पावसाळ्यात अशी घ्या महागड्या सिल्क साड्यांची काळजी; टिकतील वर्षानुवर्षं
सिल्कची साडी जितकी महाग असते, तितकीच तिची काळजी घेणंही कठीण असतं. लहान बाळाप्रमाणे तिला जपावं लागतं. सिल्क साडीची या प्रकारे काळजी घ्यावी.
|
1/ 11
साडी हा महिलांचा सॉफ्ट कॉर्नर असतो. साडीची फॅशन कधीच आऊटडेटेड होत नाही. सिल्कची साडी तर प्रत्येकीच्या कपाटात असणारंच. कोणत्याही कार्यक्रामात सिल्कची साडी एलिगंट, ट्रेडिश्नल लूक देते.
2/ 11
सिल्क साड्या अतिशय नाजूक आणि महागड्या असतात. साडी प्रेमापोटी अनेकजणी विविध प्रकारच्या सिल्कच्या साड्यांची खरेदी नेहमीच करत असतात. मात्र पावसाळ्यात या साड्यांची काळजी कशी घ्यावी हा प्रश्न असतो. सिल्कचे कपडे अथवा साड्या घरी धुता येत नाहीत.
3/ 11
सिल्कच्या साड्या दमट झाल्या तर त्याचा रंग एकमेकांमध्ये मिसळू शकतो. शिवाय बुरशीचा प्रादूर्भाव लगेच होऊ शकतो. सिल्कच्या साड्यांमध्ये वापरण्यात येणारी जर ओलसर राहिल्यास ती फाटून शकते. ज्यामुळे साडीचं नुकसान होतं.
4/ 11
सिल्कची साडी कपाटात ठेवताना नेहमी सुती किंवा तलम कापडामध्ये पॅक करून ठेवा. सिल्कच्या साड्यांमध्ये दमटपणा निर्माण झाला तर त्याचे रंग एकमेकांमध्ये मिसळू शकतात.
5/ 11
साडी जास्त काळ टिकावी असं वाटत असेल तर, अधूनमधून ङवेवर ठेवा किंवा ऊन दाखवत जा. यामुळे त्यात ओलावा धरणार नाही आणि दमट वास येणार नाही.
6/ 11
सिल्कच्या साड्या कधीही साबणाने धुवू नयेत. नेहमी ड्रायक्लिन कराव्यात. त्यामुळेच वापरतानाही त्यांच्यावर डाग पडणार नाहीत याची काळजी घ्यावी.
7/ 11
कपाटात साडी ठेवताना हॅंगरवर लावून ठेवण्याऐवजी तिची घडी घालून एखाद्या पांढऱ्या रंगाच्या सुती कापडामध्ये गुंडाळून ठेवा. ज्यामुळे त्यावर घडी पडणार नाही. घडी पडली तर,साडी त्या ठिकाणी विरते.
8/ 11
साडीला घडी पडू नये यासाठी अधूनमधून उघडत जा. बाहेर काढून घडी बदलून ठेवा. शक्य असल्यास बटर पेपर ठेवा.
9/ 11
सिल्कची साडी इस्त्री करताना नेहमी उलट्या बाजूने करावी. म्हणजे तिची शायनिंग कमी होणार नाही आणि त्यावरचं जरी काम कमी होणार नाही.
10/ 11
सिल्कची साडी इस्त्री करताना नेहमी उलट्या बाजूने करावी. म्हणजे तिची शायनिंग कमी होणार नाही आणि त्यावरचं जरी काम कमी होणार नाही.
11/ 11
पावसाळ्यात साडीला येणारा कोंदट वास टाळण्यासाठी कडूलिंबाची पान सुकवून एखाद्या कापडात गुंडाळून साडीमध्ये ठेवा. वॉर्डरोबमध्ये सुकलेली सोनचाफ्याची फुलं,चंदनाचं लाकूड ठेवा.