मुंबई,08 जुलै: अभिनेता आणि मॉडेल मिलिंद सोमण (actor & model milind soman) वयाच्या 55 व्या वर्षीही अगदी फिट (Fitness) दिसतो. या वयातही तरुण मुलांपेक्षा मिलिंद सोमण फिट आणि उत्साही दिसतात. त्यामुळे 2015 साली वयाच्या पन्नाशीत त्यांनी 2000 जणांवर मात देत आर्यनमॅन ही ट्रायथलॉन (Ironman Triathlon) जिंकली होती. आता 5 वर्षांनीही त्यांनी स्वत:ला तितकंच तरुण ठेवलंय. मिलिंद सोमण सोशल मीडियावर (Social Media) खूप अॅक्टिव्ह असतात आणि वेळोवेळी त्यांनी आपल्या चाहत्यांसाठी आपलं फिटनेस सिक्रेटही (Fitness Secret) शेअर करत असतात. अलीकडेच त्यांनी पुन्हा एकदा एका पोस्टच्या माध्यमातून आपल्या चाहत्यांसमोर आपल्या फिटनेसचं सिक्रेट उघड केलं असून इन्स्टाग्राम पोस्टच्या **(Instagram Post)**माध्यमातून त्यानी आपल्या डेली रूटिन (Daily Routine) शेअर केलं आहे. अश****ी असते दिवसाची सुरुवात मिलिंद सोमण आपल्या दिवसाची सुरुवात 500 मिलीलीटर पाणी पिऊन करतात. यानंतर 10 वाजता नाश्ता करतात. यात सुकामेवा, पपई, कलिंगड, खरबूजबरोबर हंगामी फळं खातात. दुपारी शाकाहारी जेवण मिलिंद सोमण यांना अत्यंत साधं आणि शाकाहारी जेवण आवडतं. दुपारच्या जेवणात शाकाहारी पदार्थच खातात. त्यात तांदूळ आणि मसूरची खिचडी, हंगामी भाज्या असतात. त्यांच्या ताटात 1 भाग डाळभात आणि 2 भाग भाज्या असतात. शिवाय 2 चमचे तूप असतं. कधीकधी भाज्या आणि डाळींबरोबर 6 चपात्या खातात. फार कमीवेळा म्हणजे महिन्यातून एकदा छोटासा तूकडा चिकन किंवा मटण,अंडं खातात. ( कॅच पकडण्यासाठी वडिलांनी कडेवरच्या मुलीला सोडलं, पुढे काय झालं…पाहा VIDEO ) ब्लॅक टी आवडते मिलिंद सोमण यांना संध्याकाळी 5 वाजता कधीतरी 1 कप ब्लॅक टी पिणं आवडतं. यात साखरेऐवजी गूळ घालतात. तर संध्याकाळी 7 वाजताच्या सुमारास रात्रीचं जेवण करतात. ते देखील साधं जेवण असतं. ( तुमचं बाळ अजूनही बोलत नाही? Tongue Tie असू शकतं कारण ) एक प्लेट भाजीच रात्रीच्या जेवणात खातात. याशिवाय कधी जास्त भूक लागल्यावरच रात्री खिचडी खातात. पण रात्री नॉनव्हेज खात नाहीत. आहाराबरोबर मिलींद सोमण व्यायामाकडेही लक्ष देतात.
सकाळी उठल्यावर योगा आणि एक्सरसाइज करतात. त्यांचा व्यायाम करतानाचा व्हीडिओ ते चाहत्यांसाठी शेअर करतात.