अरे बापरे! ही बाई आगीचे गोळे खातेय? VIDEO पाहून डोक्याला लावाल हात

अरे बापरे! ही बाई आगीचे गोळे खातेय? VIDEO पाहून डोक्याला लावाल हात

हा व्हिडिओ पोलीस अधिकारी रुपीन शर्मा (IPS Rupin Sharma) यांनी त्यांच्या अधिकृत ट्विटर खात्यावरून शेअर केला आहे. कोरोनापासून बचावासाठी असलं काही बाही करू नका, असंही त्यांनी लिहिलं आहे.

  • Share this:

नवी दिल्ली, 10 मे : सोशल मीडियावर एका महिलेचा थरारक व्हिडिओ व्हायरल (Shocking viral video) होत आहे. कोरोनापासून वाचण्यासाठी लोक काय काय करतील आणि कुठल्या थराला जातील सांगता येत नाही. वाटेल तो अपप्रचार, चुकीची माहिती आणि अयोग्य उपाय या साथ काळात सोशल मीडियावरून सुरू आहे. त्यातून लोकांमध्ये अफवा पसरतात किंवा दहशत निर्माण होते. त्यामुळे सोशल मीडियावरच्या VIDEO मध्ये दिसतं ते सगळं काही खरं नसतं आणि ते करून पाहू नका, हेच सांगायचा प्रयत्न एका viral post मधून एका पोलीस अधिकाऱ्याने केला आहे.

हा व्हिडिओ पाहून अनेकांनी आश्चर्य व्यक्त केलं आहे. व्हिडिओत दिसणारी ही महिला चक्क आगीचे गोळे तोंडात टाकून खाताना दिसत आहे. हा व्हिडिओ आयएएस अधिकारी रुपीन शर्मा (IPS Rupin Sharma) यांनी त्यांच्या अधिकृत ट्विटर खात्यावरून शेअर केला आहे.

30 सेकंदांच्या या क्लिपमध्ये एक महिला खुर्चीवर बसल्याचे दिसत आहे. तिच्या समोर टेबलावर ठेवलेल्या छोट्या ताटात आगीचे पेटते गोळे दिसत आहेत. चिमट्याच्या मदतीने ही महिला आगीचे गोळे उचलून सरळ तोंडात घालत आहे. जणू पाणीपुरी खाल्ल्याप्रमाणे ही महिला आगीचे गोळे तोंडात टाकताना दिसत आहे.

रुपिन शर्मा यांनी या व्हिडिओला मजेशी कॅप्शन दिले आहे, त्यांनी ट्विट करताना असं लिहलं की, कोरोनासाठी

स्टीम घेतल्यानंतर ..!

मिठाच्या पाण्याच्या गुळण्या केल्यानंतर ..!

हळदी बरोबर दूध प्यायल्यानंतर ..!

रोज गरम पाणी पिल्यानंतर ..!

हा शेवटचा पर्याय राहिला आहे..!

मात्र, कोरोनाला पळवून लावण्यासाठी कुणीही हा उपाय करू नका, असे आवाहन शर्मा यांनी केले आहे. कोरोनासाठी केवळ लस घेणे हा उपाय आहे असं त्यांनी लिहलं आहे.

हे वाचा - माझ्याजवळ ये नाहीतर, तुझ्या आई बाबांचा खेळ खल्लास; एकतर्फी प्रेमातून युवकाची शरीरसुखाची मागणी

आणि त्याच्या खाली हा भन्नाट व्हिडिओ दिसतो. सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात हा व्हिडिओ व्हायरल होत आहे. काहींनी कमेंट करून म्हटलंय अरे हे काय चाललंय? तर काहींनी हा कोणता नाष्टा प्रकार आहे, असं विचारलंय तर काहींनी असं केल्यावर माणुस जिवंत राहील तरी का, असं म्हटलंय. सोशल मीडियावर या व्हिडिओला काही वेळातच लाखो व्हिव्यूज मिळाले आहेत.

हा VIDEO कोणाचा, ती बाई कोण, ती नेमकं काय तोंडात टाकते आहे वगैरे काही अद्याप स्पष्ट होऊ शकलेला नाही.

Published by: News18 Desk
First published: May 10, 2021, 1:52 PM IST

ताज्या बातम्या