मराठी बातम्या /बातम्या /लाइफस्टाइल /

जोडीदार पडला दुसऱ्या प्रेमात हे ‘या’ लक्षणांवरून ओळखा; व्हा वेळीच सावध

जोडीदार पडला दुसऱ्या प्रेमात हे ‘या’ लक्षणांवरून ओळखा; व्हा वेळीच सावध

तिच्या पोस्टनंतर महिलांच्याही भरपूर कमेंट यायला लागल्या. बर्‍याचशा महिलांनी आपलं दुःख या ठिकाणी शेअर केलं आणि नवरा घरकामात मदत करत नसल्याचं सांगितलं.

तिच्या पोस्टनंतर महिलांच्याही भरपूर कमेंट यायला लागल्या. बर्‍याचशा महिलांनी आपलं दुःख या ठिकाणी शेअर केलं आणि नवरा घरकामात मदत करत नसल्याचं सांगितलं.

विश्वासावर प्रेमाचं नातं (Relationship) आधारलेलं असतं. पण,जोडीदाराने एकदा जरी फसवणूक (Cheating) केली तरी, विश्वासाला तडा जातो.

  • Published by:  News18 Desk

नवी दिल्ली, 22 जुलै : प्रेम विवाह असो की अरेंज मॅरेज एकमेकांशी प्रामाणिक असल्याशिवाय ते नातं (Relation) जन्मभर टिकू शकत नाही. विश्वासावर लग्नाचं (Trust On Partner) नातं टिकतं. पण, हा विश्वास तूटायला वेळ लागत नाही. एकदा झालेली फसवणूक (Cheating) जन्मभराचा कडूपणा निर्माण करते. त्यामुळे ते नातं ओझ बनतं.

पतीपत्नीच्या नात्यात फसवणूक झाल्यानंतर तोच विश्वास कमवायला वेळ लागतो किंवा तो विश्वास मिळवताही येत नाही.

जोडीदाराने (Life Partner) शारीरिक किंवा मानसिक फसवणूक केली तरी, मानिकदृष्ट्या फार खच्चीकरण होतं आणि मनात येत एकच प्रश्न येतो की ‘का’ अशा परिस्थितीत ज्याची फसवणूक झाली आहे तो जोडीदार स्वत:ला जास्त त्रास करतो. जाणून घेऊयात जोडीदार का फसणूक करतो.

बदला घेण्याची इच्छा

अशा प्रकरणांमध्ये असं दिसून आलं आहे की,बऱ्याचदा जोडीदार रागाच्याभरात असं वागतो. जोडीदार आपल्याला महत्व देत नाही, गरजा पूर्ण करत नाही किंवा फसवणूक करतो ही, भावना मनात घर करुन राहिलेली असते.

(चुकूनही खरेदी करू नका माती न लागलेलं स्वच्छ आलं कारण...)

प्रेमात पडणं

कधीकधी काळाबरोबर आपलं एकमेकांवरचं प्रेम कमी होऊ लागतं आणि जबाबदाऱ्यांमुळे एकमेकांच्या गरजाही पूर्ण करू शकत नाही. एकदा प्रेमात पडलेली व्यक्ती पुन्हा प्रेमात पडू शकते. आपण आपल्या जोडीदाराची फसवणूक करतो हे लक्षात येऊनही ताबा राहत नाही.

(पावसाळ्यात घ्या महागड्या सिल्क साड्यांची काळजी; टिकतील वर्षानुवर्षं)

दुर्लक्षीत वाटणं

बिझी लाईफमध्ये जोडीदारांना एकमेकांसाठी वेळ मिळवणं कठीण झालंय. कामाच्या व्यापात बहुतेक वेळा जोडीदाराला विसरून जातो आणि त्यामुळे एकटेपणा जाणवायला लागतो. यामुळे जोडीदार आपली काळजी घेत नाही ही भावना मनात घर करते. त्यामुळे जोडीदारापेक्षा इतर कोणत्याही व्यक्तीकडून जास्त काळजी आणि प्रेम मिळालं तर, त्याच्याविषयी आकर्षण वाढू लागतं आणि परिस्थिती फसवणूकीवर येते.

(बनावट किंवा भेसळयुक्त पनीर कसं ओळखायचं?)

लैंगिक इच्छा

चांगल्या नातेसंबंधात फिजिकल इंटिमसी देखील आवश्यक आहे. कधीकधी वाढलेलं वय,जबाबदाऱ्या आणि प्रेम कमी झाल्यामुळे शारीरिक जवळीक कमी होते. यामुळे, जोडीदार इतर कुठेतरी शारीरिकरित्या आकर्षित होऊ लागतो आणि परिस्थिती फसवणूकीपर्यंत येते.

First published:

Tags: Relationship, Relationship tips, Sexual relationship