मराठी बातम्या /बातम्या /लाइफस्टाइल /धक्कादायक! Covid-19 काळात Google वर सर्च केले गेले स्त्रियांचा छळ करण्याचे मार्ग

धक्कादायक! Covid-19 काळात Google वर सर्च केले गेले स्त्रियांचा छळ करण्याचे मार्ग

How to control your woman, how to hit a woman असल्या गोष्टी कोरोना लॉकडाउन काळात Google वर सर्च झाल्या असल्याचं एका अभ्यासात दिसून आलं आहे.

How to control your woman, how to hit a woman असल्या गोष्टी कोरोना लॉकडाउन काळात Google वर सर्च झाल्या असल्याचं एका अभ्यासात दिसून आलं आहे.

How to control your woman, how to hit a woman असल्या गोष्टी कोरोना लॉकडाउन काळात Google वर सर्च झाल्या असल्याचं एका अभ्यासात दिसून आलं आहे.

  नवी दिल्ली, 29 एप्रिल: आताच्या युगात कोणालाही कसलीही माहिती हवी असेल, तर पहिल्यांदा काय केलं जातं? अर्थात, गुगलचा (Google) आधार घेतला जातो. तिथे तुम्हाला पूर्ण वाक्य तया रकरण्याचीही गरज नसते किंवा ती वाक्य व्याकरणदृष्ट्या परिपूर्ण असण्याचीहीगरज नसते. फक्त तुम्ही काय शोधताय त्याबद्दलचे काही शब्द सर्च करायचे आणि Google Search जादूप्रमाणे तुम्हाला नेमकं काय हवंय ते कसं ओळखतो ते पाहायचं. रेसिपीपासून अचूक स्पेलिंगपर्यंत, शब्दांच्या अर्थापासून अख्ख्या वाक्यांच्या भाषांतरापर्यंत, 'डू इट युवरसेल्फ'च्या लिंक्सपासून एखादं काम कसं करायचं यातल्या टप्प्यांपर्यंत... गुगलकडे (Google Search)जवळपास सगळ्या प्रश्नांची उत्तरं असतात. अर्थात, याला काळी बाजूही आहे. ही सगळी माहिती अगदी मोफत तुमच्या बोटांवर उपलब्ध असल्यामुळे हे साधन वाईट कारणांसाठीही वापरलं जातं. त्यात कौटुंबिक हिंसाचाराचा समावेश आहे.

  कोरोनाविषाणूच्या (Coronavirus)थैमानामुळे जगभर गेल्या वर्षभरात लॉकडाउन (Lockdown) होता. या काळात जगभरात कौटुंबिक हिंसाचाराच्या घटनांमध्ये धक्कादायक वाढ झाली असल्याचं दिसून आलं आहे. पीडित व्यक्ती आणि त्यांना छळणाऱ्या व्यक्ती घरातच कोंडल्या गेल्यामुळे लिंगभेदावर आधारित हिंसाचाराने कळसच गाठला. या हिंसाचाराकरिता किंवा तो कसा करावा, त्याचे छुपे मार्ग कोणते आदी बाबींच्या शोधासाठीही गुगलचा वापर केला गेला आहे. 'टेलर अँडफ्रान्सिस' (Taylor & Francis) या जर्नलमध्ये या संदर्भातला लेख नुकताच प्रसिद्ध झाला आहे. 2020मध्ये अत्यंत धक्कादायक बाबी गुगलवर शोधल्या गेल्याचं या लेखात म्हटलं आहे.

  कॅटरिना स्टँडिश यांनी अभ्यास करून हा लेख लिहिला आहे. न्यूझीलंडमध्ये (Newzealand University) युनिव्हर्सिटी ऑफ ओटॅगोमध्ये' नॅशनल सेंटर फॉर पीस अँड कॉन्फ्लिक्ट स्टडीज'मध्ये त्या वरिष्ठ अधिव्याख्यात्या असून,संस्थेच्या उपसंचालिका आहेत. महिलांचा छळ आणि गेल्या वर्षीचा महामारीचा काळ यांचा तौलनिक अभ्यास त्यांनी केला. त्या आधारे त्यांनी हा लेख लिहिला आहे.

  अमेरिकेतून (USA) केल्या गेलेल्या गुगल सर्चेसचा (Google Searches)अभ्यास यात करण्यात आला. असुरक्षितता, निराशा, हतबलता, सांकेतिक पुरुषी हिंसाचार आणि हेतू पुरस्सर केला गेलेला पुरुषी हिंसाचार (Intentional Male Violence) आदी बाबींवर त्यात लक्ष केंद्रितकरण्यात आलं. या विषयातल्या सर्चेसचं प्रमाण 2020मध्ये 31 टक्क्यांवरून 106 टक्क्यांपर्यंत वाढल्याचं दिसून आलं.

  हेतुपुरस्सर पुरुषी हिंसाचाराशी संबंधित सर्चेस पाहिल्यावर धक्काच बसतो. 'पत्नीला नियंत्रणात कसं ठेवायचं' (How to control your woman) आणि 'कोणालाही न कळता बायकोला कसं मारायचं' (how to hit a woman so no one knows) या दोन टर्म्सप्रत्येकी साडेसोळा कोटी वेळा सर्च केल्या गेल्या.'ती घरी आल्यावर मी तिलाठार करणार आहे' (I am going to kill her when she gets home )हे तब्बल 17.8 कोटी वेळा सर्च केलं गेलं.

  हेल्दी राहण्यासाठी वजन कमीच करायला हवं असं नाही तर वाढवणंही गरजेचं

  पुरुषी हिंसाचाराचे निदर्शक असलेलेकाही सर्च रिझल्ट्सही बऱ्याच मोठ्या प्रमाणावर करण्यात आल्याचं स्पष्टझालं. 'तो मला ठार मारील' (He will kill me) ही टर्म10.7कोटी वेळा,तर'तो मला कायम मारतो' (He beats me up) ही टर्म 32 कोटी वेळा सर्च केलीगेली.

  सत्तरीतही आजीबाई झाल्या बिझनेसवुमेन; 77व्या वयात सुरू केलं स्वत:चं फूड स्टार्टअप

  'मला मदत करा. तो मला सोडणार नाही' (Help me, he won’t leave) ही टर्म तब्बल 1.22अब्ज वेळा सर्च केली गेली. हे सगळं धक्कादायकआणि भीतिदायक असलं,तरी खरं आहे.

  'कोट्यवधी लोक मदतीसाठी ऑनलाइनमार्ग शोधत असतात. मला कोविड-19 काळातलं सत्य लोकांसमोर मांडायचं होतं. म्हणून मी हा अभ्यास केला,' असं स्टँडिश यांनी आपल्या अभ्यासाच्या प्रस्तावनेत लिहिलं आहे.

  First published:

  Tags: Coronavirus, Lockdown, Woman harasment, Women