Home /News /heatlh /

मानसिक तणावामुळे कमी होतोय चेहऱ्यावरचा 'Glow'? घ्या अशी काळजी

मानसिक तणावामुळे कमी होतोय चेहऱ्यावरचा 'Glow'? घ्या अशी काळजी

तरुण पिढीला अनेक पातळ्यांवर मानसिक तणावाचा (Stress) सामना करावा लागतो. त्यामुळे त्यांच्या मानसिक आरोग्याबरोबर त्यांचे शारिरीक आरोग्यही बिघडते. त्यामुळे याचा नकारात्मक प्रभाव हा आपल्या त्वचेवरही (Skin) होतो.

    नवी दिल्ली, 20 सप्टेंबर : तरूणपणात अनेकांना वाटत की आपल्या चेहऱ्यावर (Face) ग्लो आणि निखळपणा असायला हवा. त्यासाठी ते नानाविध प्रकारचे उपचार आणि औषधं घेत असतात. त्यानंतरही काही फरक पडत नसल्याची (Lifestyle) तक्रार अनेकांची असते. त्यामुळे ते आपल्या त्वचेच्या आजाराला कंटाळलेले असतात. पण अनेकदा आपल्याला असलेल्या मानसिक तणावामुळे याचा विपरित परिणाम हा आपल्या चेहऱ्याच्या आरोग्यावर (Effects Of Stress On Your Face) होत असतो. सध्याच्या तरुण पिढीला अनेक पातळ्यांवर मानसिक तणावाचा (Stress) सामना करावा लागतो. त्यामुळे त्यांच्या मानसिक आरोग्याबरोबर त्यांचे शारिरीक आरोग्यही बिघडते. त्यामुळे याचा नकारात्मक प्रभाव हा आपल्या त्वचेवरही (Skin) होतो. त्यामुळे आपल्या चेहऱ्यावर तणावामुळे ड्रायनेस, रिंकल्‍स, एक्‍ने आणि पिंपल्‍स यायला लागतात. त्यामुळे कधीकधी चेहऱ्यावर सुरकुत्याही पडतात. कोणत्याही उपचाराची गरज नाही; दुःख, निराशेतून बाहेर पडण्याचे सोपे मार्ग ज्यावेळी आपण मानसिक तणावातून जात असतो. त्यावेळी आपल्या चेहऱ्यावर याचे काही वाईट परिणाम होत असतात. जसे की आपण तणावात असताना आपल्या शरिरातील हार्मोन्स बाहेर पडतात, ज्यामुळे त्याच्या विपरित परिणाम हा आपल्या त्वचेवर होतो. त्याचबरोबर आपण नेहमी कामात असताना आपल्या चेहऱ्याच्या आरोग्याकडे दुर्लक्ष करतो. त्यामुळे चेहरा स्वच्छ राहत नाही, आणि परिणामी त्यामुळे चेहरा खराब होतो. जेव्हा आपण तणावात असतो त्यावेळी आपल्या शरिरातील कॉटिजॉल नावाचा हार्मोन्स बाहेर पडतो. त्यामुळे चेहरा चिकट होतो. त्यातून एक्‍ने होण्याची दाट शक्यता असते. वजन नियंत्रणासह ताकाचे इतके सारे आहेत फायदे; लस्सीही तुमच्यासाठी आहे उपयोगी काही संशोधनातून ही गोष्ट समोर आली आहे की जेव्हा आपण टेन्शनमध्ये असतो, तेव्हा झोप नीट होत नाही, त्यामुळे आपल्या डोळ्यांच्या खालचा भाग काळा पडायला लागतो. त्यामुळे चेहऱ्यावरचे तेज कमी होते. या तणावाचा प्रभाव हा आपल्या त्वचेच्या हायड्रेशन आणि नॅचुरल नॅरिशमेंटवरही पडतो. त्यामुळे चेहऱ्यावरील मऊपणा कमी होऊन त्वचा खराब व्हायला लागते. त्याचबरोबर मानसिक तणावामुळे आपल्या डोक्यावरील केसगळती वाढते. त्यामुळे टक्कल पडण्याचाही धोका संभवतो.
    Published by:Atik Shaikh
    First published:

    Tags: Face, Human face, Mental health, Stress

    पुढील बातम्या