विद्यार्थिनींसाठी फ्रान्समध्ये Menstrual Products फ्री, इतर देश कशी सांभाळतायंत याबाबची समस्या ?

विद्यार्थिनींसाठी फ्रान्समध्ये Menstrual Products फ्री, इतर देश कशी सांभाळतायंत याबाबची समस्या ?

फ्रान्स सरकारने आपल्या देशभरातील विद्यार्थिनींना मासिक पाळीच्या (Periods) काळात आवश्यक असलेल्या वस्तू मोफत देण्याची घोषणा केली आहे

  • Share this:

मुंबई, 26 फेब्रुवारी: फ्रान्स सरकारने आपल्या देशभरातील विद्यार्थिनींना मासिक पाळीच्या (Periods) काळात आवश्यक असलेल्या वस्तू मोफत देण्याची घोषणा केली आहे. पाळीच्या काळातील साधनांची कमतरता (period poverty) नष्ट करण्यासाठी सरकारने हा निर्णय घेतला असल्याचं बोललं जात आहे. उच्च शिक्षण मंत्री फ्रेडरिक व्हायडल यांनी याविषयी बोलताना, विद्यार्थिनींसाठी पुढील काही आठवड्यांत टॅम्पॉन आणि सॅनिटरी पॅड व्हेंडिंग मशीन, सॅनिटरी टॉवेल्स आणि इतर मासिक पाळीसंदर्भातील उत्पादनं विनामूल्य उपलब्ध करुन देण्यात येणार असल्याचं त्यांनी म्हटलं आहे.

पाळीच्या काळातील दारिद्र्य किंवा Period Poverty म्हणजे काय? आणि जगभरात याविषयी काय उपाय केले जातात?

पाळीच्या काळात महिलांसाठी आणि मुलींसाठी स्वच्छ स्वच्छतागृह आणि मासिक पाळीसंदसर्भात इतर साधनं उपलब्ध नसल्यास त्याला पिरिएड पॉवर्टी म्हणजेच या काळातील दारिद्र्य (Period Poverty) म्हणतात. ज्या भागांमध्ये आणि देशांमध्ये पायाभूत सुविधांचा आणि आर्थिक गोष्टींचा अभाव आहे तिथं या समस्या येतात. या प्रदेशातील महिलांना या काळात कोणत्याही प्रकारच्या सुविधा मिळत नाहीत. संयुक्त राष्ट्रांनी मासिक पाळीच्या काळातील समस्यांना जागतिक सार्वजनिक आरोग्य आणि मानवी हक्कांचा मुद्दा म्हणून मान्यता दिली आहे. पण अजूनही बऱ्याच आशियाई देशांमधील महिला मासिक पाळीच्या काळात मूलभूत स्वच्छताविषयक गोष्टींपासून वंचित आहेत.

UNCIEF आणि Water-aid ने एकत्रितपणे केलेल्या अभ्यासात दिसून आले आहे की, मासिक पाळीविषयी अनेक मुलींना पूर्ण माहिती नसते आणि त्यांच्यापैकी अनेकजणींना मासिक पाळीच्या काळात स्वच्छतेच्या सुविधांचा अभाव असल्यामुळे पहिल्या काही दिवसांमध्ये शाळेला देखील जाता येत नाही.

(हे वाचा-भारतीय खेळण्यांचा पहिला उत्सव 27 फेब्रुवारीपासून, डिजिटल प्रदर्शन आणि बरंच काही)

गेल्या वर्षी स्कॉटलँडने पहिल्यांदा आपल्या देशातील शाळेतील विद्यार्थिनींना सॅनिटरी उत्पादने मोफत देण्याची घोषणा केली होती. देशभरातील स्त्रीवादी आणि या काळातील अडचणींच्या तुटवड्याविरुद्ध आंदोलन करणाऱ्या संस्थांनी सरकारला यासाठी उद्युक्त केल्यानंतर सरकारने ही उत्पादने मोफत उपलब्ध करून दिली होती. इंग्लंडने देखील माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शाळांतील सर्व विद्यार्थिनींना मासिक पाळीच्या काळात ही उत्पादने मोफत उपलब्ध करून दिली आहेत.

न्यूझीलंडमध्ये देखील यावर्षीच्या जूनपासून सॅनिटरी पॅड आणि इतर गोष्टी मोफत उपलब्ध करून देण्यात येणार आहेत. या काळात अनेक मुलींना या वस्तू परवडत नसल्यामुळे विद्यार्थिनींना शाळा बुडवावी लागत असल्याचं देखील या सर्वेक्षणात म्हटलं आहे. याचबरोबर अमेरिकेतील अनेक स्टेट्समध्ये देखील यासाठी कायदे करण्यात आले असून लवकरच विद्यार्थिनींना ही उत्पादने मोफत उपलब्ध करून दिली जाणार आहेत.

(हे वाचा-महाराष्ट्रात कोरोनाचं नवं रूप; नव्या स्ट्रेनपासून कसा कराल स्वत:चा बचाव?)

वॉटर एड संस्थेच्या अहवालानुसार, भारतात दरवर्षी 1अब्ज सॅनिटरी पॅडचा (Sanitary Pad) वापर केला जातो. त्यामुळे याची विल्हेवाट लावण्यासाठी योग्य मार्ग तयार करणं गरजेचं असल्याचं म्हटलं आहे. अनेक वर्षांच्या लढ्यानंतर भारत सरकारने मासिक पाळीच्या काळात उपयोगी येणाऱ्या वस्तूंवरील 12 टक्के कर रद्द केला होता. याचबरोबर मासिक पाळीतील या काळामध्ये महिलांसाठी आणि मुलींसाठी सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी देशाला आणखी खूप प्रगती करणं गरजेचं असल्याचं अनेक रिपोर्टमध्ये म्हटलं आहे.

First published: February 26, 2021, 1:26 PM IST

ताज्या बातम्या