घशाचं दुखणं आणि सतत येणाऱ्या सुजेमुळे अनेकांना जेवणही जात नाही. पाणी पिणंही त्यांना कठीण होऊन जातं. बोलणं, खाणं- पिणं या सगळ्यावरच निर्बंध येतात. अनेकदा डॉक्टरांकडे जाऊन त्यावर उपचार घेतले जातात पण काही दिवसांनी पुन्हा हा त्रास सुरू होतो. मात्र काही घरगुती उपायांनी तुम्ही या त्रासातून कायमची सुटका करून घेऊ शकता. उपाय- दोन ग्राम तुरटी म्हणजे अर्धा चमचा तुरटीची पावडर, 250 ग्रॅम गरम पाण्यात टाकून त्याच्या दिवसातून दोन ते तीन वेळा गुळण्या करा. यामुळे घशाची सूज कमी होईल आणिअवघ्या काही मिनिटांत आराम मिळेल. जर हे करणं शक्य नसेल तर अर्धा चमचा मीठ गरम पाण्यात टाकून गुळण्या करा. या उपायानेही लगेच आराम मिळेल. घशाला आलेली सूज आणि दुखण्यासाठी 10 ग्रॅम अर्थात जवळपास दोन चमचे ओवा घ्या आणि 500 ग्रॅम पाण्यात 15 मिनिटं उकळवा. त्यानंतर गाळणीने ओवा बाजूला करून त्या गरम पाण्यात थोडसं मीठ टाकून दिवसातून दोन वेळा गुळण्या करा. रात्री झोपण्यापूर्वी या पाण्याच्या गुळण्या केल्यास घशाला जास्त चांगला आराम मिळतो. जर तुमच्या घशाला सूज आली असेल आणि खोकलाही झाला असेल तर दोन ग्रॅम ओवा रात्री झोपण्यापूर्वी चांगला चावून खा आणि त्यानंतर गरम पाणी प्या. यामुळे कफ कमी होईल आणि घशाची सूजही कमी होईल. याशिवाय तुम्हाला झोपही चांगली लागेल. टीप- या लेखात दिलेली माहिती आणि सूचना ही सर्वसामान्य माहितीवर आधारित आहे. न्यूज18 लोकमत याची पुष्टी करत नाही. याची अंबलबजावणी करण्यापूर्वी तज्ज्ञांशी संपर्क साधावा. बेडवर चुकूनही करू नका ही एक गोष्ट, आयुष्यभर रहाल अयशस्वी! या इशाऱ्यांनी समजून जा मुलगा तुमच्याशी फ्लर्ट करतो की नाही! फायदेशीर आहे हे गवत, मधुमेह- डोळ्यांच्या आजारावर ठरतं रामबाण उपाय SPECIAL REPORT: ..तरीही मीच जिंकणार! पंकजा मुंडेंचं राष्ट्रवादी काँग्रेसला थेट आव्हान
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.