Home /News /lifestyle /

फक्त एका क्लिकवर तुमच्या जवळच्या लसीकरण केंद्रावर पोहोचा; Google Maps आहे मदतीला

फक्त एका क्लिकवर तुमच्या जवळच्या लसीकरण केंद्रावर पोहोचा; Google Maps आहे मदतीला

तुमच्या परिसरात कोरोना चाचणी (Testing Centre) आणि कोरोना लसीकरण (Corona Vaccination Centre) केंद्र कुठे आहे, हे गुगल मॅप (Google Maps) तुम्हाला दाखवेल.

    नवी दिल्ली, 24 एप्रिल : देशभरात कोरोनाबाधितांची संख्या वेगाने वाढत आहे. त्यामुळे लोक आता कोरोनाबाबत अधिक काळजी घेऊ लागले आहेत. लक्षणं दिसली की कोरोना चाचणी करून घेणं, तसंच कोरोना लस घेण्यासाठी नागरिक स्वतःहून पुढे येत आहेत. पण अनेकदा लोकांना चाचणी कुठे करावी किंवा लस कुठे घ्यावी हे समजत नाही. आपल्या परिसरात जवळ कोरोना चाचणी (Testing Centre) आणि कोरोना लसीकरण (Corona Vaccination Centre) केंद्र कुठे आहे. पण आता काळजी करू नका गुगल मॅप (Google Maps) तुमच्या मदतीला आहे. नागरिकांना आपल्या जवळील कोरोना चाचणी केंद्र आणि कोरोना प्रतिबंधक लसीकरण केंद्राचा शोध आता गुगल मॅप्स (Google Maps)या अ‍ॅपद्वारे घेता येणार आहे. या अ‍ॅपमध्ये फोन क्रमांक आणि केंद्रांच्या कामकाजाची वेळ ही अतिरिक्त माहिती देखील मिळणार आहे. हे वाचा - R-Surakshaa : आपल्या कर्मचाऱ्यांसाठी Reliance स्वतःच राबवणार कोरोना लसीकरण मोहीम नागरिकांनी आपल्या जवळील चाचणी केंद्रांची माहिती तपासण्यासाठी गुगल मॅप हे अ‍ॅप ओपन करून Covid Test Near Me असं टाईप करावं. तसंच युझर्सला COVID 19 Test किंवा Covid Testing या की-वर्डचा वापर करूनही चाचणी केंद्रांची माहिती मिळवता येणार आहे. आयओएस (iOS) आणि अँड्रॉईड दोन्ही युझर्स थेट मॅपवर (लॅंडमार्क चिन्हासह) किंवा एखाद्या सूचीद्वारे ही माहिती पाहू शकणार आहेत. तसंच युझर्स या अनुषंगाने सल्लागार, खासगी किंवा शासकीय संपर्क आणि कामकाजाची संपूर्ण माहिती शोधू शकतात. एखादी लॅब घरी येऊन स्वॅब टेस्टींग करते का याची माहिती युझर्स फोन कॉलद्वारे घेऊ शकतात. जून 2020 मध्ये गुगलवर (Google) कोविड-19 चाचणी केंद्राचे सर्च फिचर सुरू करण्यात आले आहे. हे वाचा - Google Photos वरून डिलीट झालेले फोटो-व्हिडीओ कसे मिळवाल? गुगलची जबरदस्त ट्रीक! याचप्रमाणे गुगल मॅप्सने अलिकडेच एक नवीन फिचर सुरू केलं असून त्याद्वारे युझर्स आपल्या नजीकच्या कोरोना प्रतिबंधक लसीकरण केंद्राची माहिती देखील मिळवू शकतात. यासाठी युझर्सला COVID 19 Vaccination आणि Covid Vaccination Near me या कीवर्ड्सचा वापर करावा लागेल. मात्र यासाठी युझर्सला थेट रुग्णालयातील वेळेची उपलब्धता जाणून घ्यावी लागेल. ही वेळ बुक करण्यासाठी केंद्र सरकारने CoWIN ही वेबसाईट आणि आरोग्य सेतू अ‍ॅप हे एकात्मिक प्लॅटफॉर्म्स विकसित केले आहेत.
    First published:

    Tags: Corona, Corona vaccination, Coronavirus, Google

    पुढील बातम्या