मराठी बातम्या /बातम्या /लाइफस्टाइल /

Relationship Tips : तुमच्यासोबत या गोष्टी घडत असतील तर तुम्ही प्रेमात आहात, हृदय देते संकेत

Relationship Tips : तुमच्यासोबत या गोष्टी घडत असतील तर तुम्ही प्रेमात आहात, हृदय देते संकेत

प्रेमात पडल्यानंतर आवडत्या व्यक्तीबद्दल एक वेगळेच आकर्षण वाटत असते. ती व्यक्ती सतत सोबत असावी, आपल्या डोळ्यासमोर असावी आणि तिच्या सहवासात आपला सर्व वेळ जावा असे तुम्हाला वाटू लागते.

प्रेमात पडल्यानंतर आवडत्या व्यक्तीबद्दल एक वेगळेच आकर्षण वाटत असते. ती व्यक्ती सतत सोबत असावी, आपल्या डोळ्यासमोर असावी आणि तिच्या सहवासात आपला सर्व वेळ जावा असे तुम्हाला वाटू लागते.

प्रेमात पडल्यानंतर आवडत्या व्यक्तीबद्दल एक वेगळेच आकर्षण वाटत असते. ती व्यक्ती सतत सोबत असावी, आपल्या डोळ्यासमोर असावी आणि तिच्या सहवासात आपला सर्व वेळ जावा असे तुम्हाला वाटू लागते.

  • Published by:  Pooja Jagtap

मुंबई, 13 जुलै : प्रेम ही एक सुंदर भावना (Love Feeling) आहे. प्रेमात पडल्यानंतर आवडत्या व्यक्तीबद्दल एक वेगळेच आकर्षण वाटत असते. ती व्यक्ती सतत सोबत असावी, आपल्या डोळ्यासमोर असावी आणि तिच्या सहवासात आपला सर्व वेळ जावा असे तुम्हाला वाटू (Love signs) लागते. याशिवाय ती व्यक्ती दुरून दिसल्यावरच वेगळाच आनंद होतो. परंतु बऱ्याच वेळा हे प्रेम आहे की फक्त आकर्षण हे कळत (Love Hint) नाही. केवळ स्त्री पुरुषच एकमेकांकडे आकर्षित होतात असे नाही तर काही वेळा मित्रांचे देखील एकमेकांवर प्रेम जडते (sign of love) परंतु एकमेकांसोबत वेळ घालवताना अनेकदा ते या गोष्टीपासून अनभिज्ञ असतात. त्यामुळे तुम्ही खरच प्रेमात पडला आहात की नाही हे जाणून घेण्याचे (When you fall in love) काही संकेत आहेत. या संकेतांवरून तुम्ही प्रेमात आहात का हे तुम्हाला समजून घेता येईल.

सतत त्याच व्यक्तीच्या विचारात असणे

तुम्ही प्रेमात पडला असाल तर सतत आवडत्या व्यक्तीच्या विचारात हरवले असता. काहीही घडलं तरी त्याच व्यक्तीचे शब्द आणि कृत्ये तुम्हाला सतत आठवत राहतात. कुठेही गेले तरी तुम्ही ती व्यक्ती सोबत असावी असा विचार करता. तुम्हाला तिची आठवण आली तर कधीकधी तुम्ही तुम्ही स्वतःशीच बोलू लागता. या सर्व गोष्टी तुमच्यासोबत घडत असतील तर समजून जा की तुम्ही प्रेमात पडला आहात.

Kidney Stone Stomach Pain : आता त्रास सहन करू नका; 'हे' आहेत किडनी स्टोनमुळे होणाऱ्या पोटदुखीवर उपाय

स्वतःपेक्षा त्या व्यक्तीची अधिक काळजी वाटणे

तुम्ही एखाद्याच्या प्रेमात पडता किंवा तुम्हाला ती व्यक्ती आवडू लागते तेव्हा ती तुमच्यासाठी सर्वकाही बनते. स्वत: पेक्षा जास्त तुम्हाला तिच्या खाण्यापिण्याची काळजी वाटू लागते. तिच्याविषयी कोणाकडूनच तुम्ही वाईट ऐकू शकत नाही. तुम्हालाही एखाद्यासाठी असे वाटत असेल तर समजून घ्या की तुम्ही प्रेमात आहात.

रोमँटिक गाणी खूप आवडू लागतात

तुम्ही प्रेमात पडला असाल तर तुमचे मन संगीताकडे वळू लागते. तुम्हाला विशिष्ट प्रकारची गाणी खूप आवडू लागतात. यात प्रेमाच्या शक्यता आणि आणाभाका असलेली गाणी अधिक आवडू लागतात. समोरच्या व्यक्तीच्या आवडी-निवडी लक्षात घेऊन आपण संगीताची निवड करू लगातो. प्रेमात पडल्यानतंर बहुतेक लोकांना रोमँटिक गाणी आवडू लागतात. तुम्ही एखाद्याच्या प्रेमात पडलात तर तुमची प्लेलिस्ट नकळत रोमँटिक गाण्यांनी भरून जाते.

Overthinking : वारंवार एकच विचार करणं असू शकतं आजाराचं लक्षण, मेंदूवर होतो परिणाम

मित्रांसोबत शेअर करता मनातील भावना

बहुतेक लोक आपल्या मनातील भावना मित्रांसोबत शेअर करतात. प्रेमात पडण्याची कोणताही एक पद्धत नाही. त्यामुळे तुमचे कोणावर प्रेम जडले असेल तर तुम्ही त्याविषयीच्या गोष्टी तुमच्या मित्रांसोबत शेअर करू लागता. यावरून तुमच्या लक्षात येते की तुम्ही खरच प्रेमात पडला आहात की ते फक्त आकर्षण आहे.

First published:

Tags: Lifestyle, Relationship tips