HBD Urvashi Rautela : टॉप 10 सेक्सी सुपरमॉडेल्समध्ये समावेश असणारी भारतीयच नव्हे तर एकमेव आशियाई व्यक्ती
उर्वशी रौतेला ही बॉलिवूड अभिनेत्री तसेच एक प्रसिद्ध मॉडेल सुद्धा आहे. मिस युनिव्हर्स स्पर्धेत भारताचं प्रतिनिधित्व केलेल्या या सौंदर्यवतीने 25 फेब्रुवारीला 27 व्या वर्षात पदार्पण केलं.


उर्वशी रौतेला ही बॉलिवूड अभिनेत्री तसेच एक प्रसिद्ध मॉडेल सुद्धा आहे. उर्वशी आपल्या हॉट अंदाजाने नेहमीच चर्चेत असते. (फोटो : इंस्टाग्राम )


मॉडेल असणाऱ्या उर्वशीने 'सिग साहब दि ग्रेट' या चित्रपटातून अभिनय क्षेत्रात पदर्पण केलं आहे. त्याचबरोबर सिंगर हनी सिंग यांच्या प्रसिद्ध 'लव डोज' या अल्बम मध्येही काम केलं आहे.


जगातील 'टॉप 10' सेक्सी सुपरमॉडेल च्या यादीत नुकताच उर्वशीचा समावेश करण्यात आला आहे. या यादीत येणारी उर्वशी ही एकमेव आशियाई महिला आहे.


उर्वशीने 'सनम रे', 'ग्रेट ग्रैंड मस्ती', 'हेट स्टोरी 4', 'पागलपंती' या चित्रपटांत अभिनय केला आहे.


उर्वशी रोतेलाने वयाच्या अवघ्या 17 व्या वर्षी 'मिस युनिव्हर्स इंडिया' हा किताब पटकावला होता. जागतिक सौंदर्यस्पर्धेत भारताचं प्रतिनिधित्व केलं होतं. 2011 मध्ये 'मिस टुरीझम स्कीन ऑफ द इअर' हा सुद्धा किताब देण्यात आला आहे.


उर्वशीने सौंदर्याच्या बाबतीत अनेक किताब आपल्या नावावर केले आहेत. त्यातीलच एक म्हणजे 2011 मध्ये 'मिस एशियन सुपर मॉडेल' हा किताब देऊन गौरवण्यात आल होत.


उर्वशीच्या सौंदर्याचे लाखो चाहते आहेत. बॉलिवूड मध्ये सुद्धा अनेक लोक उर्वशीच्या मागे असल्याची चर्चा असते. एका गायकाने तर उर्वशीला लग्नासाठी मागणी घातल्याचं सांगण्यात येतं.


उर्वशी आपल्या सोशल मीडियावर सतत आपले हॉट अंदाजातील फोटो शेअर करत असते. आपल्या बिनधास्त फोटोंनी ती नेहमीच चर्चेत असते .


लग्नाबद्दल विचारण्यात येतं. याबद्दल बोलताना तिने म्हंटल आहे. माझ्या भावंडाच लग्न झाल्याशिवाय मी लग्न करणार नाही. सध्या मी माझा करिअर वर लक्ष देत आहे. जेव्हा लग्नाचा विचार करेन तेव्हा मी सगळ्यांना सांगेन.