जाहिरात
मराठी बातम्या / लाइफस्टाइल / फक्त एक कप दुधाने दूर होतील टाचांवरील भेगा, रात्रीच्यावेळी असा करा वापर

फक्त एक कप दुधाने दूर होतील टाचांवरील भेगा, रात्रीच्यावेळी असा करा वापर

फक्त एक कप दुधाने दूर होतील टाचांवरील भेगा, रात्रीच्यावेळी असा करा वापर

जास्त वेळ उभे राहणे, अनवाणी चालणे, अयोग्य शूज परिधान करणे किंवा अगदी कडक साबण वापरणे यामुळे तुमची टाच कोरडी होऊ शकते आणि कालांतराने त्याला भेगा पडू शकतात.

  • -MIN READ Mumbai,Maharashtra
  • Last Updated :

मुंबई, 27 डिसेंबर : तुम्‍ही तुमच्‍या बहुतांश त्वचेला झाकून ठेवू शकता. परंतु तुमच्‍या पायांना सहसा कडक हवामानाचा फटका बसतो, मग ती थंडी असो वा उष्‍णता. जास्त वेळ उभे राहणे, अनवाणी चालणे, अयोग्य शूज परिधान करणे किंवा अगदी कडक साबण वापरणे यामुळे तुमची टाच कोरडी होऊ शकते आणि कालांतराने त्याला भेगा पडू शकतात. टाचांना पडलेल्या क्रॅकमधून रक्तस्त्राव होऊ शकतो, वेदना होऊ शकतात आणि संसर्ग होण्याचा धोका देखील वाढू शकतो. मात्र कोरड्या आणि क्रॅक टाचांची काळजी घेणे खूप सोपे आहे. जर ते एखाद्या वैद्यकीय स्थितीमुळे होत नसतील, तर काही सोपे घरगुती उपाय त्वचेचा पोत आणि तुमच्या टाचांची गुणवत्ता सुधारण्यासाठी प्रभावी ठरू शकतात. असाच एक उपाय तो म्हणजे दुधाचा.

Skin Care : कॉफी सोबतच या 5 सवयी वाढवू शकतात चेहऱ्यावरील सुरकुत्या

होय, दूधदेखील तुमच्या टाचांच्या भेगा दूर करू शकते. झी न्यूजमध्ये दिलेल्या माहितीनुसार, दुधामध्ये अँटीफंगल, अँटीबॅक्टेरियल आणि अँटीसेप्टिक गुणधर्म असतात, जे तुमच्या त्वचेसाठी खूप फायदेशीर ठरतात. दुधाच्या नियमित वापराने टाचेवरील क्रॅक दूर होतात, हिवाळ्यात त्वचेतील जळजळ दूर होते आणि त्याचबरोबर तुमची डेड स्किनही निघून जाते. यामुळे तुमच्या पायांच्या टाचा मऊ आणि सुंदर होतात.

News18लोकमत
News18लोकमत

अशाप्रकारे पायांवर करा दुधाचा वापर टाचांसाठी दूध वापरताना सर्वप्रथम एका भांड्यात पाणी आणि एका भांड्यात दूध गरम करा. यासाठी एक कप दूध घेतले असेल तर सुमारे एक मग पाणी घ्या. हे दोन्ही कोमट झाल्यावर एकत्र करून घ्या. त्यानंतर हे मिश्रण एका टबमध्ये टाका आणि त्यात १ चमचा खोबरेल तेल घालून मिक्स करा. त्यानंतर टबमधील या मिश्रणात पाय बुडवून बसा. काही वेळ पाय बुडवल्यानंतर या मिश्रणाने दोन्ही टाचांना किमान ५ मिनिटे मसाज करा. त्यानंतर आपले पाय बाहेर काढून टॉवेलने हळूवार पुसून घ्या आणि नंतर पायात मोजे घाला. तुम्ही रात्री झोपण्यापूर्वी हा उपाय करू शकता. मात्र पायात घातलेले मोजे काही काळ ठेऊन रात्री झोपण्यापूर्वी काढून ठेवा. हा उपाय नियमित केल्यास तुम्हाला चांगले परिणाम मिळतील. Ginger For Skin : आल्याचा एक तुकडा दूर करू शकतो पिंपल्स आणि रिंकल्स, असा करा वापर (सूचना : या लेखात दिलेली माहिती आणि सूचना सामान्य माहितीवर आधारित आहेत. News 18 Marathi यांना दुजोरा देत नाही. यांची अंमलबजावणी करण्याआधी संबंधित तज्ज्ञाशी संपर्क करा.)

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात