जाहिरात
मराठी बातम्या / लाइफस्टाइल / हे आजार असलेल्या लोकांनी प्रमाणापेक्षा जास्त पाणी पिणं ठरेल धोक्याचं

हे आजार असलेल्या लोकांनी प्रमाणापेक्षा जास्त पाणी पिणं ठरेल धोक्याचं

पाणी

पाणी

जास्त पाणी पिण्याचे दुष्परिणाम कोणते, त्याविषयी जाणून घेऊ या.

  • -MIN READ Trending Desk Mumbai,Maharashtra
  • Last Updated :

    मुंबई, 28 डिसेंबर :    उत्तम आरोग्यासाठी पोषक आहार आणि व्यायामाप्रमाणेच रात्रीच्या वेळी शांत झोप घेणं आणि पुरेसं पाणी पिणं गरजेचं असतं. दिवसभरात पाणी कमी प्रमाणात प्यायल्यास डिहायड्रेशन होण्याची शक्यता असते. कमी पाणी पिण्याच्या सवयीमुळे अनेक शारीरिक समस्या निर्माण होऊ शकतात. या समस्या निर्माण होऊ नयेत, म्हणून काही जणांना प्रमाणापेक्षा जास्त पाणी पिण्याची सवय असते. परंतु, प्रमाणापेक्षा जास्त पाणी पिण्यामुळेदेखील शारीरिक त्रास होतो. त्यामुळे रोज संतुलित प्रमाणात पाणी पिणं आवश्यक आहे. जास्त पाणी प्यायल्याने शरीरातल्या अवयवांवरचा ताण वाढतो. ही बाब आजारांना निमंत्रण देणारी ठरू शकते. जास्त पाणी पिण्याचे दुष्परिणाम कोणते, त्याविषयी जाणून घेऊ या. शरीरातलं पाणी कमी होऊ नये, यासाठी पुरेसं पाणी पिण्याचा सल्ला दिला जातो. त्यामुळे रोज ठरावीक वेळेनंतर थोडं पाणी पिणं गरजेचं आहे. यामुळे शरीर हायड्रेटेड राहतं आणि शरीरातले विषारी घटक युरिनच्या माध्यमातून बाहेर टाकण्यास मदत होते. काही जण प्रमाणापेक्षा जास्त पाणी पितात. यामुळे शरीरातल्या अवयवांवर विपरीत परिणाम होऊ शकतो. प्रमाणापेक्षा जास्त पाणी प्यायल्याने किडनी, हार्ट आणि लिव्हरवर ताण वाढतो आणि यामुळे या अवयवांचं कार्य बिघडू शकतं. हेही वाचा -  Optical Illusion : बेडरूममध्ये लपलाय कुत्रा; जीनिअस असाल तर दाखवा शोधून काही जण स्वतःला फिट ठेवण्यासाठी जास्त व्यायाम करतात आणि वर्कआउटनंतर लगेच पाणी पितात. असं करणं चुकीचं आहे. व्यायामानंतर खूप घाम येतो. यामुळे शरीरातले इलेक्ट्रोलाइट बाहेर पडतात. इलेक्ट्रोलाइट्स जास्त प्रमाणात बाहेर पडले, तर ते शरीरासाठी घातक ठरू शकतं. त्यामुळे व्यायामानंतर थोड्या प्रमाणात नारळ पाणी, लिंबू पाणी किंवा फळांचे ज्यूस पिऊ शकता. दिवसभरात प्रमाणापेक्षा जास्त पाणी पिण्याची सवय असेल तर यामुळे अन्नपचन बिघडू शकतं. कारण जेवणानंतर अनेक प्रकारची अन्नं पचवणारी आम्लं शरीरात तयार होतात. पाणी प्यायल्यास ती कमकुवत होऊन पचनात अडथळे निर्माण होऊ शकतात. जास्त पाणी प्यायल्याने फायदा होतो, असा विचार चुकीचा आहे. प्रमाणापेक्षा जास्त पाणी प्यायल्यास वारंवार युरिनला जावं लागतं. रात्रीच्या वेळी ही समस्या त्रासदायक ठरू शकते. यामुळे झोपेत अडथळा येतो. योग्य प्रमाणात पाणी प्यायलं आहे की नाही हे जाणून घेण्यासाठी युरिनच्या रंगाकडे लक्ष ठेवा. युरिनचा रंग पांढरा असेल, तर तुम्ही योग्य प्रमाणात पाणी प्यायलं आहे असं समजावं. युरिनचा रंग पिवळसर असेल तर तुम्हाला आणखी पाणी पिणं आवश्यक आहे, असं समजावं. या गोष्टीच्या आधारे तुम्ही पाणी पिण्याचं नियोजन करू शकता. पाणी पिण्याचं प्रमाण चुकीचं असेल तर त्याचे दुष्परिणाम निश्चितच जाणवतील.

    मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
    • First Published :
    जाहिरात
    जाहिरात