Home /News /lifestyle /

जांभूळ खाण्याचे आरोग्यदायी फायदे; कधीच लागणार नाही चष्मा

जांभूळ खाण्याचे आरोग्यदायी फायदे; कधीच लागणार नाही चष्मा

जांभूळ शरीरात साखरेची पातळी आणि मधुमेह कमी करण्यासाठी रामबाण औषध आहे.

जांभूळ शरीरात साखरेची पातळी आणि मधुमेह कमी करण्यासाठी रामबाण औषध आहे.

डायबिटीज रुग्णांना जांभूळ अतिशय फायदेशीर (Health Benefits) आहे मात्र, डोळ्यांचं आरोग्य चांगलं ठेवायचं असेल तरीही जांभूळ खाण्याने फायदा होऊ शकतो.

    दिल्ली, 12 जुलै : कोरोनाच्या लाटेमुळे (Corona Pandemic) आपल्या सगळ्यांच्याच आयुष्यावर परिणाम झालेला आहे. लॉकडाऊनमुळे आपण घरात अडकून पडलो आणि त्यामुळेच वेळ घालवण्यासाठी डिव्हाईसचा(Device)वापर वाढलेला. लोक लॅपटॉप,मोबाईल, कम्प्युटर यांचा जास्त प्रमाणात वापर करू लागलेत. एका रिपोर्टनुसार कोरोना काळामध्ये 28 करोड लोकांचे डोळे कमजोर झाले आहेत. दिवसातले 6 तास गॅझेट(Gadgets)वापरल्यामुळे डोळ्यांवर परिणाम (Effects on the Eyes)झालेला आहे. शाळा बंद असल्यामुळे मुलांना ऑनलाईन (Online Study)अभ्यास करावा लागतो. त्यामुळेच मोबाईल आणि कम्प्युटरचा वापर मुलंही जास्त प्रमाणात करतात. 10 ते 15 वर्षांच्या मुलांचे डोळे खराब व्हायला लागले आहेत. (घातक आहेत ‘हे’ Foods Combinations; चुकूनही एकत्र खाऊ नका) डोळ्यांचे आरोग्य चांगलं ठेवायचे असेल तर, औषधांपेक्षा काही घरगुती उपायही (Home Remedies)करता येऊ शकतात. (55 वर्षाच्या मिलिंद सोमणचं ‘Fitness secret’;‘आयर्नमॅन’चा Video) उन्हाळ्यामध्ये आणि पावसाळ्याच्या सुरुवातीला मिळणारी जांभळं खाण्यामुळे आपण डोळ्याचं आरोग्य चांगलं ठेवू शकतो जांभळामधील काही गुणधर्मांमुळे ब्लड शुगर, ब्लड प्रेशर कंट्रोलमध्ये येतं. त्याशिवाय डोळे देखील चांगले राहतात. जांभळामध्ये व्हिटॅमीन सी, कॅल्शियम, प्रोटीन, कार्बोहायड्रेट याशिवाय ऍन्टीऑक्सीडंन्ट असतं त्यामुळे वाढते जांभळा मध्ये कॅरोटीन आणि आयर्न देखील उच्च प्रमाणात असतं. (पावसाळ्यातले आजार पळवाचे असतील तर; हे 2 पदार्थ एकत्र खा! लगेच होईल फायदा) त्यामुळे डोळ्यांचं आरोग्य चांगलं राहतं. डोळ्यांचं आरोग्य चांगलं ठेवण्यासाठी बीट,गाजर आणि डाळिंब देखील खावेत. यात व्हिटॅमीन ए आणि व्हिटॅमीन के असतं त्यामुळे डोळे चांगले राहतात.
    Published by:News18 Desk
    First published:

    Tags: Health Tips, Lifestyle

    पुढील बातम्या