वॉशिंग्टन, 26 मे : आई होणं हा प्रत्येक महिलेच्या आयुष्यातील अविस्मरणीय आणि आनंदाचा क्षण आहे. पण एक महिला मात्र अवघ्या पाच दिवसांतच दुसऱ्यांदा आई झाली आहे. पहिल्या बाळाच्या जन्मानंतर पाच दिवसांनी तिची दुसरी डिलीव्हरी झाली (Pregnant woman second delivery after 5 days of first delivery). त्यावेळी तिने दोन बाळांना जन्म दिला आहे. या महिलेनं वर्ल्ड रेकॉर्डही केला आहे. एका वेळी जुळी, तिळी होणं तसं काही नवं नाही. पण त्यांचा जन्म काही दिवसांच्या अंतराने होणं हे मात्र नवल आहे. या महिलेच्या गर्भातही तिळी होती. पण त्यांचा जन्म मात्र एकत्र झाला नाही. सुरुवातीला तिने एका बाळाला जन्म दिला आणि त्याच्या जन्मानंतर पाच दिवसांनी आणखी दोन बाळांना जन्म दिला. न्यूयॉर्कमधील 33 वर्षांची कायली डेशनच्या पहिल्या बाळाचा जन्म 28 डिसेंबर 2019 ला झाला. तर दुसऱ्या आणि तिसऱ्या बाळाचा जन्म 2 जानेवारी, 2020 रोजी झाला. कायलीने सर्वात कमी अंतराने दुसरी प्रसूती होण्याचा वर्ल्ड रेकॉर्ड मोडला आहे. सालानुसार पाहायला गेल्यास या बाळांच्या जन्मात एका दशकाचं अंतर आहे. हे वाचा - अरे बापरे! बाळासोबत व्हिडीओ शूट करताना अचानक घोडी बनली महिला…; पाहा हा VIDEO डेली मेल च्या रिपोर्टनुसार कायलीला प्रेग्नन्सीच्या 22 व्या आठवड्यात प्रसूती वेदना सुरू झाल्या. तिने आपल्या पहिल्या बाळाला जन्म दिला. हे बाळ खूपच लहान होतं. त्याचं वजन फक्त 454 ग्रॅम होतं. कायलीच्या गर्भात आणखी दोन बाळं होती. त्यांच्या जन्मासाठी ती हॉस्पिटलमध्ये थांबली. तिने डॉक्टरांना याबाबतही विचारलंही. पण या बाळांच्या जन्मासाठी प्रतीक्षा करावी लागेल, असं डॉक्टारांनी तिला सांगितलं. यानंतर पाच दिवसांतच कायलीला पुन्हा प्रसूती वेदना सुरू झाल्या आणि तिने जुळ्यांना जन्म दिला. यातील एका बाळाचं वजन 500 ते 700 ग्रॅम होतं. हे वाचा - तू काळजी करू नको, आम्ही…’; आई Covid पॉझिटिव्ह, मुलांनी लिहिलं हृदयस्पर्शी पत्र या बाळांची जगण्याची शक्यता खूप कमी होती. तिन्ही बाळांना चार महिने आयसीयूमध्ये ठेवण्यात आलं होतं. पहिल्या बाळाला 17 एप्रिल, 2020, दुसऱ्या बाळाला 30 एप्रिल, 2020 आणि तिसऱ्या बाळाला 4 मे रोजी डिस्चार्ज देण्यात आला. यापैकी दोन मुलं आणि एक मुलगी आहे. घरी आणल्यानंतरही तिघंही काही काळ ऑक्सिजनवर होते. आता डेक्लान, रोवन, सियान अशी त्यांना नावं असून आता तिघंही 17 महिन्यांचे झाले आहेत आणि एकदम निरोगी आहेत.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.