सर्वसाधारणपणे लोक वजन कमी करण्यासाठी निरनिराळे उपाय करताना दिसतात. तर वजन कमी केल्यानेच स्वस्थ राहता येतं असा अनेकांचा समजही असतो. त्यामुळे वजन घटवण्यासाठी अनेक लोक तऱ्हेतऱ्हेचे उपाय करतात. पण वजन वाढवण्यासाठीही काही लोक प्रयत्न करताना दिसतात (gaining weight is also important). कारण वजन कमी करण्यासोबतच वजन वाढवणं ही गरजेचं असतं. म्हणजेच वजन हे योग्य प्रमाणात असंण गरजेचं आहे. medicalnewstoday मध्ये प्रकाशित झालेल्या वृत्तानुसार , संयुक्त राज्य अमेरिकेत रोग नियंत्रण आणि रोकथाम केंद्र (सीडीसी) च्या अनुसार, वर्ष 1988 ते 2008 च्या दरम्यान देशात 20 ते 39 वर्ष वयोमान असणाऱ्या कमी वजनाच्या व्यक्तींची संख्या 3% वरुन कमी होऊन 1.9% इतकी झाली आहे. यावरुन लक्षात येतं की वजन कमी करण्यासोबतच वजन वाढवणाऱ्यांची संख्याही मोठी आहे. वजन वाढवण्यासाठी हे उपाय नक्की करुन पाहा,
दुध, दही
वजन वाढवण्यासाठी आणि मसल्स बिल्डिंग साठी दुध आणि दही नक्कीच खाल्लं पाहीजे. दूध आणि दही कार्बोहायड्रेट, प्रोटीन, कॅल्शियम आणि विटामिन पुरवण्यासाठी उत्तम असतात. त्यामुळे दुध आणि दह्याचं सेवन नियमीत कराव.
प्रोटीन शेक आणि प्रोटीन सप्लीमेंट्स
प्रोटीन शेक आणि प्रोटीन सप्लीमेंट्सचं सेवन वजन आणि मसल्स बनवण्यासाठी फार मदद करते. वर्कआउट नंतर लगेच याचं सेवन केल्यास जास्त फायदा होतो. पण जार तुम्ही बाजारातील प्रोटीन पावडर वापरत असाल तर त्यावरील मजकुर नक्की वाचा बहूतेकदा यात जास्त साखर मिसळलेली असते.
रुग्णालयात जाण्याची गरज पडणार नाही; घरच्या घरीच कोरोना रुग्णांना बरं करणार Pfizer चं औषध
भात
वजन वाढवण्यासाठी भाताचाही उपयोग होतो. क लोक वजन कमी करण्यासाठी भात सोडतात. पण वजन वाढवण्यासाठी याचा उपयोग होऊ शकतो. तांदूळात जवळपास 200 कॅलरी तसेच कार्बोहायड्रेट्स असतात त्यामुळे वजन वाढण्यास मदत होते.
नट्स, नट्स बटर आणि सुका मेवा
वजन वाढवण्यासाठी सुका मेवा म्हणजेच ड्राय फ्रुट्स आणि बटर आणि नट्स यांचा चांगला उपयोग होतो. योग्य क्वालिटिचे नट्स बटर नियमीत खाल्ल्याने वजनात वाढ होते.
डार्क चॉकलेट
चॉकलेटही वजन वाढण्यास मदत करते. डार्क चॉकलेट मध्ये मोठ्या प्रमाणात कॅलरीज असतात तसेच अँटीऑक्सिडन्ट्स असातात. त्यामुळे वजन वाढण्यास मदत होते.
अंडी
अंड्यामध्ये मोठ्या प्रमाणात प्रोटीन असतात त्यामुळे वजन वाढण्यास मदत होते.
या गोष्टींचाही करा आहारात समावेश
वजन वाढवण्यसाठी ओट्स, मका, चीझ, पास्ता, बटाटा या गोष्टींचाही समावेश केल्याने वजन वाढण्यास मदत होइल.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Health Tips, Lifestyle