मराठी बातम्या /बातम्या /लाइफस्टाइल /

तुमची Immunity चांगली आहे की कमजोर कसं ओळखायचं? व्हायरसपासून संरक्षणासाठी आहे आवश्यक

तुमची Immunity चांगली आहे की कमजोर कसं ओळखायचं? व्हायरसपासून संरक्षणासाठी आहे आवश्यक

गर्भावस्थेमध्ये महिलांना काही त्रास होत असतात. अंगदुखी, पाठदुखी, डोकेदुखी, अशा त्रासांमध्ये घरात असलेली एखादी गोळी खाण्याने दुखणं थांबू शकतं. मात्र, या गोळ्यांचा बाळाच्या मानसिक आरोग्यावर परिणाम होऊ शकतो.

गर्भावस्थेमध्ये महिलांना काही त्रास होत असतात. अंगदुखी, पाठदुखी, डोकेदुखी, अशा त्रासांमध्ये घरात असलेली एखादी गोळी खाण्याने दुखणं थांबू शकतं. मात्र, या गोळ्यांचा बाळाच्या मानसिक आरोग्यावर परिणाम होऊ शकतो.

तज्ज्ञांच्या मते, ज्यांची प्रतिकारशक्ती कमजोर (Immunity Weak) असते. त्यांच्यावर व्हायरसचा अटॅक लवकर होतो. त्याउलट स्ट्राँग इम्युनिटी (Immunity Strong) असेलेले लोक व्हायरस इन्फेक्शनमधून लवकर बरे होतात. पण कशी ओळखायची स्वतःची इम्यून पॉवर?

पुढे वाचा ...
  • Published by:  News18 Desk

दिल्ली, 10 मे :कोरोना (Cororna) ने देशात हाह:कार माजवाला आहे. रोज वाढणारे कोरोना रुग्ण पाहता कोरोना आटोक्यात कसा आणायचा? असा प्रश्न सगळ्यांच्या समोर आहे. ज्यांची रोग प्रतिकारक शक्ती कमजोर (Weak Immune System) आहे अशांनी घरा बाहेर जाऊच नये आणि सुरक्षेच्या दृष्टीने सगळी काळजी घ्यावी असा सल्ला डॉक्टर देत आहेत. तज्ज्ञांच्या मते, ज्यांची इम्यनिटी कमजोर (Immunity Weak)  असते. त्यांच्यावर व्हायरसचा एटॅक लवकर होतो. त्याउलट स्ट्राँग इम्युनिटी (Immunity Strong) असेलेले रुग्ण व्हायरस इन्फेक्शनमधून लवकर बरे होतात.

शरीरातल्या सफेद पेशी  (White Cells), ऍन्टीबॉडीज (Antibodies) आणि इतर अनेक तत्व मिळून इम्युन सिस्टीम बनते. हिच इम्युन सिस्टीम आपलं व्हायरस पासून संरक्षण करेत (Immune System Protection from Viruses). ज्यांनी इम्युनीटी कमजोर असते असं लोक वातावरणात बदल झाल्यावरही लगेच आजारी पडतात. कोरोना संक्रमणाच्या काळात इम्युनिटीवर चर्चा केली जात आहे. इम्युनिटी वाढवण्यासाठी योगा, व्यायाम, चांगलं, जेवण आणि लाईफ स्टाईल असणं आवश्यक आहे. मात्र आपली इम्युनिटी किती स्ट्राँग आहे हे ओळखणं आजच्या काळात आवश्यक आहे. जाणून घेऊयात स्ट्राँग  इम्युनिटी ओळखण्याच्या टीप्स

(अरे बापरे! ही बाई आगीचे गोळे खातेय? VIDEO पाहून डोक्याला लावाल हात)

स्ट्राँग इम्युनिटी ओळखा

वातवरणातल्या बदलाचा शरीरावर लवकर परिणाम होत असेल. वातावरण बदललं की लगेज सर्दी, खोकला, ताप येत असेल तर, अशा लोकांची इम्युनिटी कमजोर असते.

ज्यांची इम्युनिटी कमजोर असते असे लोक वर्षामधून कधीनाकधी आजारी असतात. त्य़ांना आरोग्य समस्या जास्त असतात.

इम्युनिटी कमोर असलेल्यांना फूड पॉयझनिंग (Food poisoning) लवकर होतं. बाहेरचं खाल्यांने त्यांना पोटाच्या समस्या होतात.

डोळ्याखाली काळी वर्तूळ येणाऱ्यांची इम्युनिटी कमजोर असते.

(Health Tips : मेटोबॉलिजम वाढवण्यासाठी स्वयंपाकघरातला 'हा' पदार्थ करतो मोलाचं काम)

रात्री पूर्ण झोप घेऊनही फ्रेश वाटत नसेल, तर, हे कमजोर इम्युनिटीचं लक्षण आहे.

अशा मणसांमध्ये दिवसभर एनर्जी लेव्हल कमी असते. त्यांना सतत थकवा जाणवतो, झोप येत राहते.

अन्न पचन क्षमता कमजोर असते. डायजेशन चांगल नसल्याने पोटाशी संबंधीत समस्या येत असतात.

कमजोर इम्युनिटीचं एक लक्षण म्हणजे, चिडचिडा स्वभाव. हे लोक कोणत्याना कोणत्या कारणाने चिडचीड करत असतात.

(फक्त एका Blood test मधून ओळखता येणार Cancer; सुरुवातीच्या टप्प्यातच निदान होणा)

स्ट्रॉन्‍ग इम्यूनिटी कशी ओळखायची.

स्ट्रॉन्‍ग इम्यूनिटी असलेल्या लोकांना साध्या व्हारल इन्फेक्शन (viral Infection) मध्ये औषधं घेण्याची गरज पडत नाही.

ज्यांची स्ट्रॉन्‍ग इम्यूनिटी असते असे लोक, व्हायरल इन्फेक्शन आणि कोणत्याही छोट्या आजारात लगेच बरे होतात.

अशा लोकांना सर्दी खोकला वारंवार होत नाही. झाला तरी लगेच बरा होतो.

स्ट्राँग इम्यूनिटी असलेल्या लोकांच्या जखमाही लवकर भरतात. त्यांना शरीरावर जखम झाली तरी बरी होण्यासाठी जास्त औषधांची गरज पडत नाही.

स्ट्राँग इम्यूनिटीसाठी आहार

हेल्थलाइननुसार जेवणात सायट्रीक फ्रूटचा समावेश करावा, लिंबू, द्राक्ष, किवी, संत्र अशा फळांचं सेवन करावं.

लाल शिमला मिरची, ब्रोकोली, लसूण, आलं, पालक यासारख्या भाज्यांमध्ये भरपूर प्रमाणात अँटिऑक्सिडंट, व्हीटॅमीन सी आणि इम्युनिटी बुस्टींग प्रॉपर्टीज असतात.

दह्यामध्ये व्हिटॅमीन डी असतं. ज्यामुळे इम्युन सिस्टीम स्ट्राँग होते.

काजू, बदाम, मनुका, पिस्ता या सारखे ड्रायफ्रुट खावेत.

याशिवाय पपई, ग्रीन टी, चिकन, अंडी असे पदार्थ खाल्ल्यानेगी इम्युन सिस्टींम मजबूत होते.

First published:

Tags: Coronavirus, Health Tips, Home remedies, Immun