नवी दिल्ली, 03 जुलै : केंद्र सरकारने 1 जुलैपासून देशात सिंगल यूज प्लास्टिकच्या वापरावर बंदी घातली आहे. प्रदूषणाचा सामना करण्यासाठी सरकारने हे पाऊल उचलल्याचे मानले जात आहे. भारतातील 'कचरा प्रदूषणाचा' सर्वात मोठा स्रोत प्लास्टिक बनला आहे. देशात दरवर्षी सुमारे 14 दशलक्ष टन प्लास्टिकचा वापर होत असल्याचा अंदाज आहे, त्यामुळे कचरा मोठ्या प्रमाणावर पसरतो. प्लास्टिक हे लोकांच्या आरोग्यासाठी अत्यंत घातक आहे. त्यामुळे लोक अनेक आजारांना बळी पडतात. प्लॅस्टिकचा वापर आरोग्यासाठी किती घातक ठरू शकतो हे आपण तज्ज्ञांकडून जाणून घेणार (Single use Plastic Side Effects) आहोत.
तज्ज्ञ काय म्हणतात?
सर गंगा राम हॉस्पिटल (नवी दिल्ली) च्या फिजिशियन डॉ. सोनिया रावत यांच्या मते, प्लास्टिकचा आपल्या आरोग्यावर प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्ष दोन्ही प्रकारे परिणाम होतो. शतकानुशतके प्लास्टिकचे विघटन होत नाही आणि त्यामुळे जलप्रदूषण, वायू प्रदूषण आणि मातीचे प्रदूषण होते. त्यामुळे नागरिकांना अनेक आरोग्य समस्यांना सामोरे जावे लागत आहे. मोठ्या प्रमाणात प्लास्टिक समुद्रात पोहोचते आणि समुद्रातील प्राणी ते प्लास्टिक गिळतात. समुद्रातून काढलेले मासे आणि इतर सीफूड खाल्ल्याने प्लास्टिकचे तुकडे माणसाच्या पोटात पोहोचतात आणि आतड्यांमध्ये अडथळे निर्माण होतात.
हे वाचा -
पुरुषांच्या केसांसाठी परिणामकारक आहेत हे वीगन हेयर मास्क; घरीच असे करा तयार
पॅकेजिंगमध्ये रसायने वापरली जातात?
डॉ. सोनिया रावत यांच्या म्हणण्यानुसार, अनेक वेळा खाद्यपदार्थांच्या प्लॅस्टिक पॅकेजिंगमध्ये रसायनांचा वापर केला जातो, ज्यामुळे लोकांच्या प्रतिकारशक्तीवर विपरीत परिणाम होतो. लोकांनी प्लास्टिकच्या डब्यांमध्ये खाद्यपदार्थ पॅक करणे टाळावे आणि प्लास्टिकच्या बाटल्यांऐवजी बांबू किंवा काचेच्या बाटल्या पाण्यासाठी वापरल्या पाहिजेत.
हे वाचा -
Diabetes असणाऱ्यांनी सकाळ-संध्याकाळ चावून खावी ही 2 प्रकारची पानं; दिसेल परिणाम
पर्यावरणाचे नुकसान -
डॉक्टरांच्या मते, प्लास्टिकचा कधी आपल्या आरोग्यावर थेट परिणाम होतो तर कधी अप्रत्यक्षरीत्या हानी होते. त्यामुळे प्लास्टिकचा वापर जपून करावा. प्लास्टिकमुळे पर्यावरणाची गंभीर हानी होत असून त्याचा फटका आपल्यालाच सहन करावा लागत आहे. प्लास्टिकचा वापर बंद केला तर पर्यावरणातील अनेक प्रकारचे प्रदूषण कमी होऊन ते आपल्या आरोग्यासाठी फायदेशीर ठरेल.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर.
आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.