मराठी बातम्या /बातम्या /लाइफस्टाइल /

हृदयविकाराच्या रुग्णांनी आवर्जुन लक्ष ठेवा, जाणून घ्या झोपण्याची योग्य वेळ!

हृदयविकाराच्या रुग्णांनी आवर्जुन लक्ष ठेवा, जाणून घ्या झोपण्याची योग्य वेळ!

व्यग्र जीवनशैली आणि आहारावर ताबा न राहिल्याने आपल्याला अनेक आजारांना सामोरं जावं लागत आहे. अशाच चुकीच्या जीवनशैलीमुळे हृदयविकार होणाऱ्यांचं (Heart Diseases) प्रमाण वाढलं आहे.

व्यग्र जीवनशैली आणि आहारावर ताबा न राहिल्याने आपल्याला अनेक आजारांना सामोरं जावं लागत आहे. अशाच चुकीच्या जीवनशैलीमुळे हृदयविकार होणाऱ्यांचं (Heart Diseases) प्रमाण वाढलं आहे.

व्यग्र जीवनशैली आणि आहारावर ताबा न राहिल्याने आपल्याला अनेक आजारांना सामोरं जावं लागत आहे. अशाच चुकीच्या जीवनशैलीमुळे हृदयविकार होणाऱ्यांचं (Heart Diseases) प्रमाण वाढलं आहे.

नवी दिल्ली, 29 मार्च : सध्याच्या धावपळीच्या आयुष्यात आरोग्य चांगलं राखणं कठीण होत चाललं आहे. व्यग्र जीवनशैली आणि आहारावर ताबा न राहिल्याने आपल्याला अनेक आजारांना सामोरं जावं लागत आहे. अशाच चुकीच्या जीवनशैलीमुळे हृदयविकार होणाऱ्यांचं (Heart Diseases) प्रमाण वाढलं आहे. हृदय निरोगी ठेवण्यासाठी पौष्टिक आहार आणि झोपेची योग्य वेळ अतिशय आवश्यक असते. कमी झोपेमुळे हृदयाशी संबंधित आजारांसह लठ्ठपणा (Obesity) आणि मधुमेहाचाही (Diabetes) त्रास उद्भवण्याची शक्यता असते. त्यामुळे हृदय निरोगी (Healthy Heart) ठेवण्यासाठी योग्य वेळी झोपणं आवश्यक असतं. यासाठी झोपेची योग्य वेळ (Right Bedtime For Heart Health) कोणती हे जाणून घेणं महत्त्वाचं आहे. झोपेची योग्य वेळ आणि झोपण्यापूर्वी काय काळजी घ्यावी याविषयी इथे माहिती देत आहोत. 'झी न्यूज हिंदी'ने याविषयीची माहिती देणारं वृत्त प्रसिद्ध केलं आहे.

तज्ज्ञांच्या म्हणण्यानुसार, रात्री 10 वाजता झोपणं आणि सकाळी 6 वाजता उठणं योग्य आहे. या वेळांचा सूर्योदय आणि सूर्यास्ताशी संबंध आहे. मध्यरात्री 2 ते पहाटे 4 या वेळेत सर्वांत गाढ झोप लागते. त्यामुळे आपण योग्य वेळी झोपणं शारीरिक आरोग्यासाठी आवश्यक असते. परंतु वेळेवर न झोपता तुम्ही रात्री उशिरा झोपलात तर त्याचा दुसऱ्या दिवसाच्या दिनचर्येवर परिणाम होऊ शकतो. रात्री 10 ते 11 या वेळेत झोपल्याने हृदयाचं आरोग्य चांगलं राहतं. या संदर्भात करण्यात आलेल्या एका संशोधनात 43 ते 79 वर्षं वयोगटातल्या 88,000 हून अधिक व्यक्तींचा समावेश करण्यात आला होता. या व्यक्तींच्या झोपेच्या आणि उठण्याच्या वेळांचा तपशील गोळा करण्यात आला. तसंच त्यांच्या जीवनशैलीच्या आधारे त्यांचं मूल्यमापनदेखील करण्यात आले. त्यानंतर या संशोधनात आढळून आलेल्या तथ्यांनुसार हा दावा करण्यात आला आहे.

हे ही वाचा-कोरोनानंतर Heart Rate वाढण्याचा त्रास हलक्यात नका घेऊ; वैद्यकीय तज्ज्ञांनी दिला गंभीर इशारा

तज्ज्ञांच्या सल्ल्यानुसार रात्री जेवल्यानंतर लगेच झोपू नये. रात्रीचं जेवण आणि झोपेची वेळ यात किमान दीड ते दोन तासांचं अंतर असणं आवश्यक आहे. यामुळे पचनक्रिया सुरळीतपणे पार पडते. त्याचप्रमाणे पचायला जड असणारं अन्न रात्री खाणं टाळावं. कारण रात्री आपल्या शरीराची हालचाल होत नाही. तसंच रात्री झोपताना कोणत्याही प्रकारचं इलेक्ट्रॉनिक डिव्हाइस म्हणजेच मोबाइल किंवा लॅपटॉप किंवा इतर उपकरणं वापरणं टाळावं. सर्वांत महत्त्वाचे म्हणजे ज्यांचं वय अधिक आहे त्यांनी किमान 7 ते 8 तासांची झोप घेणं आवश्यक असते. मध्यरात्री 12 वाजण्यापूर्वी झोपण्याचा प्रयत्न करावा आणि दुपारच्या वेळी जास्त झोपणं टाळावं.

First published:

Tags: Health, Heart risk, Obesity, Sleep, Sleep benefits