मुंबई, 21 जुलै : कोरोनाचा (Coronavirus) संसर्ग होऊ नये, रोगप्रतिकारक शक्ती उत्तम राहावी, यासाठी घरगुती उपाय तसंच पूरक आहार घेण्याकडे लोकांचा कल आहे. यात आल्याचाही (Ginger) समावेश आहे. त्यात आता पावसाळा सुरू झाला आहे. त्यामुळे आल्याचा गरमागरम चहा तर प्रत्येक घरात बनतोच. परिणामी बाजारात या पदार्थांना मागणीही अधिक आहे. पण तुम्ही बाजारातून खरेदी करत असलेलं आलं नकली (Fake ginger) तर नाही ना? आता तुम्ही म्हणाल आलं कसं काय नकली असू शकतं.
बाजारात उपलब्ध असलेलं आलं बनावट किंवा नकली असण्याची शक्यता असते. आल्याच्या नावाखाली अन्य कंद विकल्याचं अनेकदा आढळून येतं आणि असं आलं खाल्ल्याने फायदा तर होणार नाहीच उलट तुमच्या आरोग्याला नुकसानच होईल.
आलं खरेदी करताना काय काळजी घ्याल?
सामान्यपणे आपण आलं खरेदी करताना त्यावर माती तर नाही ना, ते स्वच्छ आहे ना, असंच आलं पाहून घेतो. जेणेकरून घरी नेऊन ते फार स्वच्छ करण्याची गरज नाही. पण माती नसलेलं आणि स्वच्छ दिसणारं आलं कधीच खरेदी करू नये. आलं किंवा कंद स्वच्छ करण्यासाठी अॅसिडचा वापर केला जातो, त्यामुळे ते आरोग्यास हानीकारक ठरते.
हे वाचा - Kitchen Hacks: खराब फ्रिज मिनटात चमकेल; असा करा साफ
त्यामुळे तुम्ही खरेदी केलेलं आलं हे खरं आहे की नकली हे तपासणं आवश्यक आहे. हे तपासण्यासाठी काही सोप्या ट्रिक्स आहेत. जाणून घेऊया या ट्रिक्सविषयी.
खरं आणि नकली आलं यातील फरक कसा ओळखाल?
- खरं आलं ओळखण्याची सर्वात सोपी आणि महत्त्वाची पद्धत म्हणजे त्याचा वास. जर नखानं आलं कुरतडलं तर त्याचा वास दीर्घकाळ बोटावर राहतो.
- खरं आलं सोलल्यावर आतून ताजं दिसतं.
- चहा किंवा भाजी करताना खरं आलं वापरलं तर त्याचा सुवास दीर्घकाळ राहतो.
आल्याचे आरोग्याला काय फायदे होतात?
- दररोज आलं सेवनाने मायग्रेनचं दुखणं कमी होतं.
- यामुळे कोलोरेक्टल कॅन्सरचा (Cancer) धोका कमी होतो.
- मधुमेह असणाऱ्या रुग्णांनी डॉक्टरांच्या सल्ल्यानं याचा वापर करावा.
- किडनी (Kidney) खराब होण्याची शक्यता आलं सेवनाने कमी होते.
हे वाचा - स्वस्त झाली लिंब; 3 सोप्या टिप्सने रस साठवून वर्षभर वापरा
- बद्धकोष्ठतेचा त्रास असल्यास लिंबाचा रस, ओवा, थोडंसं मीठ आणि आलं यांचे एकत्र मिश्रण करुन खाल्ल्यास आराम पडतो.
- आल्यात अँटी-इन्फ्लेमेटरी, अँटी-ऑक्सिडंट आणि अँटी-बॅक्टेरिअल घटक असतात. त्यामुळे पोटात गॅस होणं, अपचन आणि सर्दीसारख्या विकारात आलं गुणकारी ठरतं.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.