• Home
 • »
 • News
 • »
 • lifestyle
 • »
 • Protein Diet side effects: हाय प्रोटीन डाएटने बॉडी बनेल पिळदार; पण आरोग्याचं होऊ शकतं वाटोळं; 'ही' काळजी जरूर घ्या

Protein Diet side effects: हाय प्रोटीन डाएटने बॉडी बनेल पिळदार; पण आरोग्याचं होऊ शकतं वाटोळं; 'ही' काळजी जरूर घ्या

अनेकांना आपली शरीरयष्टी (Body) ही पिळदार असावी असं वाटतं. त्यासाठी ते जीममध्ये तासनतास जोरदार व्यायाम (Exercise) करतात. High Protein आहारही घेतला जातो. पण त्याचे Side Effects आहेत. कुठली काळजी घ्याल वाचा...

 • Share this:
  दिल्ली, 20 सप्टेंबर : अनेकांना आपली शरीरयष्टी (Body) ही पिळदार असावी असं वाटतं. त्यासाठी ते जीममध्ये तासनतास जोरदार व्यायाम (Exercise) करतात. त्याचबरोबर शरीराला चांगला आहार मिळावा म्हणून अंडी किंवा दूध ही आपल्या आहारात (Diet) घेत असतात. त्यामुळे अशाने त्यांच्या बॉडीला आकार येतो, त्याचबरोबर ऐवढी कसरत केल्यानंतर शरीराला योग्य प्रमाणात खूराकही मिळते. परंतु काही लोकांना जीममध्ये व्यायाम करत असताना प्रोटीन्स (Proteins) घ्यायची सवय असते. त्यामुळे शरीराला त्याचा फायदा असतो. कारण प्रोटीनमुळे (Protein Diet For Body) आपल्या शरीरातील मांसपेशी या झपाट्याने वाढतात. त्यामुळे आपल्याला आपली बॉडी ही काही काळातच पिळदार करता येते. परंतु कधी कधी आपल्या याचे अतिरिक्त सेवन घातक ठरण्याचा धोका असतो. आपल्याला अनेकदा वाटतं की अधिक प्रोटीनचे सेवन हे आपल्याला फायदेशीर आहे, परंतु ही धारणा चुकिची आहे, कारण आपल्या शरीरावा प्रोटीनचा झालेला ओव्हरडोस हा हानीकारकच असतो. अनेकजण हे मांस, मासे, अंडी, चिकन आणि डेयरी प्रोडक्टचा वापर हा व्यायाम केल्यानंतर आपल्या आहारात करत असतात. मानसिक तणावामुळे कमी होतोय चेहऱ्यावरचा 'Glow'? घ्या अशी काळजी परंतु हाय प्रोटीमुळे आपल्या शरीराल काही धोके असतात, ते कोणते आपण जाणून घेऊयात. आपल्या व्यायाम करत असताना आपल्या शरीराला प्रोटीनची गरज असते, परंतु त्याच्या अधिकच्या सेवनामुळे आपल्या शरीरात अधिकचा मेद तयार होतो. त्यामुळे आपण नेमकं चर्बी कमी करण्यासाठी आणि आपले शरीर पिळदार करण्यासाठी व्यायाम करत असतो. अशा वेळी शरीरात फॅट जमा झाल्यास आपल्याला त्याचा आपल्या आरोग्याला धोका असतो. त्यातून पुन्हा लठ्ठपणा वाढत जातो आणि शरीरातील फायबरचे प्रमाण घसरत जाते. मधुमेहापासून हाय बीपीपर्यंत अनेक रोगांवरील इलाज; तुपात या 5 गोष्टींचा करा समावेश त्याचबरोबर मांस, मासे, अंडी, चिकन खाल्याने त्यातून प्रोटीन तर मिळते परंतु आपल्याला त्यातून डायरिया होण्याचा धोका असतो. त्यामुळे लिक्विडच्या स्वरूपात प्रोटीन घेतल्यास आपल्याला त्याचा फायदा होतो. त्याचबरोबर प्रोटीनचे अतिरिक्त सेवन केले तर आपल्याला पोटाचा आजार होण्याची शक्यता असते. वारंवार तहान लागू शकते. त्यामुळे जर तुम्ही सातत्याने व्यायाम करताना प्रोटीनचे सेवन करत असाल तर ही खबरदारी नक्की घ्या.
  Published by:Atik Shaikh
  First published: