मराठी बातम्या /बातम्या /लाइफस्टाइल /

सर्दी-खोकल्यावर रामबाण उपाय असलेली खडीसाखरेविषयी हे माहीत आहे का?

सर्दी-खोकल्यावर रामबाण उपाय असलेली खडीसाखरेविषयी हे माहीत आहे का?

खोकल्यावर सर्वांत चांगला उपाय म्हणजे खडीसाखर खाणं. पण खडीसारखेविषयी ही अधिकची माहिती आहे का?

खोकल्यावर सर्वांत चांगला उपाय म्हणजे खडीसाखर खाणं. पण खडीसारखेविषयी ही अधिकची माहिती आहे का?

खोकल्यावर सर्वांत चांगला उपाय म्हणजे खडीसाखर खाणं. पण खडीसारखेविषयी ही अधिकची माहिती आहे का?

दिल्ली, 8 फेब्रुवारी: प्रत्येकाच्या स्वयंपाकघरात खडीसाखर (Mishri or Rock Sugar) असतेच. खडीसाखर आपल्या आरोग्यासाठी अत्यंत उत्तम असते. शिवाय आयुर्वेदात खडीसाखरेचं महत्त्वही सांगण्यात आलं आहे. अनेक आयुर्वेदिक औषधांमध्ये खडीसाखरेचा वापर केला जातो. सर्दी-खोकला हा काही गंभीर आजार नाही; पण त्यामुळे आपण खूपच अस्वस्थ होतो. काही वेळा सर्दी-खोकल्यावर औषधं लागू पडत नाहीत किंवा परिणाम कमी दिसतो. खोकल्यावर सर्वांत चांगला उपाय म्हणजे खडीसाखर खाणं. आपली दृष्टी वाढवण्यापासून ते सर्दी-खोकल्यापर्यंत खडीसाखर खूप फायदेशीर आहे. खडीसाखरेचे अनेक (Incredible Health Benefits Of Mishri or Rock Sugar) फायदे आहेत. रोज खडीसाखरेचं सेवन केलं, तर तुम्हाला अनेक फायदे जाणवतील. खडीसाखर खाण्याचे फायदे जाणून घेऊ या. याबाबतची माहिती 'झी न्यूज हिंदी'ने प्रसिद्ध केली आहे. आयुर्वेदात साखरेपेक्षाही खडीसारखेला जास्त महत्त्व देण्यात आलं आहे. साखर बनवताना त्यात अनेक प्रकारची रसायनं वापरली जातात. म्हणून काही जण साखर किंवा साखरेपासून बनलेले पदार्थ खाणे टाळतात. साखरेला पर्याय म्हणून अनेक जण खडीसाखर खातात. खडीसाखर आपल्या शरीरासाठी अनेक प्रकारे फायदेशीर आहे. दृष्टी वाढवण्यापासून ते सर्दी-खोकला बरा होण्यापर्यंतचे अनेक उपाय खडीसाखरेमुळे होतात. एवढंच नाही, तर रोज माउथ फ्रेशनर म्हणूनही खडीसाखरेचा वापर केला जातो. दृष्टीही सुधारते नजर कमकुवत असेल तर खडीसाखर खाण्याचा सल्ला दिला जातो. कारण, खडीसाखर डोळ्यांच्या आरोग्यासाठी उत्तम असते. दृष्टीसंदर्भात काही त्रास जाणवत असेल किंवा नजर अंधूक होत असेल तर दररोज खडीसाखरेचं सेवन करावं. याचा नक्कीच चांगला फायदा होतो. काही व्यक्तींना थोडी हालचाल केली किंवा काम केलं की थकवा जाणवतो. यावर खडीसाखर रामबाण उपाय आहे. खडीसाखरेचं सेवन केल्याने थकवा दूर होतो. याशिवाय, खडीसाखरेच्या सेवनाने पुरुषांचे शुक्राणू सुधारतात, असंदेखील सांगितलं जातं. खडीसाखर खाल्ल्याने रक्तातली आम्ल पातळी योग्य राहते. तसंच उलट्या आणि मळमळ दूर करण्यासाठीदेखील खडीसाखर खूप फायदेशीर आहे. सध्या कोरोनाने जगभरात हाहाकार माजवला आहे. कोरोनाचा धोका असल्याने प्रत्येकाने काळजी घ्यावयास हवी. सर्दी, खोकला झाला तर दररोज खडीसाखर खावी. याचा फायदा होतो. खोकला कमी करण्यासाठी खडीसाखर मदत करते. खडीसाखरेच्या सेवनाने रोगप्रतिकारशक्ती सुधारण्यासही मदत होते, असं सांगितलं जातं. पोषणद्रव्यांच्या तुलनेत साखरेपेक्षा खडीसाखर अधिक चांगली असते. त्यामुळे नेहमीच्या वापरातल्या साखरेपेक्षा खडीसाखर खाणं अधिक फायदेशीर ठरते. तुम्हीदेखील खडीसाखरेचा आपल्या आहारात समावेश करून अनेक आजारांपासून आपली सुटका करून घेऊ शकता.
First published:

Tags: Ayurved, Health, Home remedies

पुढील बातम्या