपासून दूर, घरी बनवा हे 4 प्रकारचे मॉइश्चरायझर

Winter Tips : तुमच्या बाळाला ठेवा केमिकल्सपासून दूर, घरी बनवा हे 4 प्रकारचे मॉइश्चरायझर

आपल्या बाळाच्या स्किनकेअरमध्ये आपण कोणत्याच प्रकारची हलगर्जी करत नाही. मात्र काहीवेळा रासायनिक उत्पादनांना आपण भुलतो. मात्र तुम्ही घराच्या घरी तुमच्या बाळासाठी मॉइश्चरायझर बनवू शकता.

  • -MIN READ Mumbai,Maharashtra
  • Last Updated :

मुंबई, 14 डिसेंबर : लहान मुलांची काळजी घेण्यासाठी पालक नेहमीच अतिरिक्त प्रयत्न करण्यास तयार असतात. रासायनिक आणि प्रदूषण - भरलेल्या वातावरणापासून आपल्या बाळाचे संरक्षण करण्याचा प्रयत्न पालक करतात. आता थंडी वाढू लागली आहे. काही मुलांची त्वचा थंडीत अधिक कोरडी पडते. ज्यामुळे त्यांना या हंगामातही मॉइश्चरायझर लावण्याची आवश्यकता असते. अशावेळी तुम्हाला तुमच्या बाळाच्या त्वचेसाठी कमीतकमी रासायनिक वापरायचे असेल तर आम्ही आपल्याला अगदी सोप्या मार्गाने घरी मॉइश्चरायझर कसे बनवायचे ते सांगणार आहोत. ओन्लीमैथमध्ये प्रकाशित झालेल्या वृत्तानुसार, घरी मॉइश्चरायझर बनवणे अगदी सोपे आहे. हे बाळाला केमिकलपासून दूर ठेवते आणि त्वचेसाठीही फायदेशीर असते.

मुलांसमोर पालकांनी या 6 गोष्टी बोलू नयेत; त्यांच्या व्यक्तिमत्वावर होतो चुकीचा परिणाम

मॉइश्चरायझर बनवण्याचे 4 मार्ग बदाम तेल मॉइश्चरायझर बदाम तेल - 2 टीस्पून पेट्रोलियम जेली - 4 टीस्पून ग्लिसरीन - 10 टीस्पून कॉर्न स्टार्च - 1 टेबलस्पून

News18लोकमत
News18लोकमत

- पाण्यात बदाम तेल मिसळा आणि गरम करा. - एका बाऊलमध्ये पाणी आणि तेलाचे मिश्रण घाला आणि त्यात कॉर्न स्टार्च घाला. - या दोघांना चांगले मिसळा आणि त्यात ग्लिसरीन घाला. - जेव्हा मिश्रण थंड होते, तेव्हा ते एका डब्यात भरा. - बदाम तेलाच्या मॉइश्चरायझरला थंड ठिकाणी ठेवा आणि आवश्यकतेनुसार त्याचा वापर करा. इन्स्टंट बॉडी मॉइश्चरायझर कोरफड गर - 1 कप ऑलिव्ह ऑईल - 5 टीस्पून लिंबाचा रस - 3 टीस्पून टी ट्री ऑइल - 3 टीस्पून - वर नमूद केलेल्या सर्व गोष्टी एकत्र करा. - ते एका डब्यात भरा आणि फ्रीजमध्ये ठेवा. - आवश्यकतेनुसार याचा वापर करा. दुधाचे मॉइश्चरायझर - यासाठी आपल्याला फक्त दूध आणि मीठ आवश्यक आहे. - 5 : 1 च्या प्रमाणात दूध आणि मीठ घ्या. - दूध उकळण्यासाठी गॅसवर ठेवा - त्यात मीठ घाला आणि दूध अर्धा होईपर्यंत ते उकळवा. - जेव्हा दूध अर्धे होईल तेव्हा गॅस बंद करा आणि ते थंड होऊ द्या. - हे मिश्रण एका डब्यात भरा आणि बेबी ऑईलऐवजी वापरा.

Parenting Tips: रात्रीच्या वेळी तुमची मुलं तासनतास इंटरनेटवर काय पाहतात? वेळीच द्या लक्ष, नाहीतर…

गुलाबाजल मॉइश्चरायझर - हे मॉइश्चरायझर उन्हाळ्यात बाळाच्या त्वचेसाठी हे चांगले आहे. - ते तयार करण्यासाठी, गुलाबा पाणी आणि ग्लिसरीन 2 : 1 च्या प्रमाणात घ्या. - या दोघांना मिसळा आणि त्यांना एका बॉक्समध्ये ठेवा. आपण ते फ्रीजमध्ये देखील ठेवू शकता. - मॉइश्चरायझर व्यतिरिक्त, डायपरमुळे होणार्‍या पुरळांवरही ते लागू वापरले जाऊ शकते.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात