या सेलिब्रिटीचे 2 Dogs चोरीला; जो शोधेल त्याला मिळणार तब्बल 3 कोटी

या सेलिब्रिटीचे 2 Dogs चोरीला; जो शोधेल त्याला मिळणार तब्बल 3 कोटी

सेलिब्रिटीच्या दोन फ्रेंच बुलडॉगला (Lady Gaga Bulldogs) पळवून नेलं आहे.

  • Share this:

मुंबई, 26 फेब्रुवारी : कुत्रा (Dog) हरवला आहे किंवा चोरीला गेला आहे, शोधणाऱ्या बक्षीस देणार. अशी जाहीरात तशी कधी ना कधी तुम्ही पाहिली असेल. माणसांप्रमाणेच कुत्रेही आता अगदी जिव्हाळ्याचे झाले आहेत. त्यामुळे त्यांना शोधण्यासाठी त्यांचे मालकही धडपड करतातच. हजारो रुपयांचं बक्षीसही देतात. सध्या एका सेलिब्रिटीचे कुत्रे हरवले आहेत आणि त्यांना शोधण्यासाठी हजार, लाख नाही तर कोट्यवधींचं बक्षीस मिळणार आहे.

पॉप सिंगर लेडी गागा  (Lady Gaga) च्या दोन कुत्र्यांची चोरी झाली आहे. त्यांना शोधून देणाऱ्यांसाठी तिनं बक्षीस जारी केलं आहे. तिचे कुत्रे शोधून देणाऱ्याला तिनं 5 लाख डॉलर म्हणजे 3.65 कोटी रुपयांचं बक्षीस देण्याची घोषणा केली आहे.

काही दरोडेखोरांनी हल्ला करत लेडी गागाचे दोन फ्रेंच बुलडॉग (Lady Gaga Bulldogs) पळवून नेले. लेडी गागाचा डॉगवॉकरला रायन फिशरवरही त्यांनी हल्ला केला. या हल्ल्यात त्याला गोळी लागली आहे. त्यानंतर त्यांनी तिचे दोन कुत्रे पळवून नेले. कोजी आणि गुस्ताव (Koji and Gustav) अशी या कुत्र्यांची नावं आहेत. तिचा तिसरा कुत्रा एशिया पळून जाण्यात यशस्वी झाला. पोलिसांनी त्याला शोधलं आहे.

हे वाचा - टॉप 10 सेक्सी सुपरमॉडेल्समध्ये समावेश असणारी भारतीयच नव्हे एकमेव आशियाई व्यक्ती

सेलिब्रिटी वेबसाईट टीएमसीच्या रिपोर्टनुसार लेडी गागाला आपल्या या डॉग्जवर खूप प्रेम आहे. ते तिच्या खूप जवळचे आहेत आणि आता तिला ते काहीही करून हवे आहेत. तिचे वडील जो जर्मनोटा यांनी न्यूयॉर्क पोस्टशी बोलताना सांगितलं, जेव्हा हा हल्ला झाला तेव्हापासून ते आपल्या मुलीच्या संपर्कात सातत्याने आहेत. ते म्हणाले, आम्ही या घटनेमुळे हादरलो आहोत. कुणीतरी आमच्या मुलांनाच घेऊन गेलं असंच वाटतं आहे.

हे वाचा - विद्यार्थिनींसाठी फ्रान्समध्ये Menstrual Products फ्री, इतर देशात काय परिस्थिती?

गागाने एक ई-मेल आयडी जारी केला आहे. कुणालाही या कुत्र्यांबाबत माहिती झाली तर त्यांनी KojiandGustav@gmail.com या ई-मेलआयडीवर संपर्क करावा, असं आवाहन तिनं केलं आहे. लेडी गागा सध्या रोममध्ये शूटिंग करते आहे.

Published by: Priya Lad
First published: February 26, 2021, 4:40 PM IST

ताज्या बातम्या