मराठी बातम्या /बातम्या /लाइफस्टाइल /मधुमेहापासून हाय बीपीपर्यंत अनेक रोगांवरील इलाज; तुपात या 5 गोष्टींचा करा समावेश

मधुमेहापासून हाय बीपीपर्यंत अनेक रोगांवरील इलाज; तुपात या 5 गोष्टींचा करा समावेश

 तूप केवळ अन्नाची चव वाढवत नाही, तर त्याचे अनेक आरोग्यदायी फायदेही आहेत. आरोग्यतज्ज्ञांच्या मते, काही पदार्थांसह तुपाचं मिश्रण आरोग्यासाठी खूप फायदेशीर आहे.

तूप केवळ अन्नाची चव वाढवत नाही, तर त्याचे अनेक आरोग्यदायी फायदेही आहेत. आरोग्यतज्ज्ञांच्या मते, काही पदार्थांसह तुपाचं मिश्रण आरोग्यासाठी खूप फायदेशीर आहे.

तूप केवळ अन्नाची चव वाढवत नाही, तर त्याचे अनेक आरोग्यदायी फायदेही आहेत. आरोग्यतज्ज्ञांच्या मते, काही पदार्थांसह तुपाचं मिश्रण आरोग्यासाठी खूप फायदेशीर आहे.

नवी दिल्ली, 20 सप्टेंबर : आपल्याकडे जवळजवळ प्रत्येक घरात तूप (ghee) असतंच. अनेकांना पोळी, वरण, कढी किंवा भाजीबरोबर तूप खाणं आवडतं. तूप केवळ अन्नाची चव वाढवत नाही, तर त्याचे अनेक आरोग्यदायी फायदेही आहेत. आरोग्यतज्ज्ञांच्या मते, काही पदार्थांसह तुपाचं मिश्रण आरोग्यासाठी खूप फायदेशीर आहे. जाणून घेऊ कोणत्या आहेत या वस्तू..

हळद घातलेलं तूप (Ghee with turmeric) - हळद घातलेले तूप आरोग्यासाठी खूप फायदेशीर मानले जाते. याच्यामुळं जाडी (लठ्ठपणा) वेगानं कमी होतो. तसंच नवीन रक्तपेशी बनवण्याबरोबरच हृदयाच्या आरोग्यालाही त्याचा फायदा होतो. याच्यामुळं मूत्रपिंडाचं कार्य सुधारतं आणि शरीरातील जळजळ होण्याची समस्या दूर होते. हळद असलेलं तूप शरीरातील जवळजवळ प्रत्येक प्रकारच्या वेदना दूर करू शकतं, असा पोषणतज्ज्ञांचा दावा आहे.

तुळशी तूप (Tulshi and Ghee) - जर तुम्ही घरी तूप बनवलेले पाहिले असेल, तर तुम्हाला हे माहीत असेलच की, ते बनवताना भांड्यातून तीव्र वास येतो. पोषणतज्ज्ञांच्या मते, तुम्ही तूप बनवताना त्यात तुळशीची पाने घातलीत तर, त्यांच्यामुळं उग्र वास निघून जातोच, शिवाय तुळशीतील फायदेशीर घटक त्यात उतरतात. रोग प्रतिकारशक्ती वाढवण्यापासून ते सामान्य फ्लू, श्वसनासंबंधी समस्या आणि रक्तातील साखर कमी करण्यापर्यंत, हे मिश्रण खूप फायदेशीर मानलं जातं.

हे वाचा - लग्नानंतर आनंद गगनात मावेना; रस्त्यावरच नाचू लागले नवरी-नवरदेव, जबरदस्त Dance Video

कापूर घातलेलं तूप (Kapoor and Ghee)- कापरासोबत तूप एकत्र करण्याचे फायदेही अनेक आहेत. कापूर चवीला थोडा कडू असतो. मात्र, यामुळं वात, पित्त आणि कफ या तीनही प्रकारच्या दोषांपासून मुक्तता मिळते. कापरासह तूपही आपलं पचन सुधारण्यासाठी तसंच आतड्यांचे आरोग्य, ताप, हृदयाचे ठोके आणि दम्याशी संबंधित समस्यांमध्ये आराम देतं.

लसूण घातलेलं तूप (Ghee with garlic) - गार्लिक बटरप्रमाणे, तुपासह लसूण देखील जेवणाचा स्वाद आणि चव दोन्ही वाढवतो. लसणीमध्ये असलेले फायदेशीर घटक जळजळ आणि तत्सम समस्यांपासून आराम देतातच. शिवाय, उच्च रक्तदाबाच्या समस्येतही लाभ देतात. याचं नियमित सेवन केल्यानं शरीराला खूप फायदे होतात.

हे वाचा - कडक सॅल्युट! नदीच्या पाण्यात वाहून जात होता मुलगा, तरुणींने ओढण्यांचा दोर बनवत वाचवले चिमुकल्याचे प्राण, LIVE VIDEO

दालचिनी घातलेलं तूप (Ghee with cinnamon) - दालचिनीमध्ये असलेले अँटी-व्हायरल आणि बॅक्टेरियाविरोधी घटक आपल्याला अनेक आजारांपासून वाचवतात. हे केवळ रक्तातील साखरेची पातळी कमी करत नाही, तर पोटदुखीपासूनदेखील आराम देतं. कढईत थोडं तूप आणि दोन दालचिनीच्या काड्या मध्यम आचेवर 4-5 मिनिटे गरम करा आणि नंतर थोडा वेळ थंड होण्यासाठी ठेवा. हे तूप दालचिनीची चव शोषून घेईल. असं मिश्रण शरीरासाठी अत्यंत फायदेशीर असल्याचं म्हटलं जातं.

(सूचना : या लेखात दिलेली माहिती सामान्य माहितीवर आधारित आहे. न्यूज 18 लोकमत त्याची हमी देत नाही. हे उपाय लागू करण्यापूर्वी संबंधित तज्ञांशी संपर्क साधा.)

First published:

Tags: Diabetes, Ghee, Health Tips