जाहिरात
मराठी बातम्या / लाइफस्टाइल / विसरा फ्रीज; उन्हाळ्यात प्या फक्त माठातलं पाणी; पुरुषांसाठी ठरेल जास्त फायदेशीर

विसरा फ्रीज; उन्हाळ्यात प्या फक्त माठातलं पाणी; पुरुषांसाठी ठरेल जास्त फायदेशीर

विसरा फ्रीज; उन्हाळ्यात प्या फक्त माठातलं पाणी; पुरुषांसाठी ठरेल जास्त फायदेशीर

फ्रीजमध्ये ठेवलेलं प्लास्टिकच्या बाटलीतलं पाणी पुरुषांच्या टेस्टोस्टेरॉन हार्मोनवर (Testosterone Hormone) वाईट परिणाम करतं. त्यामुळे Sexual life वर परिणाम होऊ शकतो.

  • -MIN READ
  • Last Updated :

दिल्ली, 26 मे : अंगाची लाहीलाही करणाऱ्या उन्हाळ्यात (Summer) घशाला कोरड पडली की, आठवण येते थंड पाण्याची. उन्हाळ्यात तहान (Thirst) भागवण्यासाठी कोल्ड्रींक पित असलात तरी, पाणी पिण्याने ज्या प्रकारे तहान भागते तशी कोल्ड्रींकने भागत नाही. त्यातही उन्हात चालून धाप लागली असली की, घरी आल्यावर घटाघट पाणी प्यावं असं वाटत आणि फ्रीजमधल्या पाण्याला (Water) माठातल्या पाण्याची सर कुठे येणार? उन्हाळा सुरु झाला की, अनेक जणांच्या घरात पाण्यासाठी माठ वापरले जातात. फ्रिजच्या (Refrigerator) पाण्याने तहान जाते पण, माठातल्या पाण्या इतकं ते पाणी आरोग्यासाठी पायदेशीर नसतं. उन्हाळ्यात माठातलं पाणी पिण्याने पुरूषांना तर जास्तच फायदा होतो. नैसर्गिक फिल्टर (Natural filter) तज्ज्ञांच्या मते, 4 तासांपेक्षा जास्त काळ माठामध्ये पाणी राहिलं तर, ते नैसर्गिकरित्या शुद्ध होतं. कारण मातीमध्ये नैसर्गिकरित्या दूषित घटक शोषून घेण्याची क्षमता असते. वजन कमी होतं पुर्वीच्या काळापासून माठातल पाणी आपण पितो. माठातल्या पाण्याने आपलं मेटबॉलिजम (Metabolism) सुधारतं. त्यामुठे शरीरातली चरबी वितळते. संशोधनानुसार प्लास्टीकच्या बाटलीतलं (Plastic bottle) पाणी हानीकारक असतं. कारणं त्या पाण्यात बीपीए **(BPA)केमिकल असतं. ज्यामुळे हार्मोनल संतुलन (Hormonal balance) बिघडतं त्यामुळे वजन वाढतं. अरेच्चा! पहिल्या बाळाच्या जन्मानंतर 5 दिवसांत महिलेची दुसरी डिलिव्हरी; झाली जुळी पुरुषांना फायदा- पुरुषांच्या आरोग्याचा विचार करता माठाचं पाणी पिणंच योग्य आहे. कारण, फ्रिजमध्ये ठेवलेलं प्लास्टीकच्या बाटलीतलं पाणी टेस्टोस्टेरॉन हार्मोनवर (Testosterone **Hormone) वाईट परिणाम करतं. टेस्टोस्टेरॉन हार्मोन पुरूषांच्या सेक्शुअल लाईफसाठी **(Sexual Life)**आवश्यक आहे. माठातलं पाणी टेस्टोस्टेरॉन हार्मोन संतुलनात (Balance) मदत करतं. श्वसनाचे आजार कोरोनामुळे आपल्या श्वसनप्रक्रियेवर विपरीत परिणाम होतो. त्यामुळे उन्हाळा असला तरी, फ्रिजचं पाणी पिण्याने त्रास आणखीन वाढू शकतो. पण माठाचं पाणी प्यायल्याने खोकला,घसा खवखवणं, सूज यासारखे त्रास होत नाहीत. अरे बापरे! बाळासोबत व्हिडीओ शूट करताना अचानक घोडी बनली महिला…; पाहा हा VIDEO सनस्ट्रोक पासून बचाव भारतासारख्या उष्णकटिबंधीय देशात उन्हाळ्यात पारा वाढला की सनस्ट्रोक (Sunstroke Prevention) होण्याची भिती वाढते. अनेक ठिकाणी तापमान 40 पार जातं. अशा वेळी माठातलं पाणी थंडावाही देत आणि फ्रिजच्या पाण्याने होणारा कोणताही त्रास होत नाही. माठ मातीचे बनलेले असतात. त्यामुळे व्हिटॅमीन आणि मिनरल मिळतात. शिवाय शरीरातील ग्लूकोज लेव्हल संतुलित राहते. 16 तास अंघोळ करत राहिली, तरुणीची झाली भयंकर अवस्था; VIDEO पाहून नेटिझन्सही शॉक ऍसिडिटीचा त्रास प्राकृतिकरित्या माणसाचं शरीर ऍसिडीक असतं तर, माती प्राकृतिकरित्या अल्कलाईन असते. माठाचं पाणी प्यायल्याने शरीरात पीएच लेव्हल (PH Level) संतुलीत राहते. त्यामुळे ऍसिडीटी (Acidity) आणि पोटासंबंधी आजार कमी होतात.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात