जाहिरात
मराठी बातम्या / लाइफस्टाइल / Winter tips: थंडीच्या दिवसात रात्रभर पायात मोजे घालणं ठरू शकतं त्रासदायक, जाणून घ्या तोटे

Winter tips: थंडीच्या दिवसात रात्रभर पायात मोजे घालणं ठरू शकतं त्रासदायक, जाणून घ्या तोटे

Winter tips: थंडीच्या दिवसात रात्रभर पायात मोजे घालणं ठरू शकतं त्रासदायक, जाणून घ्या तोटे

Winter Tips: थंडीपासून बचाव करण्यासाठी अनेक जण रात्री झोपताना हमखास पायात मोजे घालून झोपतात. त्यामुळे पायांना ऊब मिळते आणि ते गारही पडत नाहीत. त्यामुळे थंडी येताच रात्री झोपण्याआधी अंगावर स्वेटर आणि पायात मोजे घातले जातातच.

  • -MIN READ Trending Desk
  • Last Updated :

नवी दिल्ली, 07 फेब्रुवारी: थंडी सुरू झाली, की बऱ्याच जणांचे पाय गार पडतात. अनेकांच्या पायाला भेगा पडतात. थंडीपासून बचाव (Winter Tips) करण्यासाठी अनेक जण रात्री झोपताना हमखास पायात मोजे घालून झोपतात. त्यामुळे पायांना ऊब मिळते आणि ते गारही पडत नाहीत. त्यामुळे थंडी येताच रात्री झोपण्याआधी अंगावर स्वेटर आणि पायात मोजे घातले जातातच. पायात रात्रभर मोजे घालून झोपण्याची ही सवय शरीरासाठी त्रासदायक ठरू शकते. याबद्दलची माहिती ‘टीव्ही 9 हिंदी’ने प्रसिद्ध केली आहे. थंडीच्या दिवसांत पायात घातलेले मोजे कितीही ऊबदार आणि छान वाटले, तरी याचा शरीराच्या रक्ताभिसरणावर (Blood Circulation) वाईट परिणाम होत असल्याचं रिपोर्ट्समधून समोर आलं आहे. रात्रभर किंवा बराच काळ मोजे घालून ठेवल्यास नसांवर त्याचा दबाव पडून आरोग्यासंबंधीच्या समस्या (Health Problems) निर्माण होण्याची शक्यता संशोधकांनी वर्तवली आहे. त्यामुळे थंडीच्या दिवसांतल्या या सवयीमुळे शरीराला कोणत्या प्रकारचे त्रास होऊ शकतात हे जाणून घेणंही आवश्यक आहे. थंडीच्या दिवसांत पाय ऊबदार राहावेत, यासाठी मोजे घालण्याला पसंती दिली जाते. शरीराला जास्त प्रमाणात ऊब मिळाल्यास ती अपायकारक ठरू शकते. जास्त ऊब मिळाल्याने शरीराचं तापमान वाढू शकतं. त्यामुळे बैचेनी जाणवू शकते. त्यामुळे रात्री झोपताना मोजे घालणं टाळलेलंच बरं राहील.

Propose Day विषयी ‘हे’ माहित आहे का? कसं करावं प्रपोज? काय द्यावं गिफ्ट?

पायात घट्ट मोजे (Socks) घालून झोपल्यास जास्त ऊब मिळेल, असा काही जणांचा समज असतो; पण यामुळे हृदयाशी निगडित समस्याही (Heart Problem) उद्भवू शकतात, असं संशोधकांचं मत आहे. घट्ट मोजे घातल्याने रक्तवाहिन्यांवरचा दबाव वाढतो. त्यामुळे हृदयाला होणाऱ्या रक्तपुरवठ्यावर परिणाम होतो. त्यामुळे हृदयाला रक्तासाठी जास्त पंपिंग करावं लागतो आणि त्यावर जास्त जोर पडू लागतो. त्यामुळे रात्री पायांना कितीही थंडी वाजत असली तरी हृदयाशी संबंधित तक्रारी असणाऱ्यांनी हे टाळलेलंच बरं ठरेल. अगदीच गरज वाटल्यास सैलसर मोजे घालून झोपावं. एखाद्या वेळी घट्ट कपडे घातल्यास आपल्याला थोड्या वेळानंतर त्रास होतो. कारण त्याचा परिणाम आपल्या रक्ताभिसरणावर होत असतो. तसाच परिणाम रात्रभर मोजे घातल्यास आपले तळपाय आणि पायांमधलं ब्लड सर्क्युलेशन म्हणजेच रक्ताभिसरणावर होतो. त्यामुळे पायाला मुंग्या येणं किवा पाय आखडणं यासारखा त्रास होत असल्याचं संशोधनात आढळलं आहे.

दीर्घ कोविडचा शारीरिक संबंधांवर होतोय परिणाम! ट्रॉमाच्या लक्षणामुळे Sexual Life प्रभावित

पायासाठी मोजे वापरताना त्यांची स्वच्छताही महत्त्वाची आहे. अनेकजण बाहेर वापरलेले मोजे न काढता तेच घालून झोपून जातात. मोज्यांमध्ये जमा झालेली बाहेरची धूळ आणि माती यांमुळे त्वचेवर विपरीत परिणाम होऊ शकतो. त्यामुळे त्वचेशी निगडित समस्या (Skin Problem) निर्माण होण्याची भीतीही असते. म्हणूनच घरात मोजे घालून झोपायचं असेल, तर वेगळे, स्वच्छ आणि सैल मोजे वापरावेत.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात