Health Tips : मेटोबॉलिजम वाढवण्यासाठी स्वयंपाक घरातला 'हा' पदार्थ करतो मोलाचं काम

Health Tips : मेटोबॉलिजम वाढवण्यासाठी स्वयंपाक घरातला 'हा' पदार्थ करतो मोलाचं काम

Coriander Water Benefits: धणे (Coriander Seed) औषधी गुणांनी संमृद्ध असतात. धण्याचं सेवन अनेक आजारांवर मात करण्यासाठी आणि चांगल्या आरोग्या (Healthy) साठी फायदेशीर आहे.

  • Share this:

भारतीय मसाल्यांमधला रोजच्या वापरातला पदार्थ म्हणजे धणे (Coriander). धण्यांनी पदार्थाची चव तर, वाढतेच शिवाय धण्याने शरीरालाही फायदे मिळतात. आयुष मंत्रालयाने (Ministry of AYUSH) देखील चांगल्या आरोग्यासाठी कोरोना काळात धणे खाण्याचा सल्ला दिलेला आहे.

धण्यांमधून व्हिटॅमीन ए आणि सी सह अनेक पोषक तत्व मिळतात. काही आहार तज्ज्ञांनी धणे पावडर हर्बल चहा, काढा यांच्यामध्ये वापर करण्यास सल्ला दिलेला आहे. दररोज धण्यांचं पाणी प्यायल्याने आरोग्यासाठी चांगला फायदा (Health Benefits) मिळू शकतो. काय आहेत हे फायदे जाणून घेऊयात.

(प्रोटोकॉलचं उल्लंघन करीत कोरोना रुग्णाचा मृतदेह दफन; गावात 21 दिवसात 21 मृत्यू)

जाणून घ्या फायदे

दररोज धणे खाल्ल्याने सांधे दुखीत फायदा होतो. साधेदुखी कमी करण्यासाठी धण्याचं पाणी रोज प्या.

धण्यांचं पाणी शरीर हायड्रेठ ठेवतं. शरीरात पाण्याची कमतरता निर्माण होत नाही.

धणे पाणी शरीरातील विषारी द्रव्य बाहेर फेकतं. किडनी डिटॉक्स होते.

उन्हाळ्यात शरीरात वाढलेली गर्मी कमी करण्यासाठी धण्यांचं पाणी प्यावं.

(रशियाची Sputnik Light कोरोना लस भारतासाठी गेम चेंजर ठरणार?)

चेहऱ्यावर सुज येत असेल तर, धण्यांच्या पाण्याचं सेवन करा. चेहऱ्यावरची सुज कमी होईल.

धणे पाणी डायजेशनची समस्या कमी करतं. पोटात गॅस, जळजळ अशा समस्यांमध्ये फायदा होतो.

मेटोबॉलिजमची प्रक्रिया वाढवण्यासाठी धण्याचं पाणी चांगलं आहे. वजन कमी करायचं असेल तर, धण्याचं पाणी प्या.

थायरॉईच्या आजारात धणे पाणी फायदेशीर आहे. थायरॉईड नियंत्रणात येतो.

ब्ल़ड शुगर लेव्हल नियंत्रणात आणण्यासाठी फायदेशीर.

(केंद्राचा मोठा निर्णय; कोरोना रुग्णही घेऊ शकतात आयुष्मान भारत योजनेचा लाभ)

कसं सेवन करायचं

ग्लासभर पाणी एका भांड्यात घ्या. पाणी उकळल्यावर त्यात एक चमचे धणे टाका. पाणी उकळून अर्धा कप करा. पाणी गाळा आणि पाणी कोमट असताना प्या.

एका ग्लास पाण्यात एक चमचा अख्खे धणे रात्रभर भिजत ठेवा. सकाळी हे पाणी प्या.

Published by: News18 Desk
First published: May 10, 2021, 7:29 AM IST

ताज्या बातम्या