नवी दिल्ली, 06 फेब्रुवारी : आजकालच्या व्यग्र जीवनशैलीत (Lifestyle) असंतुलित आहार घेणं किंवा जास्त जंक फूड खाल्ल्यामुळं वजन वाढणं ही एक कॉमन समस्या बनली आहे. यामुळेच आज प्रत्येक दुसरा व्यक्ती लठ्ठपणामुळं चिंतेत आहे. लठ्ठपणा कमी करण्यासाठी लोक योगापासून ते डायट प्लॅन (Diet Plan) तयार करण्यापर्यंत विविध प्रकारच्या टिप्सचा अवलंब करतात. पण तुम्हाला माहीत आहे का, की वजन कमी करण्याच्या काही टिप्स (Weight loss tips) तुमचं वजन कमी करण्याऐवजी वाढवू (Tips to Reduce Belly Fat) शकतात.
खरं तर लठ्ठपणा कमी करण्याच्या धडपडीत अनेक वेळा आपण काही गोष्टींकडे दुर्लक्ष करतो. त्यामुळे शरीरातील चरबीचं प्रमाण वाढतं आणि त्यामुळे पोटाची चरबी वाढू लागते. पण जर तुम्हाला खरंच वजन कमी करायचं असेल तंदुरुस्त आणि निरोगी राहायचं असेल तर तुम्ही तुमच्या वजन कमी करण्याच्या रुटीनमध्ये काही गोष्टींची काळजी घेऊ शकता.
असंतुलित आहार घेणं टाळा
काही लोक वजन कमी करण्यासाठी कठोर डाएट प्लॅन फॉलो करतात. तर काही लोक लवकर तंदुरुस्त होण्यासाठी झिरो कार्बन आणि झिरो फॅट या गोष्टींचे सेवन करू लागतात. पण वजन कमी करण्याची ही पद्धत तुमच्यासाठी वाईट ठरू शकते.
खरं तर असं केल्यानं शरीरात पोषक तत्वांची कमतरता भासते. त्यामुळे स्नायू अशक्त होणं, शरीरात पाण्याची कमतरता यासारख्या समस्या दिसून येतात. म्हणूनच पोषक तत्वांनी युक्त असा संतुलित आहार आपल्या आहाराचा भाग बनवणं अत्यंत आवश्यक आहे. तसेच कॅलरीज खाण्याकडं विशेष लक्ष द्या.
भरपूर पाणी पिणं
जर तुम्ही वजन कमी करण्याचा प्रयत्न करत असाल तर पाण्याला तुमच्या आहाराचा महत्त्वाचा भाग बनवायला विसरू नका. तुमचा लठ्ठपणा कमी करण्यासाठी पाणी खूप उपयुक्त ठरू शकते. वेळोवेळी पाणी प्यायल्याने केवळ पोट भरलेले राहत नाही तर तुम्ही जास्त उष्मांक असलेल्या अन्नाचा वापर कमी करता. शरीरातील चयापचय गती देखील वाढते. त्यामुळे वजन सहज कमी होऊ लागतं.
हे वाचा - तुम्ही टॉयलेटमधून आल्यानंतर लगेच पाणी पिता का? हेल्थवर होऊ शकतो उलटा परिणाम
झोप महत्त्वाची
अनेक वेळा झोप न लागल्यामुळं किंवा रात्री उशिरापर्यंत जागरण झाल्यामुळं शरीरात कोर्टिसोल नावाचे हार्मोन्स वाढते. त्यामुळे तणाव वाढण्यास सुरुवात होते आणि त्याचा थेट परिणाम तुमच्या वजनावर तसेच तुमच्या आरोग्यावर होतो. रात्री उशिरापर्यंत जागरण केल्यानंही जास्त कॅलरी अन्न खाण्याची लालसा वाढते. ज्याचा शरीरातील मेटाबॉलिक रेटवर परिणाम होतो आणि तुमचे वजन कमी होण्याऐवजी वाढू लागतं. अशा प्रकारे या साध्या टिप्स वापरून तुम्ही वजन नियंत्रणात ठेवण्याचा प्रयत्न करा.
(सूचना : येथे दिलेली माहिती सामान्य वैद्यकीय माहितीवर आधारित आहे. न्यूज 18 लोकमत त्याची हमी देत नाही.)
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Weight, Weight loss tips