जाहिरात
मराठी बातम्या / लाइफस्टाइल / ‘ही’ हिरवी पानं संपवतील केसातल्या कोंड्याची समस्या; करूनच पाहा उपाय

‘ही’ हिरवी पानं संपवतील केसातल्या कोंड्याची समस्या; करूनच पाहा उपाय

कडुलिंबाचा रस तयार करण्यासाठी आधी 15 ते 20 कडूलिंबाची पाने घ्या. ही पाने पाण्याने धुवा. यानंतर ते मिक्सरच्या भांड्यात अर्धा ग्लास पाणी आणि ही पानं घाला. बारीक वाटा. हा रस गाळून घ्या. रोज एक ग्लास रस प्यायल्यास. हळूहळू फरक दिसू लागेल.

कडुलिंबाचा रस तयार करण्यासाठी आधी 15 ते 20 कडूलिंबाची पाने घ्या. ही पाने पाण्याने धुवा. यानंतर ते मिक्सरच्या भांड्यात अर्धा ग्लास पाणी आणि ही पानं घाला. बारीक वाटा. हा रस गाळून घ्या. रोज एक ग्लास रस प्यायल्यास. हळूहळू फरक दिसू लागेल.

आयुर्वेदानुसार कडूलिंबाच्या पानांना (Neem Leaves) खूप महत्त्व आहे. केस आणि त्वचेच्या समस्या संपवण्यासाठी वापर करता येतो.

  • -MIN READ
  • Last Updated :

दिल्ली, 24 जुलै : आयुर्वेदात कडुनिंबाच्या पानांचं (Neem Leaves) महत्त्व सांगितलं गेलं  आहे. त्वचेसाठीच नाही तर केसांच्या अनेक समस्या दूर (Reduce Skin & Hair Problem) ठेवण्यासाठी त्याचा वापर होतो. आजकाल डोक्यातील कोंडा (Dandruff Problem) केसांची सर्वात मोठी समस्या बनली आहे. जेव्हा स्कॅल्प खुप तेलकट बनतं (Oily Scalp) आणि त्वचेचे पापुद्रे निघू लागतात. तेव्हा केसात कोंडा वाढलेला असतो यामुळे केसांचं बरंच नुकसान होतं. केस चांगले दितन नाहीत आणि त्यामुळे केसांच्या मुळांना खाज सुटायला लागते.केसात कोंडा झाला की आपण कितीतरी उपाय करतो. कडुलिंबाचा वापर करून देखील डोक्यातील कोंडा घालवात येतो. वापराची पद्धत सर्वात आधी गॅसवर 1 लिटर पाणी उकळत ठेवा. पाणी गरम झालं की कडुनलिंबाची पानं घाला आणि गॅस बंद करा. रात्रभर असेच राहूद्या. सकाळी आंघोळ करताना या पाण्याने आपले केस धुवा. याचा नियमित वापर केल्याने कोंड्यामुळे येणारी खाज कमी होईल. आठवड्यातून 2 किंवा 3 वेळा वापर केल्यास काही आठवड्यात डोक्यातील कोंडाची समस्या पूर्णपणे नष्ट होईल. ( हळदीचा ‘असा’ वापर संपवेल युरिक अ‍ॅसिडचा त्रास; नाही दुखणार सांधे ) हेयर पॅक कोंड्यासाठी कडूलिंबाचा पॅक खुप फायदेशीर ठरतो. पाणी गरम करून त्यात कडुलिंबाची पानं घाला आणि गॅस बंद करा. रात्रभर असंच राहूद्या. ( मीरा कपूरचा आणखी एक व्हीडिओ Viral; योगा करताना स्वत:चीच केली पोलखोल ) सकाळी या पानांची पेस्ट बनवून घ्या आणि या पेस्टमध्ये मध घालून आपल्या केसांच्या मुळांवर आणि केसांवर चांगलं लावा. 20-25 मिनिटांनी पाण्याने धुवा. आठवड्यातून एकदा हा पॅक वापरा. कोंडीतून निघून जाईल. ( या शहरात राहतात फक्त 138 लोक; मेयरने दिली जॉब आणि फुकट घराची ऑफर ) कडुलिंब आणि नारळ****ाचं तेल नारळाचं तेल गरम करून त्यात कडुलिंबाची पानं घाला. मंद आचेवर 10-15 मिनिटं उकळल्यानंतर गॅस बंद करा. तेल थंड झाल्यानंतर त्यात एरंडेल तेल आणि लिंबाचा रस घाला. हे मिश्रण एका बाटलीमध्ये भरू ठेवा. आठवड्यातून दोनदा आपल्या केसांवर आणि त्यांच्या मुळांवर चांगलं लावा आणि एका तासानंतर धुवा.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात