मुंबई, 22 जुलै : आपल्या सर्वांच्या आजूबाजूला अशी एक व्यक्ती असावी जी सतत चेहऱ्यावर हास्य ठेवते. असे लोक बहुतेक वेळा आपल्या जोडीदाराला पाहून आनंदी आणि हसत असतात. तर दुसरीकडे असे बरेच लोक असतात जे सर्वकाही चांगले असूनही कमी हसतात. याशिवाय जोडीदाराला खूप दिवसांनी भेटल्यानंतरही ते सामान्यपणे वागतात. असे लोक फारसा आनंद व्यक्त करू शकत नाहीत. अशा परिस्थितीत अनेक नात्यामध्ये गैरसमज वाढतात. पण तुम्हाला माहित आहे का की तुम्हाला होणारा आनंद तुमच्या शरीरात सतत होणाऱ्या हार्मोनल बदलांवर अवलंबून असतो. चला जाणून घेऊया शरीरातील कोणते हार्मोन्स (Happy Hormones) तुम्हाला आनंदी ठेवण्यासाठी मदत करतात. तुमच्या आनंदी होण्यामागे असतात हे हार्मोन्स सेरोटोनिन सेरोटोनिन हार्मोन्स आपला मूड चांगला किंवा खराब होण्यासाठी जबाबदार असतात. हेल्थलाइननुसार, सेरोटोनिन शरीरात स्रवल्यानंतर म्हणजेच बॉडीमध्ये सिक्रीट झाल्यानंतर तुमचा मूड ताजा आणि शांत राहतो. सेरोटोनिननसल्यास तुमचा मूड खराब होऊ शकतो. शरीरातील सेरोटोनिनचे प्रमाण वाढवण्यासाठी तुम्ही दररोज योगा आणि ध्यानाची मदत घेऊ शकता.
Black Rice For Cancer : कॅन्सरपासून वाचवतो हा तांदूळ; यामध्ये आहे खास घटकऑक्सिटोसिन ऑक्सिटोसिन हे हार्मोन शरीरात खूप महत्त्वाची भूमिका बजावते. ऑक्सिटोसिनचे दुसरे नाव लव्ह हार्मोनदेखील आहे. हे लव्ह हार्मोन वाढवण्यासाठी चांगल्या भावना असणे आवश्यक आहे. जेव्हा तुम्ही तुमच्या जोडीदाराच्या जवळ किंवा प्रेमात असता तेव्हा ऑक्सिटोसिन तुम्हाला आनंदी करते. तुमच्या जोडीदाराला पाहून आनंद वाटणे हे ऑक्सिटोसिनवर अवलंबून असते. Relationship Tips : तुमच्यासोबत या गोष्टी घडत असतील तर तुम्ही प्रेमात आहात, हृदय देते संकेत डोपामाइन रिवॉर्ड केमिकल डोपामाइनचे दुसरे नाव. ज्या वेळी एखाद्या व्यक्तीला कुठला तरी पुरस्कार किंवा पारितोषिक मिळायचे असते त्या वेळी डोपामाइन हार्मोन सिक्रीट होते. कोणत्याही व्यक्तीला त्याच्या यशावर साहजिकच आनंद होतो. त्या आनंदाला डोपामाइन जबाबदार असते. शरीरात डोपामाइनचे प्रमाण वाढवण्यासाठी वेगवेगळ्या उपक्रमांमध्ये सहभागी व्हायला हवे.