मराठी बातम्या /बातम्या /heatlh /भेसळयुक्त पनीर आरोग्यासाठी घातक; खरेदी करताना घ्या 'ही' काळजी

भेसळयुक्त पनीर आरोग्यासाठी घातक; खरेदी करताना घ्या 'ही' काळजी

पनीरमध्ये काही भेसळ (Adulterated Paneer) असेल तर मात्र ते शरीराला लाभदायक ठरण्याऐवजी हानिकारक ठरू शकतं.

पनीरमध्ये काही भेसळ (Adulterated Paneer) असेल तर मात्र ते शरीराला लाभदायक ठरण्याऐवजी हानिकारक ठरू शकतं.

पनीरमध्ये काही भेसळ (Adulterated Paneer) असेल तर मात्र ते शरीराला लाभदायक ठरण्याऐवजी हानिकारक ठरू शकतं.

    मुंबई, 21 जुलै : पनीर (Paneer) खाणं कोणाला आवडत नाही बरं? खासकरून शाकाहारी व्यक्ती तर पनीर अगदी नियमितपणे आहारात समाविष्ट करतात. पनीरचा स्वाद खूप चांगला असतोच; शिवाय ते आरोग्यासाठीही खूप लाभदायक आहे. त्यात कॅल्शियम, प्रोटीन, व्हिटॅमिन्स आदी पोषक घटक (Vitamins, Protein, Calcium) मोठ्या प्रमाणात असतात. आजारपण दूर ठेवण्यास ते साह्यभूत ठरतात; मात्र पनीरमध्ये काही भेसळ (Adulterated Paneer) असेल तर मात्र ते शरीराला लाभदायक ठरण्याऐवजी हानिकारक ठरू शकतं.

    पनीर ही अशी गोष्ट आहे, की जी बहुतांश घरांत विकतच आणली जाते. घरच्या घरी पनीर तयार करणं फार अवघड नसलं, तरी तसं करणाऱ्यांची संख्या फार कमी आहे. बाहेरून विकत आणलेलं पनीर भेसळयुक्त असलं आणि ते आपल्या आहारात आलं, तर पोटदुखी, अपचन, त्वचेवर रॅशेस, डोकेदुखी, टायफॉइड, अल्सर, पीलिया अशा अनेक प्रकारच्या त्रासांना सामोरं जावं लागू शकतं. यातली मुख्य अडचण म्हणजे भेसळयुक्त पनीर दिसायला चांगल्या पनीरसारखंच असतं. त्यामुळे अगदी सहजपणे ते पाहून त्यातला फरक पटकन ओळखता येत नाही. त्यामुळेच भेसळयुक्त पनीर कसं ओळखायचं, याच्या टिप्स देत आहोत.

    तुमच्या चेहऱ्यावरील 'या' 10  गोष्टी सांगतात आरोग्याची स्थिती, चुकूनही करू नका दुर्लक्ष

    पनीरचा एक तुकडा घेऊन तो चोळून पाहावा. चोळल्यानंतर त्या पनीरचे लगेचच बारीक बारीक तुकडे व्हायला लागले, तर समजून जावं, की हे पनीर भेसळयुक्त आहे. बनावट पनीरमध्ये स्किम्ड मिल्क पावडर (Skim Milk Powder) घातलेली असते. त्यामुळे अशा पनीरला जास्त दबाव पेलता येत नाही आणि त्याचे बारीक तुकडे होत जातात. अस्सल पनीरचा तुकडा दाबल्यानंतर रबरासारखा दाबला जातो, त्याचे बारीक बारीक तुकडे होत नाहीत.

    बाहेरून आणलेलं पनीर पाण्यात उकळून थंड करावं. थंड झाल्यानंतर त्यातल्या एका तुकड्यावर आयोडीन (Iodine) टिंचरचे काही थेंब घालावेत. त्यानंतर पनीरचा रंग निळा झाला, तर ते पनीर नकली आहे, हे निश्चित.

    पनीर पाण्यात घालून उकळवावं. ते थंड झाल्यावर सोयाबीन किंवा तूरडाळीची पावडर पनीरवर पसरावी. 10 मिनिटांनी पनीरचा रंग लाल होऊ लागला, तर ते पनीर निश्चितपणे बनावट आहे, हे सिद्ध होतं. कारण त्या पनीरमध्ये डिटर्जंट किंवा युरिया मिसळलेला असला, तरच असं होतं.

    अस्सल पनीर कसं ओळखायचं? अस्सल पनीर लोण्यासारखं मुलायम असतं. भेसळयुक्त पनीर खूप घट्ट, चिवट असू शकतं. भेसळयुक्त पनीर तोडण्यासाठी खेचावं लागतं. अस्सल पनीरच्या बाबतीत तसं होत नाही.

    First published:

    Tags: Health