जाहिरात
मराठी बातम्या / लाइफस्टाइल / सर्दी-खोकला आला की अनेकजण ही फळं खायची बंद करतात; चुकीचे समज वेळीच दूर करा

सर्दी-खोकला आला की अनेकजण ही फळं खायची बंद करतात; चुकीचे समज वेळीच दूर करा

सर्दी-खोकला आला की अनेकजण ही फळं खायची बंद करतात; चुकीचे समज वेळीच दूर करा

Fruit to Eat in Cough-Cold : थंडीच्या दिवसात सर्दी-खोकल्याचा त्रास झाल्यास कोणत्या फळांचा आहारात समावेश करावा हे तुम्हाला माहीत असायला हवे. जेणेकरून तुमची रोगप्रतिकारशक्तीही मजबूत होईल आणि तुमची समस्याही लवकर कमी होईल.

  • -MIN READ
  • Last Updated :

नवी दिल्ली, 07 फेब्रुवारी : हिवाळ्यात खोकला, सर्दी आणि कफची समस्या कॉमन आहे. पण कधी-कधी हे साधे वाटणारे त्रास खूप डोकंदुखी ठरतात. या समस्येवर मात करण्यासाठी आपण आहारात विविध गोष्टींचा समावेश करतो. मात्र, अनेकजण असा त्रास होऊ लागल्यास लिंबूवर्गीय फळं खाणं बंद करतात. खोकला, सर्दी, कफ झालेले असताना आंबट चवीची फळं खाल्ल्यानंतर सर्दी-खोकल्याचा त्रास आणखी वाढेल, असा अनेकांचा समज असतो. मात्र, सर्दी-खोकला झाला असला तरी आहारात या फळांचा समावेश करावा, असे तज्ज्ञांचे (Fruit to Eat in Winter) मत आहे. हेल्थसाइटनुसार, थंडीच्या दिवसात सर्दी-खोकल्याचा त्रास झाल्यास कोणत्या फळांचा आहारात समावेश करावा हे तुम्हाला माहीत असायला हवे. जेणेकरून तुमची रोगप्रतिकारशक्तीही मजबूत होईल आणि तुमची समस्याही लवकर कमी होईल. ब्लू बेरी खा खोकला आणि सर्दी झाल्यास, आपण आपल्या आहारात ब्लू बेरीचा समावेश करणे आवश्यक आहे. वास्तविक ब्लू बेरीमध्ये भरपूर प्रमाणात अँटी-ऑक्सिडंट असतात. त्यात खनिजे, व्हिटॅमिन सी, व्हिटॅमिन के, मॅंगनीज आणि फायबर यांसारखी पोषकतत्त्वेही चांगल्या प्रमाणात असतात. ब्लू बेरी खाल्ल्यानं रोगप्रतिकारक शक्ती मजबूत होते आणि वजन कमी करण्यातही खूप मदत होते. तुम्ही लिंबू, संत्री आणि द्राक्षे यांचाही आहारात समावेश करू शकता. किवी खा तुम्ही तुमच्या आहारात किवीचाही समावेश करावा. किवीमध्ये अँटी-ऑक्सिडंट्स, फोलेट, पोटॅशियम, फायबर आणि व्हिटॅमिन सी, के, ई सारखे भरपूर पोषक घटक असतात. यामुळे खोकला-सर्दी आणि कफसारख्या समस्या दूर करण्यास मदत होते. किवी खाल्ल्यानं पचन, रक्तदाब, रक्त गोठणे यासारख्या समस्याही नियंत्रणात राहतात आणि रोगप्रतिकारशक्तीही मजबूत होते. इतकंच नाही तर अननस, पपई, पेरू, मोसंबी यांसारखी फळंही तुम्ही या काळात विचार न करता खाऊ शकता. हे वाचा -  Guava Benefits: बद्धकोष्ठतेसह पोटाच्या समस्यांवर पेरू खाणं आहे जबरदस्त इलाज; या पद्धतींचा करा उपयोग केळी खाऊ शकता हिवाळ्यात आणि विशेषत: सर्दी-खोकला असेल तेव्हा बरेच लोक केळी खाणं बंद करतात. या काळात तुम्ही केळीदेखील खाऊ शकता. फक्त संध्याकाळी उशिरा आणि रात्री केळी खाणं टाळावं. हे वाचा -  Betel-nut Benefits: सुपारी म्हटलं की फक्त पान-मसाला, गुटखा इतकंच नव्हे; आरोग्यदायी फायदे अनेकांना माहीत नाहीत यासोबतच तुम्हाला हवे असल्यास आंबा, टरबूज, नासपती या फळांचाही आहारात समावेश करू शकता. आजकाल हंगाम नसतानाही ही सर्व फळे बाजारात सहज उपलब्ध होतात. (सूचना : येथे दिलेली माहिती सामान्य वैद्यकीय माहितीवर आधारित आहे. न्यूज 18 लोकमत त्याची हमी देत नाही.)

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात