मराठी बातम्या /बातम्या /लाइफस्टाइल /

मीरा कपूरचा आणखी एक व्हीडिओ Viral; योगा करताना स्वत:चीच केली पोलखोल

मीरा कपूरचा आणखी एक व्हीडिओ Viral; योगा करताना स्वत:चीच केली पोलखोल

हलासन करताना काय अपेक्षित असतं आणि आपण काय करते हे मीराने सांगितलं आहे.

हलासन करताना काय अपेक्षित असतं आणि आपण काय करते हे मीराने सांगितलं आहे.

मीराने इन्स्टाग्रामवरून (Instagram) योगासन करतानाचा एक गंमतीदार व्हीडिओ शेअर (Share Video) केला आहे. तिने एक्पेक्टेशन्स विरूद्ध रिऍलिटी (Expectations vs Reality Video) अशी कॅप्शन देत योगा करतानाचा व्हीडिओ पोस्ट केलाय.

  • Published by:  News18 Desk

नवी दिल्ली,22 जुलै: अभिनेता शाहिद कपूरची पत्नी मीरा राजपूत कपूर (Mira Rajput Kapoor) सोशल मीडियावर (Social Media) प्रचंड ऍक्टिव्ह आहे. जरी ती अभिनय क्षेत्रात काम करत नसली तरीही, ती तिचं सौंदर्य आणि फिटनेसमुळे (Beauty & Fitness) चर्चेत असतेच. यावेळीही तिने आपल्या चाहत्यांसाठी इन्स्टाग्रामवरून (Instagram) योगासन करतानाचा एक गंमतीदार व्हीडिओ शेअर  (Share Video) केला आहे. तिने एक्पेक्टेशन्स विरूद्ध रिअ‍ॅलिटी (Expectations vs Reality Video) अशी देत कॅप्शन आपला योगा करतानाचा व्हीडिओ पोस्ट केलाय. यात तिने हलासन करतानाची पोझ दाखवलेली आहे. सुरवातीला मीरा आपल्या योगा क्लासला जातांना दिसते. त्यानंतर ती हलासन करण्यासाठी योगा मॅटवर झोपलेली दाखवली आहे. हलासन करताना काय अपेक्षित असतं आणि ती काय करते हे मीराने सांगितलं आहे.

योगा क्लासला जाताना उत्साह वाटतो. योगा मनशांतीसाठी केला जातो. पण, योगासन करताना किती विचार मनात डोकावतात हे मीरा सांगते. सरतेशेवटी मी हे नाही करू शकत, आज रात्री पिझ्झा खाणार असाही विचार मनात येत असल्याचं तिने या गंमतीदार व्हीडिओमध्ये म्हटलं आहे. याआधीही मीराने योगा करतानाचे व्हीडिओ शेअर केले आहेत. यापूर्वी तिने आंतरराष्ट्रीय योग दिनाच्या दिवशी काही खास योगासनं करत एक इन्सिरेश्नल व्हीडिओ पोस्ट केला होता.

यात ती एका गार्डनमध्ये योग करताना दिसली.मुलांना जन्म दिल्यानंतर फिट राहण्याची इच्छा पूर्ण करण्यासाठी योगाने प्रेरणा दिली असं तिने लिहीलं होतं. योगा करण्यासाठी योगी होण्याची गरज नाही असं कॅप्शन तिने दिलं होतं.

First published:

Tags: Bollywood actor, Instagram post, Yoga