मराठी बातम्या /बातम्या /लाइफस्टाइल /45 वर्षांनी लहान नवरा कसं करतो आपल्यावर प्रेम? 81 वर्षांच्या आजींनी उलगडलं आपलं बेडरूम सिक्रेट

45 वर्षांनी लहान नवरा कसं करतो आपल्यावर प्रेम? 81 वर्षांच्या आजींनी उलगडलं आपलं बेडरूम सिक्रेट

तरुण बॉयफ्रेंडमुळे गेल्या वर्षी चर्चेत आलेल्या त्या आजींनी आपल्या रोमँटिक लाइफबाबत बरंच काही सांगितलं आहे.

तरुण बॉयफ्रेंडमुळे गेल्या वर्षी चर्चेत आलेल्या त्या आजींनी आपल्या रोमँटिक लाइफबाबत बरंच काही सांगितलं आहे.

तरुण बॉयफ्रेंडमुळे गेल्या वर्षी चर्चेत आलेल्या त्या आजींनी आपल्या रोमँटिक लाइफबाबत बरंच काही सांगितलं आहे.

  ब्रिटन, 30 मे: असं म्हणतात की प्रेम (love) आंधळं असतं. तुम्ही अशी अनेक उदाहरणंही पाहिली असतील. अशाच प्रेमापैकी एक म्हणजे ब्रिटनमधील आयरिश जोनस (Irish Jones) आणि इजिप्तमधील मोहम्मद अहमद इब्राहिम (Mohammad Ahmad Imbrahim) यांचं. तुम्हाला आठवतं आहे का? गेल्या वर्षी ब्रिटनमधील 81 वर्षांच्या आयरिश जोनस नावाच्या एक आजीबाई चांगल्याच चर्चेत आल्या होत्या. त्यांच्या चर्चेत राहण्याचं कारण होतं त्यांचा प्रियकर (Old lady young boyfriend). गेल्या वर्षी या आजींनी त्यांच्यापेक्षा तब्बल 45 वर्षांनी लहान असलेल्या प्रियकराची लोकांशी भेट घालून दिली होती. त्यानंतर आयरिश यांनी प्रियकर इब्राहिमशी 2020 च्या नोव्हेंबर महिन्यात लग्न केलं (Old lady young husband).

  आयरिश आणि इब्राहिम यांची भेट 2019 मध्ये फेसबुकवरच झाली होती. ते फेसबुकवर एकमेकांशी बोलायचे. बोलता बोलता दोघं प्रेमात पडले. मात्र इब्राहिम इजिप्तमध्ये राहायचा. त्यामुळे आयरिश बऱ्यादचा इब्राहिमला भेटायला इजिप्तला जायच्या. त्यानंतर गेल्या वर्षाच्या अखेरीस दोघांनी लग्न केलं. आयरिश यांनी फेसबुकवर (facebook) पुन्हा एक पोस्ट केली आहे. ज्यात त्यांनी इब्राहिमबद्दल भरभरून लिहिलं आहे.

  विशेष म्हणजे इब्राहिम आपल्यावर कसं प्रेम करतो ते सांगत त्यांनी आपलं बेडरूम सिक्रेटसुद्धा सर्वांसमोर मांडलं आहे. आयरिश म्हणतात, इब्राहिम माझ्यावर खूप प्रेम करतो. तो अगदी लहान मुलाप्रमाणे माझी काळजी घेतो. बऱ्याचदा आम्ही दोघं एकमेकांच्या प्रेमात असं गुंततो की आम्हाला वेळ आणि लोकांचं भान राहत नाही. इब्राहिम खूप चांगला आहे.

  हे वाचा - Kiss करताना का बंद होतात डोळे? तज्ज्ञांनी उलगडलं 'लिपलॉक' मागील रहस्य

  आयरिश सांगतात, "खरं प्रेम तेच आहे ज्यात तुमच्यावर प्रेम करणारी व्यक्ती तुमच्या पायाची नखं कापून देते, लिफ्ट बिघडली असल्याचं कळताच तुम्हाला उचलून वरच्या मजल्यावर घेऊन जाते. तुमचा चुकून टॅक्सीत राहिलेला फोन शोधण्यासाठी जीवाचं रान करते. तसंच जो प्रियकर तुम्ही रुग्णालयात (hospital) असताना केवळ तुमच्यासोबत वेळ घालवण्यासाठी रुग्णालयात जमिनीवर झोपतो तोच खरा प्रियकर, हे खरं प्रेम"

  आयरिशच्या पोस्टवर पती इब्राहिमची प्रतिक्रियाही महत्त्वाची

  स्वतःपेक्षा 45 वर्षांनी मोठ्या असलेल्या पत्नीनं फेसबुकवर टाकलेल्या या रोमँटिक पोस्टमुळे इब्राहिमचा आनंद गगनात मावेनासा झाला आहे. त्यानेसुद्धा यावर प्रतिक्रिया दिली आहे. तो म्हणतो, "या प्रेमाचं कर्ज तो कधीच फेडू शकत नाही. तसंच तिच्या या पोस्टला उत्तर दिल्यानं कदाचित आमचं प्रेम आटेल. त्यामुळे मी गप्प बसणार आहे. आयरिश खूपच प्रेमळ आहे"

  हे वाचा - ऑनलाइन डेटिंग करणाऱ्याला भेटण्यासाठी 'ती' चक्क जेलपर्यंत पोहोचली...

  गेल्यावर्षी या दोघांनी एकमेकांवर प्रेम असल्याचं सांगितल्यानंतर नेटकऱ्यांनी यांच्यावर टीका केली होती. तसंच प्रेम आंधळं असतं हे या दोघांनी खरं ठरवल्याचंही काही नेटिझन्सनी म्हटलं होतं.

  First published:

  Tags: Couple, Love story, Old woman, Relationship, Wife and husband