जाहिरात
मराठी बातम्या / लाइफस्टाइल / दूध खाण्याव्यतिरिक्त रोजच्या कामांमध्ये त्याचा असा करता येतो स्मार्ट उपयोग

दूध खाण्याव्यतिरिक्त रोजच्या कामांमध्ये त्याचा असा करता येतो स्मार्ट उपयोग

दुधाचे इतर उपयोग

दुधाचे इतर उपयोग

दूध पिण्याने अनेक प्रकारच्या आरोग्य समस्यांवर मात करता येते. पण, अनेकांना दुधाचे खाण्याव्यतिरिक्त असलेले इतर फायदे माहीत नाहीत. त्याविषयी सविस्तर जाणून घेऊया.

  • -MIN READ Mumbai,Maharashtra
  • Last Updated :

नवी दिल्ली, 28 डिसेंबर : सर्वांच्याच घरात दूध आणि दुधाचे पदार्थ वापरले जातात. आपल्यातील प्रत्येकालाच दूध पिण्याचे शरीराला किती फायदे होतात, हे माहीत असेलच. दूध पिण्याने अनेक प्रकारच्या आरोग्य समस्यांवर मात करता येते. पण, अनेकांना दुधाचे खाण्याव्यतिरिक्त असलेले इतर फायदे माहीत नाहीत. दूध शरीर आणि सौंदर्यासह इतर अनेक गोष्टींसाठी देखील फायदेशीर आहे. जाणून घेऊयात दुधाचे इतर फायदे. त्वचेसाठी दूध दुधाच्या वापराने त्वचेला बरेच फायदे मिळतात. याच्या वापरामुळे त्वचा मॉइस्चराईझ होते, चमकदार, टाईट होते, चेहऱ्यावरचे मुरुमे कमी होतात आणि त्वचेला पोषण मिळतं. अगदी सोप्या पद्धतीने तुम्ही दुधाचा वापर करू शकता. रात्री झोपण्याआधी कापसाचा बोळा घ्या. या कापसाच्या बोळ्याने चेहऱ्यावर हळूवारपणे दूध लावा. यानंतर 5 मिनिटांसाठी हलक्या हातांनी चेहऱ्यावर मॉलिश करा. रात्रभर तसच राहु द्या. सकाळी थंड पाण्याने चेहरा धुवा. केसांसाठी उपयोग केस मजबूत बनवण्यासाठी आणि चमक वाढविण्यासाठी केसांवर दुधाचा वापर करू शकता, यामुळे केसांचा कोरडेपणा दूर होऊन चांगलं पोषण होतं. एक स्प्रे बॉटलमध्ये कच्चे दूध भरा आणि केसांच्या मुळांपासून टोकापर्यंत व्यवस्थित स्प्रे करा. दुधाने केस मुळांपासून टोकापर्यंत ओले व्हावेत. यानंतर, आपल्या केसांच्या त्वचेसह केसांनाही मालिश करा. मग केस कंगव्याने व्यवस्थित विंचरा. केस धुण्याच्या दोन तासाआधी लावून ठेवा, त्यानंतर शॅम्पूने केस धुवा. यामुळे, केवळ केसांचं आरोग्य सुधारत नाही तर, केसांना पुरेसं पोषण देखील मिळेल. बागेतील झाडांसाठी दूध दुधाचा वापर झाडांसाठी (Plant) करता येऊ शकतो. रोपं सुकायला लागली असती तर, त्यांना हिरवीगार करण्यासाठी दूध वापरता येतं. यासाठी कच्च्या दुधात पाणी समान प्रमाणात मिसळा आणि स्प्रे बॉटलमध्ये भरा. या मिश्रणाने दररोज झाडांवर स्पे करा. यामुळे झाडं लवकर कोमेजणार नाहीत आणि कायम हिरवी, टवटवीत राहतील. त्याने झाडांचं आयुष्य वाढेल आणि पोषण देखील मिळेल.

News18लोकमत
News18लोकमत

कपड्यांसाठी दूध आपल्या कपड्यांवरचे कोणत्याही प्रकारचे डाग दूर करण्यासाठी दुधाचा वापर देखील करू शकता. यासाठी दुधात मीठ मिसळा आणि चमच्याच्या सहाय्याने डाग असलेल्या जागेवर लाऊन 2 मिनिटं ठेवा. यानंतर हलक्या हातांनी पुसून हे डाग स्वच्छ करा. यामुळे कपड्यांवरील डाग दूर होतील. पण, डाग जास्त घट्ट असतील तर, एकदाच ही क्रिया करून निघून जाणार नाही. पण, दोनचार वेळा लावल्याने फरक पडेल. हे वाचा -  फक्त एक कप दुधाने दूर होतील टाचांवरील भेगा, रात्रीच्यावेळी असा करा वापर भाजीची चव वाढेल   भाजीची चव वाढवण्यासाठी आपण भाजीमध्ये दुधाचा वापर करू शकता. एवढेच नाही तर, भाजीमध्ये मीठाचं प्रमाण जास्त झालं असेल तर, मीठ कमी करण्यासाठी दुधाचा वापर करू शकता. यासाठी, भाजी तयार झाल्यानंतर, सर्वात शेवटी 2 ते 3 चमचे दूध घालू शकता. यामुळे भाज्यांची चव वाढेल आणि भाज्या अधिक पौष्टिक बनतील. हे वाचा -  ‘हे’ आजार असलेल्या लोकांनी प्रमाणापेक्षा जास्त पाणी पिणं ठरेल धोक्याचं (सूचना : येथे दिलेली माहिती सामान्य वैद्यकीय माहितीवर आधारित आहे. न्यूज 18 लोकमत त्याची हमी देत नाही. अधिक माहितीसाठी संबंधित तज्ज्ञांशी संपर्क साधा. )

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात