फक्त गोवा, शिमला नाही; तर Honeymoon साठी उत्तम आहेत भारतातील ही 10 स्थळं

आपला जोडीदार आपल्या भावना लपवत असेल तर, तो आपल्यापेक्षा जास्त तणावात आहे याची जाणीव असू द्या. तो चिडला तरी, त्याचा आत्मविश्वास डळमळेल असं काहीही बोलू नका. टेन्शनमुळे वाद होत असतील तरी, कमीपणा घ्या आणि शांत रहा.

भारतातील या ठिकाणांसमोर विदेशही फिका आहे.

  • Share this:
मुंबई, 21 जून : हनीमून (Honeymoon) अर्थात मधुचंद्राचे दिवस म्हणजे नव्याने लग्नबंधनात अडकलेल्या जोडप्यांसाठी अक्षरशः सातवे आसमानपर असण्याचे दिवस असतात. त्यामुळे त्या दिवसांच्या आठवणी अविस्मरणीय व्हाव्यात म्हणून कोणत्या तरी सुंदर पर्यटनस्थळी जाण्याचा प्रघात आहे. अनेकांना परदेशात जाण्याची इच्छा असते; मात्र बजेट तेवढं मोठं नसतं; पण आपल्या देशातही अशा वैशिष्ट्यपूर्ण पर्यटनस्थळांची (Tourist Spot) अजिबात कमतरता नाही. 'बॉलिवूडशादीज डॉट कॉम'ने खास हनिमूनसाठीच्या पर्यटनस्थळांबद्दलची माहिती दिली आहे. ही पर्यटनस्थळं सुंदर तर आहेतच; पण बजेटच्या दृष्टीनेही परवडण्यासारखी आहेत. 1. गोवा (Goa) : हनीमूनसाठी सर्वांत पसंतीचं ठिकाण म्हणून वर्षानुवर्षं गोवा पहिल्या स्थानावर आहे. गोव्यात हनीमून मूडला साजेसं सगळं काही आहे. शांत, स्वच्छ आणि सुंदर समुद्रकिनारे, जोडीला पोर्तुगीज वास्तुशैलीचं दर्शन घडवणाऱ्या वास्तू, म्युझिकल नाइट्स, बिनधास्त लाइफस्टाइल आणि स्वादिष्ट खाद्यपदार्थ या सगळ्या बाबींमुळे गोवा हे हनीमून कपल्सचं आवडीचं स्थळ राहिलं आहे. अनेक पिढ्या बदलल्या, तरी ही आवड बदललेली नाही. महत्त्वाचं म्हणजे गोवा हे सर्व महत्त्वाच्या शहरांना रेल्वे आणि विमानसेवेने जोडलेलं आहे. तसंच गोव्यात 15-20 हजार रुपयांपेक्षाही कमी बजेटमध्ये सफर करता येऊ शकते. हे वाचा - ही लक्षणं सांगतात तुम्ही Pregnant आहात; Period मिस होण्याआधीच शरीरात होतात बदल 2. मुन्नार (केरळ) (Munnar/Kerala) : केरळ राज्याला 'गॉड्स ओन कंट्री' असं म्हटलं जातं ते काही उगीच नाही. कारण देवभूमी या शब्दाला साजेसंच केरळ आहे. केरळमधलं मुन्नार हे एक अत्यंत सुंदर, लोकप्रिय पर्यटनस्थळ. एका प्रसिद्ध मॅगझिनने 'बेस्ट प्लेस फॉर रोमान्स 2017' अशा किताबाने मुन्नारचा गौरव केला होता. मुन्नारची शांतता अनुभवायला अनेक पर्यटक येत असतात. एराविकुलम नॅशनल पार्क, डोंगररांगा, सुंदर तलाव आणि झरे, 2695 मीटर उंचीचं अनमुडी शिखर, मट्टुपेट्टी डॅम, कुंडला डॅम अशी अनेक सुंदर पर्यटनस्थळं तिथे आहेत. जलाशयांमध्ये बोटहाउसही आहेत. उंचावरच्या शिखरांवरून हिरवंगार मुन्नार पाहणं हा एक अद्वितीय अनुभव असतो. साधारण 10-15 हजारांत तुम्ही मुन्नारची ट्रिप करू शकता. 3. उदयपूर (राजस्थान) (Udaipur/Rajasthan) : तलावांचं शहर अशी ओळख असलेलं राजस्थानातलं उदयपूर हे शहर भव्य महाल आणि संग्रहालयांसाठीही ओळखलं जातं. मोठे किल्ले, वन्यजीव अभयारण्य हीदेखील उदयपूरची ओळख आहे. महाराणा उदयसिंह द्वितीय यांनी 1559मध्ये या शहराची स्थापना केली. समृद्ध संस्कृती आणि परंपरा यांसाठी ओळखल्या जाणाऱ्या या शहरातअनेक किल्ले आहेत; मात्र सिटी पॅलेस वैशिष्ट्यपूर्ण आहे. केवळ सिटी पॅलेस पाहायचा असेल, तर एक दिवस कमी पडतो. त्यामुळे संपूर्ण उदयपूरचा फेरफटका मारायचा असेल, तर चार-पाच दिवस फिरायच्या तयारीनेच जायला हवं. 4. डलहौसी (Dalhousie) : हिमाचल प्रदेशातलं (Himachal Pradesh) डलहौसी हे हिल स्टेशन ब्रिटिश गव्हर्नर लॉर्ड डलहौसीने वसवलं. म्हणून त्याचंच नाव त्याला देण्यात आलं. पाच डोंगरांवर वसलेल्या या शहराचं क्षेत्रफळ 14 चौरस किलोमीटर एवढं आहे. ब्रिटिशांच्या वास्तुशैलीची झलक इथे पाहायला मिळते. डोंगरदऱ्यांतून खळाळणारी रावी नदी, उंच, हिरवेगार डोंगर पाहणं हा एक अविस्मरणीय अनुभव असतो. हे वाचा - रोज खा Mood चांगला करणारे हे 11 हेल्दी फूड; तणाव वाढणार नाही आणि उत्साही राहाल 5. कूर्ग/कोडागू (कर्नाटक) (Coorg) : कर्नाटक (Karnakata) राज्यातल्या कूर्ग या शहराला भारताचं स्कॉटलंड म्हणून ओळखलं जातं. हिरवेगार आणि उंचच उंच डोंगररांगा हे कूर्गचं वैशिष्ट्य. प्रत्येक हंगामातच कूर्ग खूप सुंदर दिसतं; पण पावसाळ्यात त्याच्या सौंदर्याला चार चाँद लागतात. फळं आणि कॉफीच्या बागा वेड लावतात. निसर्गसौंदर्याची आवड असणाऱ्यांनी कूर्गची सफर चुकवू नयेच. 6. अंदमान-निकोबार (Andaman-Nicobar) : अंदमान निकोबार द्वीपसमूहावर वर्षभर सारखंच वातावरण असतं. पांढऱ्या वाळूचे किनारे, खारफुटीची जंगलं, उष्णकटिबंधीय वर्षावनं यांसाठी ही बेटं प्रसिद्ध आहेत. इथली सात बेटं फिरण्यासाठी आठवडाभराचा कालावधी लागतो. 7. अलेप्पी (केरळ) (Aleppy) : केरळच्या (Kerala) बॅकवॉटर्सची भूल सर्वांनाच पडते. हनिमून कपल्ससाठी तर बॅकवॉटरची सैर म्हणजे एक नितांतसुंदर स्वप्नवत अनुभव. अलेप्पी खासकरून ओळखलं जातं ते हाउसबोटीच्या सफरीसाठी. अंबालापुक्षा कृष्ण मंदिर, कृष्णापुरम पॅलेस, मरारी समुद्रकिनारा ही पर्यटनस्थळंही सुंदर आहेत. इथल्या एकांतात तुमच्या जोडीदाराशी तुमचे भावबंध जुळण्यास खूप मदत होईल. 8. ऊटी (Ooty) : तमिळनाडूतलं (Tamilnadu) ऊटी हे शहर म्हणजे शांत आणि प्रदूषण नसलेलं हिलस्टेशन. नीलगिरीचे सुंदर डोंगर, चहूबाजूंनी हिरवळ, आकर्षक तलाव ही निसर्गाची किमया भुरळ पाडते. डोडाबेट्टा शिखर, कलहट्टी धबधबा, कोटागिरी, मदुमलाई अभयारण्या अशी अनेक पर्यटनस्थळंही इथे पाहण्यासारखी आहेत. 9. औली (उत्तराखंड) (Auli) : उत्तराखंडच्या (Uttarakhand) चमोली जिल्ह्यातलं औली हे ठिकाण म्हणजे बर्फाची चादर ओढलेले नखशिखांत सुंदर डोंगर. इथे स्किइंगच्या स्पर्धाही आयोजित केल्या जातात. नंदादेवी ते द्रोणागिरीपर्यंतच्या शिखरांवर बर्फाचा नजारा आपल्याला थक्क करून टाकतो. त्यातच आपला जोडीदार बरोबर असेल तर बहारच. हे वाचा - रोज खा Mood चांगला करणारे हे 11 हेल्दी फूड; तणाव वाढणार नाही आणि उत्साही राहाल 10. माणा (उत्तराखंड) (Mana) : हिमालयात बद्रिनाथच्या (Badrinath) पुढे तीन किलोमीटरवर माणा हे तिबेट सीमेवरचं भारतातलं शेवटचं गाव वसलेलं आहे. ते समुद्रसपाटीपासून 18 हजार फूट उंचीवर आहे. इथल्या परंपरा वैशिष्ट्यपूर्ण आहेत. गुप्त गंगा आणि अलकनंदा या नद्यांच्या संगमावरच्या या गावाबद्दल फार कोणाला माहिती नाही. याचं शांत वातावरण लोकांना आकर्षित करून घेतं.
Published by:Priya Lad
First published: