Home /News /lifestyle /

OMG! 16 तास अंघोळ करत राहिली, तरुणीची झाली भयंकर अवस्था; VIDEO पाहून नेटिझन्सही शॉक

OMG! 16 तास अंघोळ करत राहिली, तरुणीची झाली भयंकर अवस्था; VIDEO पाहून नेटिझन्सही शॉक

Drinking water

Drinking water

16 तास पाण्यात राहिलेल्या तरुणीने सोशल मीडियावर मदत मागितली आहे.

  ब्रिटन, 26 मे: एखादी व्यक्ती फार फार तर किती वेळ अंघोळ (Bath) करू शकते. अर्धा तास, एक तास... यूकेतील एक तरुणी मात्र तब्बल 16 तास (Woman bathing 16 hours) अंघोळ करत राहिली. पाण्यातून बाहेर येताच तिची अवस्था भयंकर (Woman in water for 16 hours) झाली. तिने आपला व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर केला आणि तिथंच तिने मदतही मागितली. ब्रिटनमधील डेना नावाच्या महिलेनं टिकटॉकवर आपला एक व्हिडीओ टाकला आहे.  ज्यात तिने 16 तास पाण्यात राहिल्यानंतर तिची किती भयंकर अवस्था झाली आहे, ते दाखवलं आहे.  जेव्हा तुम्ही आपात्कालीन परिस्थितीत 16 तास पाण्यात राहतात तेव्हा तुमच्या पायाची अवस्था अशी होते. हे पाहून मला मोठा धक्का बसला आहे, असं ती म्हणाली. फोटो सौजन्य - टिकटॉक
  फोटो सौजन्य - टिकटॉक
  डेनाच्या पायांवर खूप सुरकुत्या पडल्याचं दिसतं आहे. फक्त सुरकुत्याच नाही तर आपल्या पायाचा रंगसुद्धा बदलल्याचं डेनाने सांगितलं.तिच्या पायाचं रंग ग्रे झाल्याचं ती म्हणाली. हे वाचा - Alert! हवेतूनही पसरतोय कोरोना; बचावासाठी सरकारने जारी केला नवा कोविड प्रोटोकॉल हेल्थलाइनने दिलेल्या माहितीनुसार भरपूर तास पाण्यात राहिल्याने ट्रेंच फूट ही गंभीर समस्या उद्भवते. यामुळे पायातील रक्तप्रवाह खंडित होतो आणि नसांच्या कार्यावरही परिणाम होतो. वेळेत उपचार न झाल्यास गँगरीन आणि अल्सरसारखी गंभीर समस्याही बळावू शकते. डेनाने आपले काही व्हिडीओ आणि काही फोटो टिकटॉकवर शेअर करत नेटिझन्सकडून मदतही मागितली. यावर कुणी याचा उपचार सांगेल का?, असं तिनं विचारलं आहे. हे वाचा - Long Working Hours : कामाचे अधिक तास ठरतायेत जीवघेणे; WHO चा धक्कादायक रिपोर्ट द सनच्या रिपोर्टनुसार डेनाच्या पायांची ही अवस्था पाहून नेटिझन्सनाही तिची चिंता वाटू लागली. काही जणांनी यावर तिला उपायही सुचवले आहेत.  तर काहींना डेना इतका वेळ पाण्यात कशी काय राहिली असा प्रश्न उपस्थित केला आहे. एखादी व्यक्ती 9 तास झोपू शकते पण 16 तास पाण्यात कशी काय राहू शकते, असा प्रश्न विचारला आहे. तर एका युझरने एका तासानंतर पाणी खूप थंड होतं, मग ह महिला इतका वेळा पण्यात कशी राहिली, असंही विचारलं आहे. पण ही महिला पाण्यात नेमकी कशी राहिली हे अद्यापही समजलेलं नाही.
  Published by:Priya Lad
  First published:

  Tags: Health, Lifestyle, Water, Woman

  पुढील बातम्या